रुद्रा – कादंबरी – भाग १३
Category:
साहित्य - ललितआनंद टी सेंटर’ सारखा चहा, जगाच्या पाठीवर कोठेच मिळत नाही असे जसवंतचे व्यक्तिगत मत होते. पुडी लावून झाली ली तो हळूच येथे यायचा. आणि एक ‘कडक मिठ्ठी’ चहा ढोसायचा! गंजावर गोड खाल्लेकि माणूस लवकर हवेत तरंगतो, हे त्या मागचे छुपे तत्व होते. इतरांच्या चहात दीड चमच्या साखर टाकणारा भट्टिवाल कार्ट जसवंतच्या चहात तीन चमचे टाकत असे. नेहमीच्या गिऱ्हाईकाच्या खोड्या अश्या लहान सहान ‘हाटेली’त जपल्या जातात. जसवंत येऊन बसल्या बरोबर त्याने ‘कडक मिठ्ठी’ची ऑर्डर दिली. आज तो बेचैन झाला होता. आता संतुकराव मेले होते. कीतीही नाही म्हणले तरी मनोहरचा या खुनात हात नक्की होता! त्याला चिंता होती ती फुकट मिळणार गांजा बंद होणार याची. मनोहर खुनाच्या रात्री संतुकराव येण्या पूर्वी त्या आऊट हाऊस मध्ये काही काळ होता! जसवंतने याचेच भांडवल करण्याचे नक्की केले. इतके दिवस मनोहर आपल्या जवळच्या माहिती साठी ‘माल’ देत होता, आता हि तो देतच रहाणार होता! आत्तापर्यंत माहित सांगण्यासाठी द्यायचा आता, असलेली ‘माहिती’ न सांगण्याबद्दल ‘माल’ देणार होता! त्याने मनोहरला फोन लावला .
March 19, 2019