लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – भाग २

Category:

 

साधारणपणे महिन्या दोन महिन्यात मी बराचसा रुळलो, असे म्हणायला हरकत नाही. पीटरमेरीत्झबर्ग गाव हे तसे एकदम टुमदार असे गाव आहे. जवळपास, सात, आठ टेकड्यांवर वसलेले आहे आणि समुद्र सपाटीपासून बरेच उंच असल्याने, हवा थंडगार असते, अर्थात, डिसेंबर, जानेवारी हे महिने वगळता. मी, मुंबईचा आल्हाददायक उन्हाळा अनुभवून या शहरात आलो असल्याने, इथला उन्हाळा देखील मला चांगलाच भावला.

लेखसंग्रह

साउथ आफ्रिका – भाग ६

Category:

 

जसे मी मागील लेखामध्ये  व्हाईट समाजाविषयी चांगल आणि वाईट, अशा दोन्ही गोष्टी मांडायचा प्रयत्न केला. तसाच प्रकार भारतीय वंशीय लोकांच्या बाबतीत लिहिला. अर्थात असे नव्हे की, या सामाजात अनेक वाईट गोष्टी आहेत. त्याचे थोडक्यात असे आहे की, इथला भारतीय समाज सतत वर्षानुवर्षे एका प्रचंड मानसिक कुचंबणेखाली वावरत असल्याने, त्यांची अशी अत्यंत स्वाभाविक प्रतिक्रिया घडत असते.

लेखसंग्रह

सुधीर फडके – ललित गायनातील प्रतिष्ठित घराणे

Category:

 

शास्त्रीय संगीताचा पायाभूत अभ्यास, प्रचंड मेहनत हीच सुधार फडक्यांची प्राथमिक अशी ओळख करून घेता येईल. सुरवातीलाच पंडित वामनराव पाध्यांकडे शिस्तशीर शिक्षण तसेच त्याकाळातील कोल्हापूरमधील वास्तव्य असल्याने अनेक शास्त्रीय संगीतकारांच्या प्रभाव.

लेखसंग्रह

संयत वेदनेचा मारवा

Category:

 

तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी  मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का? महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम जशी सतत वाहती असते त्याप्रमाणे या रागात सतत वेदनेचा सूर कायम स्त्रवत असतो

लेखसंग्रह

हुरहुरणारा किरवाणी

Category:

 

मराठीतील काही अजरामर कवितांमधील ही एक कविता!! आज जवळपास शतक उलटून गेले तरी देखील या ओळीचा मोह, वाचकांना अनेकवेळा होतो आणि त्यानिमित्ताने अर्थाचे अनेक पदर विशद केले जातात. उत्तम कवितेचे हे एक लक्षण मानावेच लागेल. राग “किरवाणी” ऐकताना, मला बरेचवेळा या ओळी आठवतात.

अवर्गिकृत

गुरु महिमा

Category:

 

आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे.

अवर्गिकृत

माझं नाटक !

Category:

 

मला नाटकात काम करायची हौस कधीच नव्हती. लहानपणी नाटकात किंवा सिनेमात सगळं खोटं असतं हे सत्य भिनलं होतं. लहान मुलांच्या विविध वेष स्पर्धेत (Fancy Dress Competition) मध्ये मला एक गुराखी बनवला होता. “अहो मी गुराखी आलो, गुरे घेऊन चाराया ” हे गाणं म्हणत स्टेजवर नाचलो. मला बक्षीस मिळालं होतं.