लेखसंग्रह

रम्य ते बालपण : धनराज खरटमल

Category:

 

साठच्या दशकात कुर्ल्यातल्या माळरानावर आम्ही राहायला आलो तेव्हा माझ्या बाबांनी जागा घेऊन तेथे एक चाळ बांधली होती. मुंबईत कधी काळी माळरानेही अस्तित्वात होती हे वाचून खरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सभोवार उघडे माळरान आणि आसपास काही चाळी.

  July 3, 2022


लेखसंग्रह

मिस तनकपुर हाजीर हो !

Category:

 

म्हशीचं नांव “तनकपुर ” आणि तेही “मिस ” म्हटल्यावर अपेक्षेप्रमाणे चित्रपट निघाला- यंत्रणांवर कोरडे मारणारा ! फार पूर्वी “जाने भी दो यारो ” नामक ब्लॅक कॉमेडी कॅटॅगिरीतील चित्रपट निघाला होता – त्यांतील लक्षणीय “भक्ती ” आता लोपलीय. मात्र ” मिस तनकपुर ” एक पाऊल पुढे टाकत आपल्या पोलीस आणि न्याय यंत्रणेवर कोरडे ओढतो. तसं तर अलीकडे “गंगाजल “मध्येही पोखरलेल्या कायदा -सुव्यवस्थेच्या “खांबांवर” बोट ठेवलं होतं. इथेही सगळे कोळून प्यायलेले यच्चयावत महाभाग भेटतात.

  July 3, 2022


साहित्य - ललित

एक सांगीतिक प्रवास

Category:

 

“मुक्काम पोस्ट १०००”  या माझ्या – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने माझी पत्नी सौ प्रियांका जोशी यांनी लिहिलेली ही कविता… हे तिचं मनोगतच…

  July 3, 2022


साहित्य - ललित

दोन घडीचा डाव

Category:

 

ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..

  July 3, 2022


कथा

घडीचं जीवन

Category:

 

फोल्डिंगच्या खुर्च्या बघितल्या होत्या. पण भिंतीत घडी होणाऱ्या खुर्च्या  सरळ भिंतीत उभ्या राहतात आणि छोटेखानी दिवाणाची जागा मोकळी होते. भिंतील खेटून उभ असलेल पुस्तकाच कपाट रात्र झाली की आडव होत

  July 3, 2022


कथा

त्याच्या पत्नीची मृत बहिण (संक्षिप्त रूपांतरीत कथा ३०)

Category:

 

असे अनेक कलाकार, साहित्यिक, सिने दिग्दर्शक, चित्रकार होऊन गेले की ज्यांची एखादी निर्मिती लोकांनी डोक्यावर घेतली व पुढे तो तशीच उत्तम निर्मिती न केल्यामुळे नामशेष झाला. कांही “वन फील्म वंडर” नट, दिग्दर्शक होऊन गेले. लेखकाने ही गोष्ट ह्याचा उपहास करण्यासाठी लिहिली आहे. सारखीच उच्च दर्जाच्या निर्मितीची अपेक्षा चुकीची आहे, हे त्याला सांगायचं आहे. “लेडी आॕर टायगर” (वाघ की सुंदरी) ही पूर्वी आलेली कथा फ्रँक स्टॉकटनचीच आहे.

  July 3, 2022


साहित्य - ललित

निपटारा – भाग  4

Category:

 

मालशे मॅडम म्हणजे आमच्या फिजिकल ट्रेनर आणि स्पोर्टस् विभाग प्रमुख. खूप सिनियर. पण उत्साह दांडगा. ट्रेकिंग कँप, पिकनिक वगैरे प्रोग्रॅम त्यांच्या खास आवडीचे. विद्यार्थ्यांमध्ये जाम पॉप्युलर. पण दिवाळीच्या सुटीमध्ये त्यांचे येणे जरा अवघडच वाटत होते. आमची योजना बारगळते की काय असे वाटले. पण त्या लगेच तयार झाल्या. अर्थात त्या आल्यामुळेच आमच्या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता होतीच. पण ते पुढचे पुढे. आता आमची योजना ‘स्थळ’ पक्क होणे या टप्प्यावर होती आणि तो टप्पा आम्ही विनासायास गाठला होता. मालशे मॅडमचा अडसर कसा दूर करायचा ते ठरवायला आमच्याकडे खूप वेळ होता. आताच कशाला काळजी? अर्थात त्यांच्या येण्याने मनोजसरांच्या चाळ्यांना थोडा आळा बसणार हेही खरे होतेच. मी ग्रुपला म्हणाले, “अरे सध्या परवानगी तर मिळाली. त्यातून कसा मार्ग काढायचा ते पाहू. अजून आठ दहा दिवसांचा अवधी आहे. पाहू, काहीतरी मार्ग सापडेलच.’

  July 2, 2022


लेखसंग्रह

म्युझियम्स आणि फिरती रेल – प्रदर्शने

Category:

 

१९८० साली जगातील उत्कृष्ट रेल युरेल (युरोप रेल्वे) ने प्रवास करीत असताना उत्तम रेल्वे काय असू शकते याचा ‘याची देही याची डोळां’ अनुभव आला. जर्मनीतील म्युनिक येथील जगप्रसिद्ध म्युझियममधील रेल्वेदालन ही त्याचीच छोटी प्रतिकृती आहे.

  July 2, 2022


लेखसंग्रह

कुटुंब आणि परिवार

Category:

 

माणसामाणसांच्या नात्यातून कुटुंब बनते, तर नात्यांपलीकडील भावनांतून परिवार घडतो. परिवार उमजायला भावनांची गरज असते. कुटुंब आणि परिवार यातील परस्पर भिन्नता, पूरकता विषद करणारा, व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख

  July 2, 2022