जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा पुरेपुर उपयोग पुढे कमलाबाईंना मुकपट तसेच संगीत नाटकांसाठी झाला. भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्यां कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती. पण, त्याकाळी एक उणीव मात्र या नाटकांमध्ये कायमची जाणवायची ती म्हणजे स्त्री पात्रांची. अर्थात स्त्री भुमिकाही त्याकाळी पुरुष साकारत असत. याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र पासून. त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्र ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतांचे दादासाहेब फाळके होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं.
फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपानं, रुपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांची सुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान ही चढतीच राहिली. पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रुपानं ठेवलं असं ही म्हणता येईल. चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशावेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे चित्ताकर्षकची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरु केली. पुंडलिक तसेच मृच्छकटिक ही नाटकं चित्ताकर्षक तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भुमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. त्यावेळेला कमलाबाई यांच्या खाजगी जीवनात मोठे परिवर्तन झाले. चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध होऊन कमलाबाई गोखले झाल्या.
पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिर्हा्डही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानित आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते. पण कमलाबाईंनी हार मानली नाही. त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते उ:शापच्या माध्यमातनं जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखुन या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली. पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्र मधील सुभद्रा व अर्जुन, मानापमान मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला.
तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला. रिना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले व सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते व चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकिर्द घडवतेय मा.मा.कमलाबाई गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सागर मालाडकर
September 6, 2017
डॉ. सबनीस आयुष्यात वेगवेगळ्या चळवळींचा आणि कलाविष्कारांचा अनुभव घेतलेले लेखक आहेत. दादा कोंडकेंच्या ‘विच्छा माझी…’ने प्रभावित होऊन ‘शुक्राची तू चांदणी’सारखे वगनाट्य त्यांनी लिहिले आहे. राजकारणावर आधारित ‘सत्यकथा ८२’ किंवा ‘क्रांती’ सारख्या राज्यस्तरीय पारितोषिकविजेत्या एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.
July 4, 2022
आज १६ आक्टोबर.. आज सिमी गरेवाल यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ आक्टोबर १९४७ रोजी झाला.
मा.सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच.
सिमी गरेवाल यांचे लहानपण इंग्लड मध्ये गेले. वयाच्या १५ व्या वर्षी फिरोज खान यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले. मा.सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’, सिद्धार्थ या काही चित्रपटात दिलेले बोल्ड सीनआठवत असतीलच. सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातील शशी कपूर आणि त्यांचं चुंबन दृश्यही हमखास आठवतं. पण ते अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलं गेलं होतं. तरीही त्यावरून त्या वेळी गोंधळ झाला होता. सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. मा.सिमी गरेवाल यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 16, 2016
बॉलीवुड चे दिग्गज गिटार वादक गोरख शर्मा यांचा जन्म २८ डिसेंबर १९४६ रोजी झाला. गोरख रामप्रसाद शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू होते. गोरख शर्मा यांनी आपल्या वयाच्या १२ व्या वर्षापासून मेन्डोलिन वाजवण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात ते हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात मेन्डोलिन वाजवत असत.
वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीतकार रवी यांच्या चौदवीका चांद या गाण्याला मेन्डोलिन वाजविले होते. जागतिक कीर्तीचे गोरख शर्मा यांनी अनेक अविस्मरणीय गाण्यांना गिटार वादन केले ते 'लक्ष्मीकांत-प्यारेलाल' यांचे मुख्य सहाय्यक होते. त्यांनी आपल्या १९६० ते २००२ मधील करीयर मध्ये १००० हून अधीक गाण्यांना गिटार वादन केले व ५०० हून अधीक चित्रपटात गिटार व इतर तार वाद्य वाजवली होती.
