शिनकानसेन – जमिनीवरचे विमान
Category:
साहित्य - ललितबुलेट ट्रेनचे जपानी भाषेतले नाव शिनकानसेन. जपानला एकत्र बांधून ठेवणार्या प्रमुख धाग्यांमधील एक.. एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा प्रवास काही तासात घडवून आणणारी जगातली सर्वात वेगवान रेल्वे – शिनकानसेन.
“खरोखरच…जमिनीवर धावणारी विमाने आहेत!” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही अशा डौलाने ह्या शिनकानसेन धावतात.
३०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने! म्हणजे कल्पना करा किती स्पीड असेल (मुंबई-पुणे प्रवास ६० मिनिटांच्या आत पूर्ण करतील इतका).
May 23, 2021