ललिता पञ्चकम् – मराठी अर्थासह
Category:
लेखसंग्रहश्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे.