प्रमोद पारखी

पारखी, प्रमोद

जेव्हा औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत नव्हते, मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी या नावाची व्यक्ती आवश्यक वाटत नव्हती, तेव्हा प्रमोद पारखी यांनी एक उत्तम कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उद्योगांच्या विकासात आवश्यक असणाऱ्या या पदावरील व्यक्तीचे महत्त्व त्यांच्यामुळे लक्षात येऊ लागले.

पारखी यांनी आपल्या व्यवसायात जी सचोटी आणि कार्यक्षमता दाखवली, त्यामुळेच तर त्यांना द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्‍स अकौंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद १९८८ मध्ये भूषवता आले. कंपनी सेक्रेटरी म्हणून देशातील अनेक नामांकित कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करण्यापूर्वी पारखी यांनी भारत फोर्जसारख्या कंपनीत काही काळ याच पदावर नोकरीही केली. त्यांचा मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्याने पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी सुरुवातीला काही काळ कामही केले. परंतु त्यानंतरच्या काळात आपली ही भूमिका निभावण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनशास्त्राच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विषय समजावून सांगण्याची त्यांची पद्धत आणि तंत्र यामुळे पारखी हे एक लोकप्रिय ‘सर’ झाले. कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकौंन्टसी, फायनान्स मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही प्रमोद पारखी यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. कॉसमॉस सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये पारखी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील एक महत्त्वाची बँक म्हणून तिला नावारूपाला आणण्यासाठी पारखी यांनी खूप कष्ट घेतले. १९७८ पासून शेवटपर्यंत ते या बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि या काळात आठ वेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सामान्यांच्या मनात या बँकेविषयी विश्वास निर्माण होईल, इतकी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून या बँकेला आज जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामागे पारखी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. या बँकेचे संगणकीकरण आणि विकास यासाठी त्यांनी आपली सारी बौद्धिक क्षमता उपयोगात आणली. बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेकांना विश्वासाने सल्ला दिला आणि मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंगच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे, यात शंका नाही. पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीचे सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. जगातील २९ देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ पॅसिफिक अ‍ॅण्ड एशियन अकौंटन्टस या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होण्याचा बहुमानही पारखी यांनी मिळवला. त्यामुळे जगातील अनेक देशांत होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. पारखी यांच्या निधनाने एक अभ्यासू बँकर आणि तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Author