गुन्हा कुणाचां? शिक्षा कुणा?
ID: 331
मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं.
पण तरीही प्रत्येक माणसांमध्ये माणुसकीचा, प्रेमाचा एक कप्पा असतो. तसा माझ्यातला जागा झाला. बातमीच तशी होती. इंग्रजी टायटल होतं. Convicted and Punishment दोन्हीही शब्दांचा अर्थ पाहिला तर पहिला शब्द Convicted म्हणजे शाबीत म्हणजे न्यायालयात एखाद्या अपराध्याचा अपराध सिध्द होतो. त्याला दोषसिध्दी म्हणतात. [...]
Category:
साहित्य - ललित