'कर्ज़' या चित्रपटातील 'एक हसीना थी, एक दीवाना था' च्या गाण्याचा गिटार गोरख शर्मा यांचा होता. आशिकी या चित्रपटातील गिटारचा पिस पण गोरख शर्मा यांचाच होता. गोरख शर्मा यांचे २७ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 27, 2019
पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक श्री.पु.भागवत यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी झाला. मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक.१९५० ते २००७ या काळात मौज या संस्थेला स्वतःची प्रेस व फाउंड्री मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
खटाव वाडीतील त्यांच्या कार्यालयामधून ही संस्था कार्यरत असत. मराठी साहित्यातील मानदंड ठरलेले त्यांचे सत्यकथा हे मासिकही अत्यंत लोकप्रिय होते. त्यातील कथांची निवड भागवतांकडून अतिशय तावून सुलाखून व्हायची व मगच त्या कथा छापखान्याकडे जायच्या. मौज प्रकाशनच्या मौज (साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक अशी त्यांची ख्याती झाली.
प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती अश्या माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन केले. महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी पार पडलेल्या तिसर्याा मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष पद भागवत यांनी भुषविले होते.. श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. श्री.पु.भागवत यांचे २१ ऑगस्ट २००७ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 27, 2018
डॉ. विजया वाड या लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला. त्यांनी मराठी विश्वकोशाच्या अध्यक्षा आणि प्रमुख संपादिका म्हणून काम पाहिलं आहे. अनेक वृत्तपत्रांमधून त्या लेखन करत असतात.
‘आकाशवाणी व दूरदर्शन यांचे शालेय शिक्षणातील स्थान’ या विषयात त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांनी मराठी भाषा प्रकल्पांतर्गत भाषा शुद्धी प्रकल्प, प्रमाण भाषा प्रकल्प, पाठ्यपुस्तकाबाहेरील कविता प्रकल्प, नाट्यीकरण प्रकल्प, वाचनवेग प्रकल्प असे अनेक उपक्रम राबवले होते. राज्य विश्वकोश मंडळाची अध्यक्षा म्हणून त्या काम बघत असताना त्यांनी तेव्हा सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने विश्वकोशाचे २० खंड माहितीच्या महाजालात (इंटरनेटवर) आणले. त्यामुळे १०५ देशातील लाखो वाचकांपर्यंत विश्वकोश पोहोचण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून मुंबईसह संपूर्ण राज्यातील शाळा-शाळांमधून ‘विश्वकोश वाचन स्पर्धा’ आयोजित केल्या. ‘बालकोश’, ‘कुमारकोश’ तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. विश्वकोश, कुमार कोश ‘बोलका’ (ऑडिओ स्वरूपात) केला.
आपल्या मुली वाढविताना, दहावी आता बिनधास्त, निबंधरचना तंत्र आणि मंत्र, गप्पागोष्टी, घर अंगण, गृहविष्णू आणि इतर कथा, मनमोर, मी वेणू बोलतेय..., प्रिय हा भारत देश, सावित्रीच्या लेकी, सय, उत्तम शिक्षक होण्यासाठी..., विज्ञानयात्री डॉ. जयंत नारळीकर, झंप्या झिम्माडे, आपली माणसं, बाल निसर्गायन, बिट्टीच्या बारा बाता, छोटुली छोटुली गाणी, डॅनी डेंजर, ढ, दिव्याचे दिव्य, किंजल, क्षणिका, मनाची उभारी, निरभ्र आणि श्रीगणेशा, ओजू एंजल, टिंकू टिंकल, तिसरी घंटा, आपली मुलं, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. प्रसिध्द अभिनेत्री निशीगंधा वाड या त्यांच्या कन्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2018
कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. यात राम नगरकर केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं ‘हल्ल्या थिर्र’ हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं.
June 8, 2021
एक संवेदनशील दिग्दर्शक आणि सिनेनिर्माता म्हणून चैतन्य ताम्हाणे ओळखला जातो. त्यांनी मुंबईतील मिठाबाई कॉलेजमधून साहित्यामध्ये पदवी घेतली. त्यांची आई ह्या रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत आणि वडील पर्यावरण विषयातील सल्लागार आहेत.
March 1, 2024
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.
