गोष्ट गुणवंत कुमाराची
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितराजा पे-चौ व त्याचा प्रधान, दोघेही राजमहालात बसले होते. त्यांचे सारे लक्ष सिंहासनाला दोन साखळ्या (लहान लहान घंटाघुंगरे लावलेल्या) जोडलेल्या होत्या तिकडे होते. त्यातली एक साखळी सोन्याची होती, तर दुसरी होती चांदीची. त्यांना बोलायलाही सुचत नव्हते. बरोबर राणी यावेळी प्रसूतिगृहात होती, बाळ होणार होते. मुलगा झाला तर सोन्याची साखळी ओढली जाणार ! मुलगी झाली तर चांदीची ! त्यांचे डोळे साखळ्यांवर गुंतलेले होते.