मराठी ग्रंथाभिमान
Category:
साहित्य - ललितमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील.