आशुतोष सावे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे, तसेच ऑल इंडिया रेडिओ मध्ये बातम्यांचे वाचन, भाषांतर, व त्या बातम्या टी. व्ही. तसेच रेडिओ द्वारे प्रसारित करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे आवडीने केले आहे. बातम्या जेव्हा स्त्रोतांकडुन आकाशवाणीकडे येतात तेव्हा त्या विवीध भाषांमध्ये व कच्च्या स्वरूपाच्या असतात. अनेक तांत्रिक त्रुटी त्यांच्यात आढळुन येतात. या बातम्यांना व्यावसायिक साचा पुरविण्याचे व लोकांपर्यंत ह्या बातम्या निर्दोषरित्या पोहोचवणे हे काम त्यांच्या अखत्यारित यायचे.
आशुतोष सावे यांचा जन्म मुंबईत झाला. विरारच्या अण्णासाहेब वर्तक विद्यालयामध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर सावे यांनी पार्ल्याच्या मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. 1993 मध्ये रसायनशास्त्र हा विशेष विषय घेवुन बी.एस.सी., व 1995 मध्ये एम.एस.सी. या पदव्या घेवून ते द्विपदवीधर झाले. स्वभावाने ते अत्यंत मृदु आहेत. गांधी, शिवाजी महाराज व सावरकरांचे निस्सीम भक्त असलेल्या सावे यांनी आदर्श तत्वांनी प्रेरित झालेल्या साध्या व सरळ जीवनशैलीचा स्वीकार केला आहे. आपल्या पेक्षा लहान हुद्द्यांवर असलेल्या कर्मचार्यांना वाईट वागणूक देणे हा त्यांच्यामते जातीवादाचा एक प्रकार आहे.
सायकलिंग, बॅडमिंटन हे त्यांच्या जिव्हाळ्याचे क्रीडाप्रकार असुन बागकाम करणे ही तर त्यांच्यासाठी आनंदाची परमावधी असते. राजकारण, शिक्षण, पर्यावरण या क्षेत्रांचा बहुआयामी आभ्यास करण्याचा कयास ते फावल्या वेळेत करीत असतात.