आली दिवाळी – वसुबारस
ID: 50410
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..! [...]
Category:
लेखसंग्रह
Tags:
02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश oldsite
pd - October 16, 2017
(PID -50410)
pd - October 16, 2017
md - March 25, 2026
Status - publish