अवर्गिकृत

डार्विनचा अुत्क्रांतिवाद

Category:

 

डार्विनच्या अुत्क्रांतीवादाने बर्‍याच धार्मिक संकल्पनांना धक्का दिला. आनुवंशिक तत्वाच्या (जेनेटिक मटेरियल) अुत्क्रांतीमय बदलांमुळे सजीवांच्या प्रजाती निर्माण होतात हे सिध्द झाले. आनुवंशिक तत्वच शरीर धारण करू शकते म्हणजे आनुवंशिक तत्वच सजीवांचा आत्मा असला पहिजे. या तत्वानुसार मी आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मांडला आहे.

अवर्गिकृत

आमचा वर्षारंभ १ जानेवारी नव्हे, चैत्र प्रतिपदा !

Category:

 

पाश्चात्य विकृतीचे अंधानुकरण करता,करता आम्ही आमचे स्वत्व विसरलो आहोत. आमचे आचार, विचार, संस्कार या सर्व बाबी इतिहास जमा होत चालल्या आहेत.

अवर्गिकृत

विज्ञान आणि अध्यात्म ः युगान्तरे.

Category:

 

या पृथ्वीवरील पर्यावरण प्रवाही आहे. ठराविक कालखंडाला युग ासे म्हणतात. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगे आपल्या परिचयाची आहेत. मी त्यात आणखी तीन युगांची भर घहालीत आहे.

अवर्गिकृत

जनकल्याण समिती, अलिबाग, रायगड

Category:

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती गेले १२ वर्षे अविरतपणे आदिवासींच्या जीवनात सौख्याचे व आशेचे रंग उधळण्यासाठी झटत आहे व आज इतक्या वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर व साधनेनंतर या समितीने रायगड जिल्हयात २५० सशक्त आरोग्य रक्षकांची भक्कम फळी उभी केली आहे. हे आरोग्य रक्षक अगदी दुरवरच्या आदिवासी पाडयांमध्ये जातात, भाषेचा अडथळा असून सुध्दा तिथल्या कुटूंबांशी संपर्क साधतात, त्यांच्या अडचणी, समस्या, वेदना, दुःख व त्यांच्या जीवनाचे जळजळीत वास्तव समजावून घेतात, त्यांना आरोग्य विषयक व वैयक्तिक शारिरीक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतात.

अवर्गिकृत

रामकृष्ण मिशन सेवा समिती, अलिबाग

Category:

 

समाजकार्य करताना आपण जे काम करतो आहे, व ज्यांच्यासाठी करत आहे त्यांच्याविषयी मनात प्रेम, आत्मीयता व स्थिरता हवी. निश्चलपणे व आजुबाजुला असलेल्या अडथळयांची तमा न बाळगता इतरांसाठी झटणारे समाजसेवक त्यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तींना अजिबात घाबरत नाहीत. त्यासाठी लागणारे असामान्य धैर्य, स्वतःच्या तत्वांवर असलेला प्रचंड आत्मविश्वास, इतरांसाठी काहीतरी भव्य-दिव्य करण्यासाठी लागणारी जिद्द व अखंड सेवाभाग या सर्व गोष्टी अंगी बाणवण्यासाठी मनात शुध्दता व शरीरात बळ हवं असतं. जरी सर्व धार्मिक संघटना समाजातील तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी झटतीलच असं नाही, परंतु आध्यात्मिक व धार्मिक प्रवचनांमुळे व सत्संगामुळे आपल्याला मनाला स्थैर्य मिळत, चंचलता कमी होते, आपल्या पुढचा मार्ग अगदी धुतलेल्या काचेसारखा चकचकीत दिसायला लागतो, जीवनाच्या निराशावादी, काळोख्या कप्प्यांमध्ये सुध्दा आशेचे काजवे चमचमायला लागतात, मनाला नवी उमेद व उभारी येते, इतरांची सेवा करताना कधीतरी डोकावणारे स्वार्थी व आत्मकेंद्रीत विचारसुध्दा बंद होतात, व प्रसिध्दीच्या आर्कषणापासून मनुष्य हळुहळू लांब होत जातो.

अवर्गिकृत

श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम

Category:

 

वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.

अवर्गिकृत

सखी, अलिबाग

Category:

 

मुक्तांगण ही संस्था चालु करुन लहान मुलांमधील मुलपण जपण्याचा प्रयत्न करीत असताना सौ स्वाती लेले यांनी अधिक खोलात जावून तळागाळातील महिलांच्या उन्नतीसाठी सखी चा मंच उभारायचे ठरवले व या कामी त्यांना त्यांच्या जीवाभावाच्या तेरा मैत्रिणींची साथ मिळाली. सखी ने कुठलीही जहिरातबाजी न करता अलिबागमधील गरजु महिलांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना नियमीत रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

अवर्गिकृत

मुक-बधिर शाळा, अलिबाग

Category:

 

कुठलीही सुंदर गोष्ट हृदयात साठवून तिचा अनुभव घेण्यासाठी ऐकण्याच्या शक्तीची खुप गरज असते. नुसतं पावसात भिजणं, आणि त्या पावसाचा आणि कडाडणार्‍या विजांचा आवाज शांतपणे ऐकत भिजणं यात खूप फरक असतो. आईची पाठीवर प्रेमाची थाप पडली तर आपल्याला बरं वाटतच, परंतु जोडीला तिचे प्रेमाने ओथंबलेले शब्द कानांवर पडले तर आपला आनंद अजून द्विगुणीत होतो.