दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे.
क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकुण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.
दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.
सर्व वांशिक गटांना सामावून घेणारी घटनाआधारित लोकशाही, सांसदीय प्रजासत्ताकाची राज्यपद्धती दक्षिण आफ्रिकेच्या स्विकारली आहे. मात्र अशा राज्यपद्धतीत सहसा आढळाणे राष्ट्रप्रमुख आणि सरकारचा प्रमुख या दोन्ही पदांचे अधिकार अध्यक्ष (प्रेसिडेंट) या एकाच पदाकडे सोपविले आहेत.
दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाकडील एक सार्वभौम देश आहे. २२ अंश ७ ते ३४ अंश ५२ दक्षिण आणि १६ अंश २९ ते ३२ अंश ५६ पूर्व या दरम्यान या देशाचा विस्तार आहे. दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्रफळ १२,२१,०४२ चौ. कि. मी आहे.
लोकसंख्या ४,९३,२०,००० इतकी असून ११ डिसेंबर १९३१ या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळाले. याच्या | पूर्वेस हिंदीमहासागर, पश्चिमेस अटलांटिक महासागर असून हे दोन्ही महासागर तिथे एकमेकांत मिसळून गेले आहेत. वायव्येस नामिबिया, उत्तरेस बोस्टव्हाना व होडेशिया तर ईशान्येस मोझँबीक व स्वाझीलँड हे देश आहेत. याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या अडीचपट आहे. राज्यकारभाराच्या सोयीसाठी केप प्रांत, नाताळ, ट्रान्सव्हाल आणि ऑरेंज फ्री या चार प्रांतात विभागला गेला आहे. केपटाऊनच्या अग्नेयेस प्रिन्स एडवर्ड व मॅरियन बेटावर या देशाची सत्ता आहे. या देशाला एकंदर तीन राजधान्या आहेत. केपटाउन-संसदीय, प्रिटोरिया-प्रशासकीय आणि ब्लूमफाँटेन-न्यायिक अशाप्रकारे या राजधान्यातून काम चालते. देशाचा सर्व भाग पठारी असून समुद्र सपाटीपासून साधारण १२०० ते १५०० फुटांवर आहे. एंतलेनयान हे सर्वोच्च शिखर असून ३.४८२ मीटर उंच आहे. हा मोठा पर्वत प्रचंड लाव्हाच्या थरांपासून बनलेला आहे. देशाच्या मध्यभागी खाऱ्या पाण्याची बरीच सरोवरे आहेत. वाहून आणलेल्या वाळूचे येथे फार मोठे संचयन आहे. समुद्र किनाऱ्यांमध्ये पायऱ्या आढळतात.
त्यांना ग्रेट कारू किंवा लिटिल कारू म्हणतात. डेकन्सबर्ग पर्वतातून उगम पावणारी ऑरेंज ही नदी सर्वात मोठी नदी दक्षिण आफ्रिका आहे. व्हाल, कॅलेडॉन, लिंपोपो, तुगेलां, उमझिंव्हूबू ग्रेट फिश इत्यादी लहान मोठ्या नद्या असल्या तरी ‘जलसंपत्ती मर्यादित आहे. देशाच्या उत्तर भागातून मकरवृत्त गेल्यामुळे त्या भागात हवामान उष्ण असते. इतर ठिकाणी हवामान समशितोष्ण असते. ४ अंश ते २४ अंश से. पर्यंत तापमान असते. पावसाचे प्रमाण १५ सें मी. पासून १५० सें. मी. पर्यंत असते. १४० वनस्पतींच्या १६०० च्या वर विविध जाती येथे आढळतात. डिंक आणि वॅटल सारख्या झाडांची येथे जाणीवपूर्वक लागवड करण्यात आली आहे. मुंगी भक्षक अस्वलासारखा प्राणी, वाघ, चित्ते, हत्ती, काळवीट इत्यादी प्राणी येथील जंगलातून आढळतात. हा देश आफ्रिका खंडात सर्वात संपन्न असून सोने, लोकर, शेती आणि खाणी या मुळे याच्या संपन्नतेत भर पडली आहे. लागवडी खालील ७० टक्के जमिनीत मका काढला जातो. संत्री, मोसंबी, लिंबू, सफरचंद, केळी इत्यादी फळे येथे होतात. येथील मुख्य धर्म ख्रिस्ती असून येथील अधिकृत भाषा इंग्रजी आणि आफ्रिकान्स आहे. रॅण्ड हे येथील चलन आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :प्रिटोरिया, जोहान्सबर्ग
राष्ट्रीय चलन :दक्षिण आफ्रिकन रँड
सौजन्य : विकिपीडिया