नवरात्रीचा रंग – गहन निळा
Category:
लेखसंग्रह
October 2, 2019
Category:
लेखसंग्रह
October 2, 2019
Category:
लेखसंग्रह
October 2, 2019
Category:
लेखसंग्रहमुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.
October 2, 2019
Category:
कथा साहित्य - ललितरितीरिवाज , परंपरांच्या बेडया , पिढयानपिढया चालत आलेले संस्कार .. सगळ्या सगळ्याची बंधन तोडून आपल्या लेखनाच्या माध्यमातून खुल्या आसमंतात श्वास घेण्याची .. मुक्त विहरण्याची जबरदस्त किंमत चुकवणारी … आपल्या मायभूमीला पारखं होऊन दुसऱ्या देशात आश्रयाला जाऊन रहाणं तिच्या प्राक्तनात लिहीलंय …. जिथं ती जन्मली ,वाढली ,लहानपणीचे निरागस सुंदर क्षण जगली त्या गावात , त्या नदीकिनारी , त्या शेतांमधे , त्या माणसांमधे ती परत जाऊ शकणार नाही इतकी व्यवस्था करून ठेवलये तिच्या आपल्या देशातल्या माणसांनी …. मातृभूमीपासून दुरावली ती .. तिच्या लेखनातून व्यक्त होण्याच्या बंडखोरीला ही शिक्षा ? तिच्या सच्च्या , वर्मावर बोट ठेवणाऱ्या शब्दांनी घायाळ झालेले तिला फासावर लटकवायला टपलेत … तसं बघायला गेलं तर तिचं माझं सगळच भिन्न , काही म्हणजे काही जुळणारं नाही अगदी काही बाबतीत विचारही … पण शब्दांतून व्यक्त होण्याची तिची पद्धत … तिचं आपल्या विचारांवर ठाम रहाणं .. लिहीतांना एक एक शब्द फक्त तिचाच .. तिच्या मालकीचा .. तिचा दास … जस वाटेल अगदी तसंच व्यक्त होणं …. पारदर्शी ! हेच कुठेतरी मला फार भावतं … मनानं तिच्या जवळ नेऊन पोहोचवतं … कुठ्ला खोटेपणा नाही की लपवाछपव नाही … दांभिकता नाही … मनात येणाऱ्या नैसर्गिक भावभावनांना जाणून त्या लिहून व्यक्त करणे म्हणजे त्यांना योग्य न्याय मिळणे … अभिव्यक्त स्वातंत्र्य तिने स्वःताचं स्वःताच पुरेपुर मिळवलंय …. मी आहे ही अशी आहे … माझे विचार असे आहेत माणि मी ते मांडत रहाणार … तुम्हाला आवडो वा ना आवडो …
तिच्या लेखनाचा झंझावात माझ्या विचारांची बैठक कधी कधी मुळापासुन हादरवून टाकतो … गदागदा हलवतो …. सोशिकतेच्या
सीमांविषयी पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाडतो .. माझ्या पासून शेकडो मैल लांब कुठेतरी असलेली ती पार कब्जा घेते माझ्या मनाचा … झिम्मा घालत रहाते माझ्या मनाच्या अंगणात … मला थोडीशी चिडवत … मी मात्र तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करत रहाते ..
October 1, 2019
Category:
लेखसंग्रहब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली.
October 1, 2019
Category:
लेखसंग्रहदेवीचं अतिशय शांत आणि सात्विक दर्शन झालं … देवस्थानचे ट्रस्टी भेटले … त्यांनी कल्पना करता येणार नाही इतकी सुंदर व्यवस्था केली … निवांत आणि सुंदर दर्शन घडवलं … मनोभावे फोटो काढता आला …प्रसादाचा त्रयोशगुणी विडा दिला ….
October 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteजुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.
October 1, 2019
Category:
साहित्य - ललितएका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो.
October 1, 2019
Category:
साहित्य - ललितआद्य वाल्मिकी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे महान कवि, गीतकार, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ चा. त्यांची जन्मशताब्दी आज संपन्न होते आहे. त्यांनी बालगंधर्वांविषयी लिहिलेल्या ओळी (असा बालगंधर्व आतां न होणे) सुप्रसिद्ध आहेत. त्याच धर्तीवर मी गदिमां विषयी स्वरचित कांही ओळी खाली देत आहे.
October 1, 2019
Category:
लेखसंग्रहबांगलादेशी घुसखोरांनी पश्चिम बंगाल, आसामसह महाराष्ट्र-मुंबई, ठाण्यातही बस्तान बसवल्याचे अनेकदा उघड झाले आहे.केंद्र सरकारने जास्त घुसखोरी झालेल्या राज्यांत ‘एनआरसी’ची प्रक्रिया राबवावी, बांगलादेशी घुसखोरांना हुडकून काढावे आणि त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी.
October 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti