आजचा विषय हुरडा
Category:
खाद्ययात्राआता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात.