रश्मी पुराणिक

रश्मी पुराणिक ह्या ई टी. व्ही. या आघाडीच्या वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या अतिशय चपळ व हुषार तरूण पत्रकार आहेत. पत्रकार म्ह्टला की त्याला समाजसेवकाचे अंग हे लागतेच. तळागाळातील महिला व पुरूष यांच्या खर्‍या, व वास्तवदर्शी जीवनांचे पारदर्शी चित्रण शहरी व सुसंस्कृत लोकांसमोर आणणे वाटते तेवढे सोपे काम नसते. त्यासाठी डोंगरदर्‍या पालथ्या घालुन दुरवरच्या गावांमध्ये निवासी व फलदायी मुक्काम करावा लागतो. तेथील लोकांच्या समस्या व दुःखे प्रत्यक्ष अनुभवावी लागतात, त्यांच्याशी कौशल्यपुर्ण पध्दतींनी संवाद साधावा लागतो.



रश्मी पुराणिक ह्या झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या वरिष्ठ पत्रकार असून त्याआधी त्या ई टी. व्ही. मराठी वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करत होत्या.

प्रवासाची व भटकंतीची उपजत असलेल्या रश्मी यांना अशा वाहिनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शोधमोहिमा व निवासी ग्रामभेटींमध्ये खुप रस असतो. पत्रकारिता हे त्यांचे लहानपणापासुन आवडते क्षेत्र असल्यामुळे, व सळसळता उत्साह त्यांच्या प्रत्येक कार्यातुन आजवर उमटत आल्यामुळेच, की काय परंतु या काहीशा पुरूषप्रधान क्षेत्रात त्या यशस्वीपणे आपले अटळ स्थान निर्माण करू शकल्या आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ए. व्ही. स. विद्यामंदीर विरार येथे झाले तर एस. के. सोमैय्या या कॉलेजमध्ये पत्रकारितेची डिग्री संपादन केल्यानंतर कुठलाही प्रत्यक्ष अनुभव किंवा विशेष प्रशिक्षण गाठीशी नसताना त्या लगेचच ई टी. व्ही. वाहिनीसाठी रिपोर्टर म्हणून रूजु झाल्या होत्या. हे धाडसी पाऊल उचलल्या नंतर केवळ चुका व शिका या तत्वाच्या बळावर त्या या क्षेत्रातील सारे बारकावे व खाच खळगे अगदी उत्तमरित्या व सफाईदारपणे शिकल्या. एखाद्या व्यवसाय करण्याचा उत्साह व हुरहुर असली, की सराईतपणा व कौशल्येदेखील वेळ आल्यावर हात जोडुन येतात हे त्यांच्या आजवरच्या प्रवासावरून स्पष्ट होते.

Author