राजीव खांडेकर
Category:
व्यक्ती-परिचयस्टार माझा या वृत्तवाहिनीने टेलिव्हीजन प्रादेशिक प्रांतामधील अर्ध्याहुन अधिक जागा आपल्या गुणवत्तेच्या व इतकी वर्षे जपलेल्या विश्वासार्हतेच्या बळावर व्यापून टाकली असून प्रसिध्दीच्या, तंत्रज्ञानिक सरसतेच्या व निखळ मनोरंजनाच्या बाबतीत ही वाहीनी इतर वाहिन्यांपेक्षा चार हात पुढेच असते. या वाहिनीचा भक्कम पाया उभारण्यापासून ते विवीध रोचक व माहितीपर कार्यक्रम, उपक्रम, तसेच चर्चासत्रे आयोजित करून त्यावर सुवर्णकळस चढविणारे महाराष्ट्रामधील धडाडीचे व असामान्य आभ्यासुवृत्ती जपणारे पत्रकार म्हणजे राजीव खांडेकर.