सा. रे. पाटील

पाटील, सा. रे.

ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती करीत आहेत. शेतीच्या मशागतीपासून त्यांनी आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या केलेल्या मशागतीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाला आकार येऊ लागला.

म्हणूनच वयाच्या तब्बल ८९ वर्षीही तरूणाच्या उत्साहाने कार्यरत असणाऱ्या सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार मिळणे यथोचितच ठरते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यात असलेल्या जांभळी या गावी ११ डिसेंबर १९२१ ला जन्मलेल्या अप्पासाहेबांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील रेवगोंडा पाटील यांच्याबरोबरच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्याचवेळी कुस्ती आणि मलखांब खेळू लागल्याने शरीरयष्टी उत्कृष्ट झाली. अफाट वाचन, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला. मित्रपरिवार मोठा असल्याने त्यातून त्यांना समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला पुढे महाराष्ट्रात झाला, पण १९४६ मध्ये जांभळी गावातील शेतक ऱ्यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना त्यांनी केली. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्याने ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही त्यातून झाला. शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी १९५१ मध्ये त्यांची निवड झाल्याने गावातील काम तालुका पातळीवर आले. या दरम्यानच संयुक्त महाराष्ट्राच्या सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान आदींच्या सान्निध्यात ते आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींचे साधना साप्ताहिक या चळवळीत ते रमू लागले. १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना शिरोळमधून उमेदवारी दिली. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले होते. १९९९ मध्ये आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कामही सुरूच होते. शिरोळला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या कारखान्याचे ते संस्थापक संचालक असून आजपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर २० पाणीपुरवठा योजनांची स्थापना त्यांनी केली. राजकारणातील कामगिरीसाठी एस. एम. जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती त्यांनी घेतली, तशीच सहकार क्षेत्रातील कामासाठीची स्फूर्ती त्यांना मिळाली ती धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांचे संचालक, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूलची स्थापना त्यांनी करून शिक्षण क्षेत्रावरही ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असतात. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या त्यांच्या कळकळीमुळेच ते ताजेपणाने विचार करू शकतात. कोणतेही नवे तंत्र ते स्वीकारण्यास अप्पासाहेब कायम तयार असल्याने सर्वात वयोवृद्ध आमदार अशी त्यांची ओळख न राहता उत्साहाने सळसळणारे तरूण आमदार-नेते अशी त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्यांच्या या सततच्या धडपडीला चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेला हा मुजरा सार्थच ठरतो.

Author