अमृतवेल – नाबाद १५०!
Category:
लेखसंग्रहमुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर बुधवारी रात्री ८.३० वा. प्रसारित होणार्या ‘अमृतवेल’ या साहित्यविषयक कार्यक्रमात कथा-कविता विविध साहित्यिकांच्या मुलाखती आणि लेखनविश्वाच्या नव्या-जुन्या प्रवाहांचा वेध घेतला जातो. या या रसिकप्रिय कार्यक्रमाने १५० भागांचा टप्पा नुकताच पार केला. अमृतवेलच्या आगामी कार्यक्रमात ‘काव्यांजली’ हा कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांवर विशेष कार्यक्रम तीन भागांत लवकरच प्रसारित होणार आहे. २, ९ आणि १६ फेब्रुवारी रोजी या तीन भागांचं प्रसारण होणार आहे. यात ज्येष्ठ कवी शंकर वैद्य आणि डॉ. घनश्याम बोरकर हे सहभागी होणार आहेत.