मिलींद भागवत हे स्टार माझा या मराठीमधील सध्याच्या सर्वात जास्त चालणार्या वृत्त वाहिनीवर, निवेदक व पत्रकार म्हणून काम करणारे सर्वपरिचीत व लोकप्रिय असे सदस्य आहेत. बातम्या देण्याची त्यांची पध्दत, व ढब प्रेक्षकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा सदैव प्रसन्न चेहरा, व ओघवती भाषा या वैशिष्टांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आदराचे व हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
मिश्कील व आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे प्रसिध्द असलेले, मिलींद भागवत त्यांच्या चाहत्यांना, टी. व्ही. मधुन जेवढ्या जास्त वेळा भेटायला येतात तेवढं कदाचित कुणीही येतं नसेल. प्रसंगवधानीपणात तर त्यांचा हात धरणे केवळ अशक्य आहे. प्रेक्षकांना कंटाळा न आणता त्यांना खुर्च्यांवर खिळवूनं कसं ठेवायचं ही कला त्यांना चांगलीच अवगत आहे. व ह्याचा प्रत्ययही वारंवार येत असतो. मिलींद भागवत यांचा जन्म 21 जानेवारी, 1973 मध्ये झाला.
सरस्वती सेकंडरी स्कुलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले तर मुबई विद्यापीठामध्ये त्यांनी आपले पदवी शिक्षण घेतले. सात बाराच्या बातम्या, रिमोट माझा व ढॅणटॅढॅण अशा लोकप्रिय कार्यक्रमांची सुत्रे ते सांभाळित आहेत.