लेखसंग्रह

परळला गेलेले दसर्‍याचे नरबळी

Category:

 

पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणाऱ्या एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलावर आज अपघात झाला. असा काही अपघात झाला, की ‘दुर्दैवी’ म्हणतो, फेसबुकवरच श्रद्धांजली वैगेरे वाहतो आणि पुढच्या मिनिटाला सर्व विसरून आपल्या कामाला लागतो.

लेखसंग्रह

बाबा, भक्त आणि बायांचा ‘भोग’; एक स्वानुभव

Category:

 

स्त्रीला ‘भिक्षा’ म्हणून किंवा ‘चढावा’ म्हणून ‘डावा’वर लावायची आपली परंपरा पांडवांइतकी जुनी आहे आणि पुढेही चालूच राहाणार आहे. राम रहीम पहिला नाही आणि शेवटचा तर नाहीच नाही. आणखी काही बाबा, बापू, माॅं हे स्वत:ला परमेश्वराचा अवतार म्हणून हे सारे खेळ या क्षणालाही करत असावेत असं म्हटलं तर खोटं ठरू नये. जोपर्यंत बाबांना राजाश्रय आहे आणि लोक देवापेक्षा उपायांच्या शोधात आहेत, तो पर्यंत आपल्या समाजात असंच चालू राहाणार.

लेखसंग्रह

बेशिस्त मुंबईकरांची एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर आत्महत्या ?

Category:

 

काल परळला २२ मुंबैकरांनी परळ-एलफिन्स्टनच्या रेल्वेपुलावर आत्महत्या केली. म्हणजे असा निश्कर्ष सरकारी वकिलपत्र घेतलेल्या लोकांच्या पोस्टवरून काढावा लागतो.

लेखसंग्रह

माझ्या आठवणीतलं लालबाग आणि लालबागचा गणेशोत्सव

Category:

 

माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय.

लेखसंग्रह

मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

Category:

 

मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का?

लेखसंग्रह

मै सूर्य हूॅं..

Category:

 

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!!

लेखसंग्रह

रूजवा आणि माजवा’ हे जाती-जातीचे सूत्र असते !

Category:

 

शिक्षणाने जात जाईल असं म्हटलं जात होतं, पण आजच्या २१ साव्या शतकात भारतातलं हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. माणसं जस जशी शिकतायत, परदेशात जाऊन जग पाहून, अनुभवून येतायत, तस तशी माणसं अधिकाधिक जाती केंद्रीत होतायत, असं माझं निरिक्षण आहे.

लेखसंग्रह

विकासा’ची व्याख्या

Category:

 

आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं.

लेखसंग्रह

हरयाणातील झुंडशाही; विवेकशुन्य विचारांचा अपरिहार्य परिणाम

Category:

 

गेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे.

लेखसंग्रह

हिन्दू : संस्कृती की धर्म?

Category:

 

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं.