डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, पुणेकरांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे.
अच्युतराव पटवर्धन यांनी स्थापलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याला त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले आणि ‘वनस्थळी’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना तेथील मुलामुलींनाच बालवाडय़ा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करते. सुटीच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन, फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनची स्थापना, ग्रामीण भागातील बालवाडय़ांमधील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, शालाबाह्य युवकांसाठी सुतारकाम व प्लंबिंगच्या प्रशिक्षणाचे वर्ग, अशा अनेक प्रकारे निर्मलाताई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेली पाच दशके कार्यरत आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठीचे विविध उपक्रम आखणे हा त्यांच्या कार्यातील अविभाज्य भाग. हे करत असताना आपण काही वेगळे, मोठे करत आहोत, याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर असत नाही. प्रसिद्धीच्या वलयाची पुरेपूर जाणीव असूनही त्या त्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरल्या. वृत्तपत्रात छायाचित्रे छापून येण्यासाठी आपण काम करता कामा नये, यावर त्यांचा सतत भर असतो. ‘माणूस’ या मराठीतील एकेकाळच्या महत्त्वाच्या साप्ताहिकात दोन दशके संपादकीयकाम केल्यामुळे नजर विस्तारणे स्वाभाविक होते. निर्मलाताईंनी त्या वैचारिक अधिष्ठानाला प्रत्यक्ष कामाचीही जोड दिली. भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ फ्रान्स’ या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या. अनेक पुरस्कार मिळूनही त्याकडे निर्लेपपणे पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते. अभिजात कलांबद्दल ममत्व असणाऱ्या निर्मलाताईंना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या मोठय़ा परिवारालाही आनंद होणे स्वाभाविक आहे.
गेली तीसहून अधिक वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणार्या निर्मला पुरंदरे यांनी 'वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा'च्या माध्यमातून खेड्या-पाड्यांतील अनेक हातांना एकत्र बांधले आहे. त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलीच परिचित आहे.
डॉ. अच्युत आपटे यांनी स्थापन केलेल्या 'विद्यार्थी सहाय्यक समिती'मध्ये निर्मलाताई सुरुवातीपासून सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये शिकायला येणार्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना यामुळे झाली. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करत असतानाच, विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. निराश्रित बालकांसाठी 'आयआयएम' या ट्रस्टच्या माध्यमातून 'बालसदना'ची निर्मिती त्यांनी केली. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून थांबायचे नाही तर तिथे शिकविणार्या शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच 'वनस्थळी'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर, राज्याच्या ठराविक भागांत हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारत गेले.
सुमारे अडीचशे बालवाड्या आणि ११ हजारांहून अधिक प्रशिक्षित बालवाडी शिक्षिका ही निर्मलाताई आणि त्यांनी 'वनस्थळी'द्वारे केलेल्या कार्यातून निर्माण झालेली 'संपत्ती' आहे. भांडवल आणि खर्चाचे आकडे याचा आधार न घेता मनुष्यबळावरचा विश्वास आणि त्यांच्या हातांची साथ, यावर ही संपत्ती उभी राहिली आहे. यामध्ये अर्थातच निर्मलाताईंच्या निर्मळ आणि पारदर्शी स्वभावाचे संचितही आहे, हे विसरून चालणार नाही! केवळ बालवाडी प्रशिक्षणापुरते वनस्थळी आणि निर्मलाताईंचे काम मर्यादित नाही; तर किशोर छंदवर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण आणि सध्या आरोग्य सेविका प्रशिक्षण, अशा उपक्रमांचा पसारा वाढतोच आहे.
'असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स' आणि यासारख्या इतर संस्थांमधूनही त्यांचे समाजाशी नाळ जोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत... आणि निर्मलाताईंच्या कोशात 'स्वस्थता' किंवा 'विश्रांती' याला अजिबातच स्थान नसल्यामुळे त्यांच्या कार्याचा गाडा अव्याहत सुरूच आहे... कोणत्याही प्रसिद्धीशिवाय!
त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
पुरंदरे, निर्मलाताई
डोळ्यातले सात्त्विक भाव आणि चेहऱ्यावरील स्निग्धता यामुळे क्षणात कुणालाही मनाच्या आतले काही सांगावेसे वाटावे, असे व्यक्तिमत्त्व निर्मलाताई पुरंदरे यांच्या ठायी आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात अव्याहतपणे त्या करीत असलेल्या कार्याला, पुणेकरांनी ‘पुण्यभूषण’ पुरस्काराच्या माध्यमातून दिलेली दाद म्हणूनच महत्त्वाची आहे.
