चारोळ्या

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार पोखरतोय आज देशाला

घुशीसारखा खोलवर आतल्या आत

कोसळेल जेंव्हा आर्थिक डोलारा

जनताच दबली जाईल त्यात

महागाई

महागाई झालेय खादाड बाई

डाईटच्या जमान्यातही वाढत जाणारी

श्रीमंतांचे खिसे भरता- भरता पैशानी

मध्यमवर्गीयांच्या ताटातील घास पळविणारी

स्त्रियांवरील अत्याचार

राम – कृष्ण आज झोपेत आहेत

म्ह्णूनच रावण- दुर्योधनाचे फावत आहे

स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत

कलियुगातही दुर्गेची गरज आहे.

— निलेश बामणे

Author