साहित्य - ललित

सिमटी हुई ये घडियां’ – नात्यांचा लेखाजोखा !

Category:

 

सांगलीत वालचंदला असताना आम्ही “चम्बल की कसम ” नामक एक पडेल चित्रपट पाहिला तो खय्याम आणि साहिर या जोडगोळीच्या एका हळुवार प्रेमगीतासाठी ! अन्यथा राजकुमार, त्याला प्रतिकूल मौशुमी आणि होडीवाला ठोकळा शत्रुघ्न असलं कॉम्बिनेशन बघणं नजरेला फारसं आल्हाददायक नव्हतं.

  February 14, 2021


लेखसंग्रह

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग १

Category:

 

पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते.

  February 14, 2021


साहित्य - ललित

विक्रम – वेधा

Category:

 

आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी.

  February 13, 2021


साहित्य - ललित

डिकोस्टा ! (गूढकथा)

Category:

 

परदेशातला, बहुदा त्यागराजचा हा शेवटचा प्रोजेक्ट होता. तो सध्या वयाच्या पन्नाशीच्या टप्यात होता. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या आजून दक्षिणेला, श्रीलंकेच्या आधिपत्यातल्या, एका नगण्य बेटावर, तो प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून आला होता. या खडकाळ आणि डोंगराळ बेटावर काही ब्रिजेस बांधायची होती. भारतातल्या कॉन्स्ट्रक्शन कंपनीने त्याला पाठवले होते. याला दोन कारणे होती. एक तर तो सडाफटिंग होता. कुटुंब बायका पोर! काही पाश नव्हते. कारण त्याचा ‘कुटुंब’ व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. आजाद पंछी! सुख पैशात खरेदी करता येतात, हे याच जगाने, त्याला शिकवले होते. आणि दुसरे कारण त्याची भटकंतीची हौस!

  February 12, 2021


कथा

स्वप्नबंध (कथा)

Category:

 

स्नेहा … वय वर्ष ३२..व्यवसायाने फिटनेस ट्रेनर . शहरातल्या एका नामांकित जिम मधली एक कुशल फिटनेस ट्रेनर म्हणून ती प्रसिद्ध होती. स्नेहा ने अनेकांना फिटनेस फ्रीक करून सोडलेलं…लोकांना व्यायामाची गोडी कशी लावायची याची स्नेहाला उत्तम जाण होती आणि म्हणूनच तिला इतर ठिकाणहून खूप ऑफर्स येत असत. पण जिथे पहिली संधी मिळाली त्या कामालाच सर्वस्व मानून तिथेच कार्यरत रहायचयं आणि बाकी कामं फ्री लान्स पद्धतीने सुरु ठेवायची असं  तिचं ठरलेलंच होतं. मुळात चार दगडांवर पाय ठेवण्याचा तिचा स्वभाव नव्हताच मुळी . एक काम घेऊन त्यातच झोकून देण्याची तिची वृत्ती अनेकांना भावत असे.

  February 12, 2021


कथा

प्रवास… एक प्रेम कथा

Category:

 

रिक्षातून प्रवास करत असताना प्रतिभाने विजयचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू तिचा नाद सोडत का नाहीस ? ती कोठे ?  तू कोठे ?? नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकीही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं ! तू किती हुशार ! उद्या जग तुझी दखल घेईल !  हे तिच्या गावातही नसेल.

  February 12, 2021


साहित्य - ललित

अर्थसंकल्प आणि झिपऱ्या !

Category:

 

झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता.

  February 12, 2021