राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितत्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’