लेखसंग्रह

साउथ आफ्रिका-शहर जोहानसबर्ग

Category:

 

आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात.

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – भाग ८

Category:

 

साउथ आफ्रिका हा देश, तसे पहिले गेल्यास, आफ्रिका खंडातील युरोप!! हवा बरीचशी युरोपप्रमाणे थंडगार असते. अगदी, उन्हाळी दिवस(सध्या इथे उन्हाळा सुरु आहे!!) आले तरी देखील, मुंबईप्रमाणे, घामाने अंग उकडून गेले आहे, असा प्रकार फारसा किंवा अजिबात होत नाही.

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका-भाग ४

Category:

 

एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत,  न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.

लेखसंग्रह

हुरहुरणारा किरवाणी

Category:

 

मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात.

लेखसंग्रह

परफेक्ट बॉस कोण ?

Category:

 

खरं तर एखाद्या ठिकाणी स्त्री बॉस असली तर त्यात एवढं मोठं काय? असा प्रश्न काही जणांना पडेल. पण त्यांची संख्या केवळ 20 टक्के असेल, बाकी 80 टक्के वर्गाला हा बदल फारसा रुचत नाही. त्यातही पुरुषांची संख्या अधिक ! कारण स्त्रियांवर हक्क गाजवणं ही कल्पना मनाला चिकटलेली असते. आता त्यांच्या हाताखाली काम करायचं म्हणजे… पण अपरिहार्यतेच्या दृष्टिकोनातून त्याला ‘अंजाम’ दिला जातो.

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – भाग ७

Category:

 

इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत.

लेखसंग्रह

सलिल चौधरी – प्रयोगशील संगीतकार!!

Category:

 

चित्रपट गीतांमध्ये प्रयोग करायला तसा वाव कमी(च) असतो. मुळात ३ घटक असलेला अटकर बांध्याचा हा आविष्कार आणि त्यातून केवळ ३ ते ४ मिनिटांचे सादरीकरण. त्यामुळे, प्रयोग करायचे झाले तरी, शब्द, स्वरांची रचना, वाद्यमेळ आणि गायन, याच घटकातून होणार. आणि तिथे तिन्ही स्वतंत्र व्यक्ती!! म्हणजे प्रत्येकाच्या प्रतिभेचा आविष्कार वेगळा आणि तरीही मर्यादित स्तरावरील

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – डर्बन!!

Category:

 

माझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील.

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – भाग ५

Category:

 

कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात.

लेखसंग्रह

संयत वेदनेचा मारवा

Category:

 

तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो