(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वॉल्टर एलिआस डिस्नी

    अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

    ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

    ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

    मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

    वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

    मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

    वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

    लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
    वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 17, 2019


  • ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित पंजाबी आणि हिंदी कवयित्री अमृता प्रीतम

    ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.

    अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

    त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला, पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते. साहिरबद्दल लिहिताना अमृता प्रीतम एके ठिकाणी म्हणतात- "साहिर आणि माझ्यात नि:शब्दतेचं एक अनोखं नातं होतं. त्यात शारीरिक ओढीचा अंश नव्हता. मला ‘आखरी खत’साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झाल्यावर एका प्रेस रिपोर्टरनं मी लिहीत असतानाचा फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे तो फोटो काढून निघून गेल्यावर मी त्या कागदाकडे पाहिलं, तर त्यावर ‘साहिर.. साहिर.. साहिर’ हा एकच शब्द मी अनेकदा लिहिला होता. माझ्या त्या वेडेपणाचं माझं मलाच आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो फोटो प्रसिद्ध झाला. पण तो कागद कोरा असल्यासारखा भासत होता. साहिर आणि माझ्यातलं नातं तेव्हाही नि:शब्दच होतं. आणि अखेपर्यंत ते तसंच नि:शब्द राहिलं.

    अमृता प्रीतम रात्रीच्या निरव शांततेत आपलं लेखन करायच्या, कुठलाही गोंगाट - आवाज नसताना त्यांची लेखणी प्रसवत असे. अमृता रात्रीतून तासंतास लेखन करत राहायच्या. अमृता प्रीतम यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. आपलं आयुष्य आपल्या विचारांनुसार जगणार्‍या अमृता कर्तव्यसन्मुख राहिल्या, त्या मुक्त होत्या.

    अमृता प्रीतम यांचे ३१ आक्टोबर २००५ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ. इंटरनेट

      September 10, 2016


  • पुण्यातील निष्णात वैद्यकीय तज्ज्ञ ह. वि. सरदेसाई

    एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले.

      April 12, 2022


  • निर्माता, दिग्दर्शन आणि अभिनेते विजय पाटकर

    विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे विजय पाटकर. त्यांचा जन्म २९ मे १९६१ रोजी झाला. जाहिरात, मालिका, नाटक, सिनेमा अशा चारही माध्यमात हौसेखातर अभिनेता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अभिनयाच्या वाटेवरून दिग्दर्शन, निर्मितीची मजल गाठणारा ठरला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’, ‘लावू का लाथ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय पाटकर यांची केले आहे. विजय पाटकर यांनी मराठी व हिंदी मिळून १४२ चित्रपटांतून आणि ३५ नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत.

    विजय पाटकर यांनी ऑस्करच्या निवडसमितीत सदस्य म्हणून काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 29, 2017


  • रत्नाकांत व शांती मुजुमदार

    मिस्टर रत्नाकर व मिसेस शांती मुजुमदार हे पिट्सबर्ग मराठी मंडळाचे जेष्ठ व जुने सदस्य. या दोघांनी कार्नेगी मेलन विद्यापीठात वैज्ञानिक म्हणून काम केले आहे. वेगवेगळे असाह्य रोग व त्यांचे त्वरीत निदान व प्रभावी औषधोपचार कसे करता येतील या विषयांवर काम करत असताना त्यांनी कॅन्सर सारखा प्राणघातक रोग लवकरात लवकरपणे अचुक शोधू शकणारे रसायन शोधून काढले आहे. संशोधन करीत असताना अनेक रासायनिक पदार्थांचे विघटन व उत्खनन करून मुजुमदारांनी हजारोंना नवसंजिवनी देवू शकेल असे फ्लोरोसेंट डाईस ( जे आता साएनाईन डाईस या नावाने पेटंट केले गेले आहे ) हे अनोखे औषध तयार केले आहे. बहुतांशी, या विद्यापीठात केलेले संशोधन हे शैक्षणिक क्षेत्रातील एक अमुल्य ज्ञान म्हणून जतन केले जात असले तरी ते पुर्ण जगासमोर प्रसिध्द होत नाही. परंतु मुजुमदारांनी केलेल्या या संशोधनाची नोंद जगामधील सर्वात प्रतिष्ठीत अशा कॅन्सर रिसर्च व सिएट चिलड्रेन्स हॉस्पिटल रिसर्च इन्सटिट्युट नावाच्या जर्नलस् मध्ये करण्यात आली. मुजुमदारांनी केलेल्या कार्याचा जगभर सार्थ गौरव केला गेला व हे संशोधन नजिकच्या काळामध्ये कॅन्सर वर खात्रीलायक औषध तयार करण्यास फायदेशीर ठरेल अशी आशा सर्वांना वाटत आहे. मराठी माणसाच नाव वैद्यकिय क्षेत्रात पुर्ण जगभरात झळकवल्याबद्दल रत्नाकांत मुजुमदार व शांती मुजुमदार यांचे हार्दिक अभिनंदन.

      July 27, 2011


  • प्रसिद्ध तबलावादक अहमदजान तिरखवाँ खान

    १९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात.

      January 13, 2022


  • वैशाली बापट

    वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ‘वर्धमान ग्राफिक्स’ या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.

      August 16, 2011


  • सुभाष स नाईक

    सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

      October 7, 2019


  • जनसंघ संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींशी विचार विनिमय करून श्यामा प्रसादांनी २१ ऑक्टोबर १९५१ रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत जनसंघाने तीन जागा जिंकल्या. जन्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा ठाम विरोध होता.

      July 6, 2021


  • लेखक आणि पटकथालेखक य. गो. जोशी

    य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या..

      May 22, 2019