November 25, 2021
भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ पार्श्वगायक व सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला.त्यांचे वडील जाफर खान हे स्वतः एक अष्टपैलू कलाकार व गायक होते. त्यामुळे लहानपणापासूनच उस्ताद अब्दुल खान यांच्यावर संगीत व गायनाचे संस्कार झाले होते. अब्दुल खान यांना संगीत आणि वाद्य वादनाची प्रचंड आवड होती. अब्दुल खान यांनी सतार वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली व रागांवर आधारीत एका कार्यक्रमात अब्दुल खान यांच्या सतारवादनाचे प्रसिद्ध भारतीय संतुरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांनी कौतुक केले होते. उस्ताद खान यांनी सतारवादनात स्वतःचा `जाफरखानी’ बाज निर्माण केला होता. तसेच त्यांनी संगीत जगतात स्वतःची एक स्वतंत्र सतारवादनाची शैलीही त्यांनी निर्माण केली होती. हिंदी सिनेसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांसोबत काम केले. `मधुबन मे राधिका नाचे रे’, `ये जिंदगी उसी की हैं’, या चित्रपटसृष्टीतील अजरामर गाण्यातील सतार वादन उस्ताद अब्दुल खान यांनी केले. तसेच `मुगल-ए-आझम’, `झनक झनक पायल बाजे’ या भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपटांच्या गाण्यातील त्यांच्या सतार वादनाने गाण्यांना एक उंची मिळाली. मा.अब्दुल खान यांच्या सतार वादनाच्या दिलखेच शैलीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. सतारवादनाच्या क्षेत्रातली त्रिमूर्ती म्हणजे रविशंकर, विलायत खान आणि अब्दुल हलीम जाफर खान. पं.रवीशंकर, उस्ताद विलायतखान आदी दिग्गज व प्रसिद्ध सतारवादकांच्या बैठकीत अब्दुल हालीम जाफर खान यांना मानाचे स्थान मिळाले. तसेच त्यांच्या बरोबरीने उस्ताद अब्दुल खान यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच भारतीय सिनेसृष्टीसाठी उस्ताद खान यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. उस्ताद अब्दुल खान यांना संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, जीवन गौरव,`पद्मश्री’, `पद्मभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मा.अब्दुल हलीम जाफर खान यांनी लहान वयात यश आणि कीर्ती संपादित केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अथक परिश्रम आणि अचाट कल्पनाशक्ती. सतारवादन ध्रुपदाच्या अंगाने करणारी एक शैली आहे. रविशंकर या अंगाने वाजवत. विलायत खान गायकी अंगाने वाजविण्याचा दावा करीत. त्यांची शैली ही मध्यसप्तकप्रधान आहे. मा.हलीम खान यांनी आपली स्वतंत्र शैलीच निर्माण केली. सतारीतून वेगवेगळे नाद निर्माण करणारी, सतारीची भाषा समृद्ध करणारी आणि अधिकाधिक सांगू पाहणारी. पुढे त्यांनी त्याला ‘जाफरखानी बाज’ असे नाव दिले. मा.हलीम खान यांनी दक्षिण भारतीय संगीतातील अनेक राग हिंदुस्तानी पद्धतीत आणले. ‘किरवाणी’, ‘लतांगी’, ‘कनकांगी’ वगैरे राग यापूर्वी आपल्याला अपरिचित होते. त्यांची चित्रपट संगीताच्या क्षेत्रातली कामगिरी अतुलनीय आहे. सर्व प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले आणि गाण्यांचे माधुर्य वाढविले. सतारवादनाची कला त्यांनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता १९७६ ला मुंबईत `हलिम अकादमी ऑफ म्युझिक’ या संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.
उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले. तसेच पुरस्कार व प्रसिद्धीपेक्षा त्यांनी कलेलाच अधिक महत्त्व दिले. ते अखेरपर्यंत कलेची निष्ठेने सेवा करत राहिले. मा.अब्दुल हलीम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
February 20, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti