व्यक्ती-परिचय

आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

Category:

 

नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.

लेखसंग्रह

वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती

Category:

 

आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का?

व्यक्ती-परिचय

जागतिक दृष्टीदान दिवस – १० जून

Category:

 

अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे.

लेखसंग्रह

हाय’ आणि ‘बाय’ च्या मधील ‘फिर जिंदगी’

Category:

 

२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे.

साहित्य - ललित

ठाकूर मॅडम

Category:

 

बाबांची वर्धा पोलीस स्टेशन वरून मनमाड पोलीस स्टेशनला बदली झाल्यावर आम्ही कल्याणजवळच्या आमच्या गावातून मनमाडला राहायला गेलो. बाबा पोलीस अधिकारी असूनसुद्धा मला पहिलीला गावातल्याच मराठी आणि त्यातल्या त्यात झेड पी च्या शाळेत घातले होते.

साहित्य - ललित

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)

Category:

 

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे..

साहित्य - ललित

कुंकू… काल आणि आज

Category:

 

भारतीय स्त्रीला सौभाग्याच्या या लेण्याची पूर्वापार परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे. खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरुन त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे. राजा रवीवर्माच्या अनेक देवी, अप्सरा, ऋषिकन्यांच्या चित्रांतून आपण त्यांच्या कपाळावर लाल रंगाची खूण पाहिलेली आहे.