खाद्ययात्रा

साबुदाणा वडा

Category:

 

साबुदाणा वड्याची पाककृती – : प्रथम साबुदाणा भिजत घालावा. साबुदाणा भिजविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणे घ्यावेत. साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे. अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व त्यावर झाकण ठेवावे. साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तास थांबावे. उकडलेला बटाटा किसून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व त्यात शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे.

  July 24, 2013


खाद्ययात्रा

ओट्सचा उपमा

Category:

 

ओट्सचा उपमा बनवण्याचे साहित्य व कृती -: ओट्स कोरडेच भाजून घेऊन बाजूला ठेवावेत. मग तेल तापवून त्यात, मोहरी कांदा, मिरची, कडिपत्ता चांगले परतून घ्यावे. हळद घालून आणखी परतावे. मग त्यात पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी. त्यात काळा मसाला, मटार घालून उकळू द्यावे. मग यात ओट्स घालावेत. ओट्स घालताना सतत हलवत रहावे अन्यथा कढईला चिकटण्याची शक्यता असते.

  July 19, 2013


खाद्ययात्रा

येवल्याचा प्रसिध्द झणझणीत भेळभत्ता

Category:

 

येवला या ऐतिहासिक शहराची खादय संस्कृतीची एक वेगळी ओळख आज निर्माण झाली आहे ती म्हणजे येवल्याचा सुप्रसिध्द झणझणीत भेळभत्ता आणि सुंदर गोड बासुंदी !

  July 5, 2012


अवर्गिकृत

भेंडीचा पिवळा रस्सा

Category:

 

असं म्हणतात की दर चार कोसावर बोलीभाषेत बदल होतो. माझं तर असं निरीक्षण आहे की, दर दहा कोसावर भाजीच्या रस्स्याची चव बदलत असते. अगदी प्रयोग पहायला हरकत नाही. या गावाहून दुसर्‍या गावाला गेलं की रस्सा म्हणजे ग्रेव्हीत बदल होतोच.याचं कारण म्हणजे वापरण्यात येणारे मसाले, फोडणी देण्याची पद्धत आणि मुख्य म्हणजे तयार करणारे हात यांच्यात सतत वेगळेपण असतं.

  August 27, 2010


खाद्ययात्रा

उपवासाची खांडवी

Category:

 

श्रावण सुरू झाला की, उपवास सुरू होतात आणि उपवास सुरू झाले की, उपवासाचे विविध पदार्थ शोधले जातात. नेहमीच साबुदाणा खिचडी अथवा वरीचा भात खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी वेगळा, चटपटीत उपवासाच पदार्थ ताटात आल्यावर उपवासाचा देखील आनंद घेता येतो.

  August 24, 2010


खाद्ययात्रा

हरबर्‍याची भाजी आणि भाकरी

Category:

 

साऊथमधला इडली-डोसा महाराष्ट्रतल्या घराघरात कधी पोहोचला हे जसे कोणाला कळले नाही तसेच काहीसे हरबर्‍याच्या भाजीचे आहे. वाळलेले हरबरे तळून किंवा ओले हरबरे लिंबू पिळून, त्यावर थोडे मिठ, चाटमसाला टाकून आपण शहरी लोक खातोच ना. पण हे हरबरे शेतात डौलाने उभे असतात त्यावेळी ते पाहण्याची गंमत देखील औरच. हिरव्या रंगाचे टपोरे मोती कोणी एखाद्या छोट्याशा झाडाला लटकवून ठेवावेत आणि ते वार्‍याच्या झोताने डोलताना पहावयास मिळावेत.. अहाहा… अगदी म्हैसूर किंवा पैठणच्या उद्यानात आपल्या प्रेयसीचा दुपट्टा वार्‍यावर उडल्यासारखे वाटले ना.. असो..

  March 10, 2010