लेखसंग्रह

मुंबईकरांच्या एकात्मतेला सलाम !

Category:

 

मुंबईकरांनी आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्या/वाईट गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याची झळ सोसली आहे. त्याच्या कारणांनी एकमेकांशी वैर साधलेले बघितले आहे, अबोला बघितला आहे, दंगली अनुभवल्या आहेत. पण कालच्या पावसाने मुंबईकरांचे आणि चाकरमान्यांचे जे हाल झाले आणि त्यातून त्यांना झालेला मनस्ताप, गैरसोयींना सामोरे जातांना बघितले आणि क्षणभर वाटले हाच तो मुंबईकर का?

लेखसंग्रह

मै सूर्य हूॅं..

Category:

 

आपण सारे सूर्य आहोत हा विश्वास नेहेमी मनाशी बाळगून चालत राहा, अस्त झाल्यासारखा वाटणं, चंद्र-पृथ्वींने सूर्य गिळल्यासारखा वाटणं हा दृष्टीभ्रम असतो, सूर्याला अस्त नाहीं, त्याला ग्रहण नाही. आणि अर्थातच आत्मा अमर असतो असं मानणाऱ्या आपल्यासारख्या सूर्याच्या अंशांनाही अस्त नाही, ग्रहण नाही..बस चालत राहा, चालत राहा..!!

लेखसंग्रह

रूजवा आणि माजवा’ हे जाती-जातीचे सूत्र असते !

Category:

 

शिक्षणाने जात जाईल असं म्हटलं जात होतं, पण आजच्या २१ साव्या शतकात भारतातलं हे चित्र अतिशय निराशाजनक आहे. माणसं जस जशी शिकतायत, परदेशात जाऊन जग पाहून, अनुभवून येतायत, तस तशी माणसं अधिकाधिक जाती केंद्रीत होतायत, असं माझं निरिक्षण आहे.

लेखसंग्रह

विकासा’ची व्याख्या

Category:

 

आपल्याकडे गेली अनेक वर्षे विकास या शब्दाची चर्चा आहे. हल्ली तर विकास सुसाट सुटलाय ते विकास वेडा झालाय इथपर्यंत चर्चा आहे. देशातील इतर शहरांचं माहित नाही, परंतू मुंबई गेली काही वर्ष ‘विकास’ चाललेला ‘दिसतो’ आहे. विकास हा शब्द नेत्यांपासून ते एखाद्या कंगाल माणसापर्यंत सर्वच लोकांच्या मुखात असतो. परंतू प्रत्येकाच्या विकासाची व्याख्या मात्र वेगवेगळी आहे असं वाटतं. हे म्हणजे विकासाच्या रथाला चहूबाजूने घोडे, ते ही शहरातलं धष्टपुष्ट अरबी ते गांवाकडचं एखादं मरतुकडं घोडं, अशा वेगवेगळ्या ताकदीचे जोडले आणि त्यांना त्यावरील, पोट भरलेला नेता ते पोटभरू कामगार अशा, स्वारांनी एकाचवेळी वेगवेगळ्या दिशेने जोरात पळण्यासाठी टांच मारली, तर त्या विकासाच्या रथाचं जे काही होईल, तसं आपल्या विकासाचं झालंय असं मला वाटतं..हे असं होण्याचं एकमेंव कारण म्हणजे विकासाची नेमकी व्याख्या काय आणि तो कोणासाठी करायचा हे ठरलेलं नसणं.

लेखसंग्रह

हरयाणातील झुंडशाही; विवेकशुन्य विचारांचा अपरिहार्य परिणाम

Category:

 

गेले दोन-तिन दिवस हरयाणात जो काही धिंगाणा त्या राम रहीमच्या भक्तांनी घातलाय, तो मनाला अस्वस्थ करणारा आहे. त्याहीपेक्षा अस्वस्थता, सरकारने हे सर्व होऊ दिलं, याची आहे. झुंडशाहीपुढे झुकलेलं सरकार ही चिंतेची बाब आहे.

लेखसंग्रह

हिन्दू : संस्कृती की धर्म?

Category:

 

हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं.

लेखसंग्रह

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती-गणपती

Category:

 

विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..!

लेखसंग्रह

मला कळलेले श्री गुरूदेव दत्त

Category:

 

‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..!

लेखसंग्रह

राष्ट्रप्रेम;व्यक्त करणं आणि दाखवणं-

Category:

 

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभं राहाण्याची गरज नसल्याचा निर्वाळा काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. असा निर्वाळा देताना सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ साली चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती करण्याविषयी स्वत:च दिलेल्या निर्णयातील शब्दरचना बदलण्याची तयारीही दर्शवली.

लेखसंग्रह

सधन असताना आरक्षण मागणे हे लाचारीच

Category:

 

आपला समाज सुदृढ आणि एकसंघ बनण्यासाठी, आरक्षण घेणाऱ्या समाजातील समजूतदार व्यक्तींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेणं कधी नव्हे एवढं आज गरजेचं झालेलं आहे. ज्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे, त्यांच्यासाठी ते तसेच पुढे चालू ठेवण्यास कोणाचीही काहीच हरकत नाही, मात्र परिस्थिती सुधारली की ते समंजसपणाने आपणहून सोडूनही द्यावी, हे श्री. शिंदेंची अपेक्षाही चुकीची आहे असं म्हणता येणार नाही.