अच्युतराव पटवर्धन यांनी स्थापलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या माध्यमातून ५० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याला त्यांनी संस्थात्मक स्वरूप दिले आणि ‘वनस्थळी’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना तेथील मुलामुलींनाच बालवाडय़ा चालवण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था काम करते. सुटीच्या काळात व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांचे आयोजन, फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनची स्थापना, ग्रामीण भागातील बालवाडय़ांमधील शिक्षकांसाठीचे प्रशिक्षण वर्ग, शालाबाह्य युवकांसाठी सुतारकाम व प्लंबिंगच्या प्रशिक्षणाचे वर्ग, अशा अनेक प्रकारे निर्मलाताई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेली पाच दशके कार्यरत आहेत. ‘इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट’ या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठीचे विविध उपक्रम आखणे हा त्यांच्या कार्यातील अविभाज्य भाग. हे करत असताना आपण काही वेगळे, मोठे करत आहोत, याचा मागमूसही त्यांच्या चेहऱ्यावर असत नाही. प्रसिद्धीच्या वलयाची पुरेपूर जाणीव असूनही त्या त्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरल्या. वृत्तपत्रात छायाचित्रे छापून येण्यासाठी आपण काम करता कामा नये, यावर त्यांचा सतत भर असतो. ‘माणूस’ या मराठीतील एकेकाळच्या महत्त्वाच्या साप्ताहिकात दोन दशके संपादकीयकाम केल्यामुळे नजर विस्तारणे स्वाभाविक होते. निर्मलाताईंनी त्या वैचारिक अधिष्ठानाला प्रत्यक्ष कामाचीही जोड दिली. भारत आणि फ्रान्स या देशांदरम्यान सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंडस् ऑफ फ्रान्स’ या संस्थेच्या त्या अध्यक्षही होत्या. अनेक पुरस्कार मिळूनही त्याकडे निर्लेपपणे पाहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवते. अभिजात कलांबद्दल ममत्व असणाऱ्या निर्मलाताईंना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या मोठय़ा परिवारालाही आनंद होणे स्वाभाविक आहे.
———————————————————————————————————
पुरंदरे, निर्मला
गेली तीसहून अधिक वर्षे अव्याहतपणे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांसाठी सर्वस्व देऊन झटणार्या निर्मला पुरंदरे यांनी ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या माध्यमातून खेड्या-पाड्यांतील अनेक हातांना एकत्र बांधले आहे. त्यांच्या या कार्याची महती ग्रामीण भागांत काम करणार्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगलीच परिचित आहे.
डॉ. अच्युत आपटे यांनी स्थापन केलेल्या ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’मध्ये निर्मलाताई सुरुवातीपासून सक्रिय होत्या. ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये शिकायला येणार्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव त्यांना यामुळे झाली. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त म्हणून काम करत असतानाच, विविध उपक्रमांमध्ये मार्गदर्शन करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. निराश्रित बालकांसाठी ‘आयआयएम’ या ट्रस्टच्या माध्यमातून ‘बालसदना’ची निर्मिती त्यांनी केली. मात्र, केवळ बालसदन किंवा बालवाडी निर्माण करून थांबायचे नाही तर तिथे शिकविणार्या शिक्षिकासुद्धा तयार केल्या पाहिजेत, हे ओळखून त्यांनी सहा महिन्यांचा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण वर्ग सुरू केला. त्यातूनच ‘वनस्थळी’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर, राज्याच्या ठराविक भागांत हे प्रशिक्षण वर्गाचे जाळे विस्तारत गेले.
सुमारे अडीचशे बालवाड्या आणि ११ हजारांहून अधिक प्रशिक्षित बालवाडी शिक्षिका ही निर्मलाताई आणि त्यांनी ‘वनस्थळी’द्वारे केलेल्या कार्यातून निर्माण झालेली ‘संपत्ती’ आहे. भांडवल आणि खर्चाचे आकडे याचा आधार न घेता मनुष्यबळावरचा विश्वास आणि त्यांच्या हातांची साथ, यावर ही संपत्ती उभी राहिली आहे. यामध्ये अर्थातच निर्मलाताईंच्या निर्मळ आणि पारदर्शी स्वभावाचे संचितही आहे, हे विसरून चालणार नाही! केवळ बालवाडी प्रशिक्षणापुरते वनस्थळी आणि निर्मलाताईंचे काम मर्यादित नाही; तर किशोर छंदवर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण आणि सध्या आरोग्य सेविका प्रशिक्षण, अशा उपक्रमांचा पसारा वाढतोच आहे.
‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स’ आणि यासारख्या इतर संस्थांमधूनही त्यांचे समाजाशी नाळ जोडण्याचे प्रयत्न सुरूच आहेत… आणि निर्मलाताईंच्या कोशात ‘स्वस्थता’ किंवा ‘विश्रांती’ याला अजिबातच स्थान नसल्यामुळे त्यांच्या कार्याचा गाडा अव्याहत सुरूच आहे… कोणत्याही प्रसिद्धीशिवाय!
त्यांना पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.