(बालदिनानिमित्त) : जराशी मजा

उंदीरमामा दिसताच
मनीमाऊनं घातली झडप
उंदीरमामा झटकन्
बिळात झाला गडप.

कुत्रा गुरगुरला बोक्यावर
बोका त्याला फिसकारला
दोघांनी नाकं फेंदारली
दोघांची गुरगुर वाढली

दोघांची शेपटी झाली ताठ
कुत्र्यानं वासले दात
अन् पाय उगारला
बोक्यानं नख्यांचा पंजाच मारला.

गाईचं वासरू
गोठ्यात रुळतंय्
आईचं वासरू
मांडीवर खेळतंय्

गाय वासराला चाटतेय्
प्रेमानं, हळू हळू
आई बाळाला थोपटतेय्
प्रेमानं, हळू हळू

दोघांचे होतायत लाडच लाड
वासरू झालं शांत
बाळ झोपलं गाढ.

पिंजर्‍यात पोपट
बोले मिठू मिठू
ओसरीत गजर
चाले विठू विठू.

- सुभाष स. नाईक . मुंबई.
Subhash S. Naik , Mumbai
M- 9869002126



उंदीरमामा दिसताच
मनीमाऊनं घातली झडप
उंदीरमामा झटकन्
बिळात झाला गडप.

कुत्रा गुरगुरला बोक्यावर
बोका त्याला फिसकारला
दोघांनी नाकं फेंदारली
दोघांची गुरगुर वाढली

दोघांची शेपटी झाली ताठ
कुत्र्यानं वासले दात
अन् पाय उगारला
बोक्यानं नख्यांचा पंजाच मारला.

गाईचं वासरू
गोठ्यात रुळतंय्
आईचं वासरू
मांडीवर खेळतंय्

गाय वासराला चाटतेय्
प्रेमानं, हळू हळू
आई बाळाला थोपटतेय्
प्रेमानं, हळू हळू

दोघांचे होतायत लाडच लाड
वासरू झालं शांत
बाळ झोपलं गाढ.

पिंजर्‍यात पोपट
बोले मिठू मिठू
ओसरीत गजर
चाले विठू विठू.

– सुभाष स. नाईक . मुंबई.
Subhash S. Naik , Mumbai
M- 9869002126

Author