व्यक्ती-परिचय

मोहन जोशी

Category:

 

‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

व्यक्ती-परिचय

मोहन श्रीनिवास पेंडसे

Category:

 

एम्.ए./२५ वर्षं संगीत क्षेत्रात कार्यरत. हिंदुस्तानी संगीत व्हायोलीनवादक. भारत सरकारची संगीत साधनेसाठी शिष्यवृत्ती. सुरसिंगार संसदचा सूर-मणि पुरस्कार. पेंडसे म्युझिक अकादमी द्वारे संगीताचा प्रसार.

व्यक्ती-परिचय

मुकेश माचकर

Category:

 

मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.

व्यक्ती-परिचय

मेघश्याम पुंडलिक रेगे

Category:

 

भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते.

व्यक्ती-परिचय

यतीन कार्येकर

Category:

 

यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.

व्यक्ती-परिचय

मुक्ता बर्वे

Category:

 

२०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत.

व्यक्ती-परिचय

मुकुंदराज देव

Category:

 

युवकांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, तबलावादक श्री. मुकुंदराज देव म्हणजे भारतीय संगीताची झेप सात समुद्रपार नेणार्‍या अनेक रत्नांपैकी एक रत्न.

व्यक्ती-परिचय

मुरलीधर देविदास आमटे (बाबा आमटे)

Category:

 

समाजसुधारक, विचारवंत, कवी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे अफाट काम उभारणारे एक भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मुरलीधर देविदास आमटे तथा बाबा आमटे. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.