लेखसंग्रह

२५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन १३ ते १५ जानेवारी दरम्यान मुंबईत होणार

Category:

 

पक्षीनिरीक्षण आणि पक्षीसंवर्धन या विषयी जनमानसात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने गेली चोवीस वर्ष महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन’ आयोजित केले जात आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने पहिल्यांदाच हे संमेलन मुंबईत १३, १४, १५ जानेवारी २०१२ रोजी संजय गाधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे संपन्न होत आहे.

लेखसंग्रह

८१ वर्षांची राणी..दख्खनची राणी

Category:

 

पुणे मुंबई प्रवास करणार्‍या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली…

लेखसंग्रह

“प्रिय अमुचा ‘एक’ महाराष्ट्र देश हा”

Category:

 

महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.

लेखसंग्रह

“मृत्युंजय”कारांचा जन्म

Category:

 

मग तुम्ही आमच्या कोल्हापूरचेच आहात म्हना की !,आपल्या निळ्या कोचावर ऐसपैस बसत गदिमा खास कोल्हापुरी हेल काढून म्हणाले आणि समोरच्या खुर्चीतील तरुण आश्चर्याने त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला.

अवर्गिकृत

“रोमहर्षक ढाक बहिरी ट्रेक”

Category:

 

तुझ्यापासुन सुरु होउन तुझ्यातच संपलेला मी; माझे मीपण हरवून तुझ्यात हरवलेला मी…. जेव्हापासुन तु(सह्याद्री) आयुष्यात आलिस तेव्हापासुन असंच वाटु लागलंय.. कूठुन आलोय, कुठे जायचयं, दिशाहीन भरकटलेल्या नावेसारखा या माणसांच्या समुद्रात मी वाहत चाललो होतो…तुझ्या येण्याने निदान प्रवाह तरी मिळाला.. …

अवर्गिकृत

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार

Category:

 

नुकतीच भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.

अवर्गिकृत

संपर्क – सामाजिक संस्था, पेझारी

Category:

 

बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्‍या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O.