No Picture
व्यक्ती-परिचय

अरविंद टिकेकर

Category:

 

अरविंद टिकेकर मुंबई विद्यापीठाच्या गंथालयाचे मुख्य गंथपाल म्हणून इतरांसमोर प्रकाशात आले. या मानाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांच्या आवडीच्या गंथपालन शास्त्रात मन:पूर्वक रमले होते. किंबहुना, नोकरीपेक्षाही अधिक व्यग्र झाले होते. ज्ञानक्षेत्रातली वाटचाल टिकेकरांच्या रक्तात वारसाहक्कानेच आली होती. त्यांचे काका श्री. रा. टिकेकर यांचा विविध विषयांमधला अधिकार, त्यांची चिकित्सावृत्ती आणि अभिजात अभिरुची यांचा संस्कार अरविंद आणि अरूण या दोन्ही भावांवर झाला. अरविंद टिकेकर यांची गंथपाल म्हणून जी जडण-घडण झाली तीच मुंबई विद्यापीठाचे दंतकथा बनलेले मुख्य गंथपाल प्राध्यापक दारा मार्शल यांच्या हाताखाली. टिकेकर यांनी मार्शल यांचा हा वारसा सांभाळला, संपन्न केला.

No Picture
व्यक्ती-परिचय

विजय जाधव

Category:

 

पुण्याच्या नॅशनल फिल्म अर्काइव्हज्मध्ये डायरेक्टरच्या ऑफिसात, शास्त्रीय संगीत ऐकत कामात बुडून गेलेले विजय जाधव हे खरच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. जाधवांनी एनएफएआयच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेने ‘सरकारी’ कात कधी टाकली हे कळलेच नाही. लहान वयातच मोठी जबाबदारी मिळूनही, ती सक्षमपणे संभाळण्याची किमया त्यांनी केलीच, शिवाय फक्त कलाकारांचा राबता असलेली संस्था नकळतच सामान्य सिनेप्रेमींसाठी कायमची खुली करून दिली.

No Picture
व्यक्ती-परिचय

शुभांगी पांगे

Category:

 

मुंबई मराठी साहित्य संघाने आठ नोव्हेंबरला चार वाड्:मयीन पुरस्कार प्रदान केले. त्यातला वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार येशू पाटील यांच्या ‘शब्द पब्लिकेशन्स’ ला; ‘मंगेशराव नारायण कुलकर्णी पुरस्कार’, गंथप्रसारक व अभ्यासक शशिकांत सावंत यांना; ‘केशव भिकाजी ढवळे पुरस्कार’ शुद्धलेखन चळवळ्ये अरुण फडके यांना तर ‘बाळकृष्ण गणेश ढवळे पुरस्कार’ ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या आधारस्तंभ शुभांगी पांगे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र असा हा पुरस्कार मिळवणार्‍या या चौघांपैकी पहिल्या तिघांची नावे कधी ना कधी कानांवर पडतात. पण शुभांगी पांगे या कायमच पडद्याआड राहिलेल्या वाड्:मयसेवक आहेत. त्यांची मराठी साहित्य आणि व्यवहार यांवरची निष्ठा इतकी प्रखर की, बी ए आणि एम ए केल्यानंतर याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्यांच्या या वाड्:मयसेवेला लवकरच तीन दशके पुरी होतील.

No Picture
व्यक्ती-परिचय

पंडित श्रीकांत देशपांडे

Category:

 

किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.

No Picture
व्यक्ती-परिचय

विश्वासराव सावरकर

Category:

 

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.

No Picture
व्यक्ती-परिचय

डॉ. वसंत पवार

Category:

 

एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.

निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला.

No Picture
व्यक्ती-परिचय

कॉ. वसंत गुप्ते

Category:

 

मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा न् खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते.

No Picture
व्यक्ती-परिचय

उल्का महाजन

Category:

 

उल्का महाजन ह्या आदिवास्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व्यापक लढा उभारणार्‍या एक जेष्ठ समाजसेविका आहेत. मुंबईमधील निर्मला निकेतन कॉलेजमध्ये बी. एस. डब्ल्यू व एम. एस. डब्ल्यू ही पदवी मिळवल्यानंतर रायगड मधील कातकरी या अतिशय हालाखीच्या परिस्थितींमध्ये दिवस काढणार्‍या आदिवास्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सर्व जन हारा आंदोलन चा मंच उभारला आहे.