आठवले का कोण ते? (वात्रटिका)
Category:
अवर्गिकृतलोकसभेत अडले,विधानसभेत पडले…….(वात्रटिका)
Category:
अवर्गिकृतलोकसभेत अडले,विधानसभेत पडले…….(वात्रटिका)
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
अवर्गिकृतअहाहऽआ काय सुंदर उद्यान ! उंच उडणारी कारंजी, पुष्कराणी, तर्हतर्हेची फुलझाडे – फळझाडे, थंडगार हवा दाट झाडांची सावली, पक्ष्यांचे मंजुळ कुंजन… मन उल्हसीत करणारा सगळा देखावा. जणू स्वर्गातलेच उद्यान असावे असा भास व्हावा.
Category:
साहित्य - ललितरात्री आईजवळ झोपण्यावरुन लहान मुलांमधे होणारी भांडणं ही तर प्रत्येक घराची खासियतच आहे. प्रत्येक घरातील मुलांचा आणि आयांचा प्रकार वेगवेगळा असला तरी भांडणं मात्र तीच. प्रत्येक मुलाला वाटत असतं आईने आपल्याच जवळ झोपावं आणि झोपताना फक्त आपल्याशीच बोलावं. समजा, घरात दोन मुलं असली आणि आई जर दोन मुलांच्या मधे झोपली, तरी प्रत्येक मुलाला वाटतं आईने माझ्याचकडे पाहून बोललं पाहिजे. अशावेळी आईची चिडचिड होते.
Category:
साहित्य - ललितघरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात.
मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोर्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,‘आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’
Category:
साहित्य - ललित“ताठ बस. पोक काढू नकोस. बसल्यावर पाठीचा मणका ताठ हवा.”“अरे असा काय चालतोस पोक्या सारखा? जरा छाती पुढे काढून चाल.”“साधं जेवता येत नाही तुला. चार नव्हे पाच बोटांनी घास घे.”“पुस्तकाला पाय लागला तर नमस्कार करावा,इतकी पण तुला अक्कल नाही?” वरील वाक्ये कुणी कुणास म्हंटली असतील?
Category:
साहित्य - ललितलहान मुलांमधे उपजतच कुतूहल आणि जिज्ञासा असते. जसजशी मुले मोठी होऊ लागतात तसतशी त्यांची जिज्ञासाही वाढते.आणि त्यातूनच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी ही मुले प्रेरित होत असतात.
Category:
साहित्य - ललितहिंदीत ‘शिक्षा’ चा अर्थ शिक्षण. आणि शिक्षा शब्दाचा मराठी अर्थ काय? हे सांगण्याची अजिबात गरज नाही. कारण अनेक पालकांनी त्यांच्या लहानपणी ‘शिक्षा’ या शब्दाच्या अनेक अर्थछटा अनुभवल्या आहेत,चाखल्या आहेत,गिळल्या आहेत, अंगावर मिरवल्या आहेत आणि कपड्याखाली लपवल्या पण आहेत. आणि मग उगाच परंपरा खंडित होऊ नये म्हणून याच कल्पक पालकांनी शिक्षेत काळानुरुप बदल करुन त्या आपल्याच मुलांपर्यंत ताकदिने पोहोचविल्या आहेत. मुलांशी गप्पा मारताना शिक्षेचे विविध प्रकार कळले तेव्हा अचंबितच झालो. शास्त्रीय संगीतात ज्याप्रमाणे घराणी आहेत त्याप्रमाणेच या शिक्षा प्रकारात तीन मुख्य घराणी आहेत. त्या त्या घराण्याप्रमाणे शिक्षेचे राग, ठुमरी, टप्पा, ख्याल किंवा फ्युजन असे स्पेशलाइज्ड प्रकार आहेत. ‘घर,शाळा आणि क्लास’ ही शिक्षेची मुख्य उगमस्थाने किंवा घराणी!! संजानाची निबंधाची वही वाचत असताना,जाणवलं की, तिने नवीन निबंध अत्यंत खराब अक्षरात लिहिला आहे.
Category:
लेखसंग्रहतो’ म्हणतो, तू इतर मुलींसारखी मेकअप करत जा… मोजकेच कपडे परिधान करत जा… केस कशाला वाढवतेस…. केस तू कापलेच पाहिजे. असा ‘त्याचा’ हट्टाहास असतो. एवढेच नव्हेच लग्नाअगोदर ‘एकत्र’ आलो तर बिघडतंय कुठे? असे म्हणून तो हळूहळू पाय पसरवत असतो. अन् ‘ती’ मात्र मन मारत त्याच्या भावनामध्ये अडकतच जाते. तिला ‘तो’ सांगतो, तसं करावंच लागतं….
Copyright © 2025 | Marathisrushti