दक्षिण आफ्रिका
Category:
शहरे आणि गावेदक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकुण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.
दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.