जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एक चित्रपट १४ वर्षे!
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते. १९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर चित्रपट हिट झाला. पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या अशा दोन्ही भूमिकांमध्ये मीनाकुमारीच्या वाट्याला दु:ख आणि वंचनाच आली. पाकिजाचे संगीत गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
विश्राम ढोले
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
February 13, 2017
ग्रेगरी पेक हे हॉलिवुडमधला स्टाइल आयकॉन होते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९१६ रोजी झाला. १९४० ते १९६० पर्यतचं दशक ग्रेगरी पेक यांनी गाजवला. ‘मॅकेनाज् गोल्ड’च्या मुळे युवा पिढीमध्ये ते लोकप्रिय झाले. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रोमन हॉलिडे’, १९६१ मध्ये आलेला ‘गन्स ऑफ नेव्हरॉन’, ‘केप फियर’, ‘मॅकआर्थर’, ‘ओमेन-१’, ‘केप फियर’चा रिमेक यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. ग्रेगरी पेक यांना पाच सिनेमांमधील भूमिकांसाठी ऑस्कर नामांकन मिळाले होतं. ‘द कीज् ऑफ द किंग्डम’, ‘द यर्लिग’, ‘जंटलमन्स अॅमग्रीमेंट’, ‘ट्वेल्व ओक्लॉक हाय’ या चित्रपटाना ऑस्कर जिंकता आले नाही. पण ‘टू किल अ मॉकिंग बर्ड’साठी ग्रेगरी पेक यांनी त्यांच्या आयुष्यातील एकमेव ऑस्कर जिंकले. ग्रेगरी पेक यांना अमेरिकन सिनेमाचा आदर्श मानलं गेले, कारण त्यानी केलेली बरीचशी पात्रं आदर्शवादी, तत्त्ववादी असत. भारतात मा.देवआनंद यांनी त्यांची छबी उचलली आणि लोकप्रिय केली. देव आनंद हिंदी चित्रपटसृष्टीतला ग्रेगरी पेक होता.
ग्रेगरी पेक यांचे १२ जून २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
June 12, 2017
धनंजय कीर यांनी १९४३ पासून इंग्रजी वृत्तपत्रातून लेखनास प्रारंभ केला. काही लेख त्यांनी ‘ धनंजय ‘ या टोपण नावाने लिहिले.
August 5, 2021
नटसम्राट हा चित्रपट गेल्यावर्षी १ जानेवारीला नाना पाटेकरांच्या वाढदिवशी प्रदर्शीत झाला होता.
नटसम्राट ! ऐसा चित्रपट होणे नाही.
यशाच्या अत्तुच्य शिखरावर पोहोचल्यानंतर, वृद्धापकाळात तेच यश एक शाप ठरावे अशी गाथा असलेल्या कलाकाराची भूमिका वठावणे हे एक शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड आहे. नाना पाटेकरांनी साकारलेले गणपतराव वयाच्या साठीत कलेच्या ४० वर्ष सेवेतून निवृत्त होतात. एक असा नट ज्याने हॅम्लेट, सिजर, ओथेल्लो आणि अशी बरीच मात्तबर पात्रे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. नाना पाटेकर कलाकार म्हणून महान आहेच. पण आज महेश वामन मांजरेकर यांच्यातला दिग्दर्शक जिंकला असे वाटते. एखादी महान कथा हाताळणे म्हणजे शिवधनुष्य! त्यातूनच नाना पाटेकर यांचा सारखा कलाकार ! लहानपणी डॉ.लागूं चे नाटक पहिले होते. तत्कालीन कलाकार हे फक्त कलेला वाहून घेणारे होते. त्यांना व्यवहारज्ञान नव्हतेच. मग ते काल्पनिक गणपतराव बेलवलकर असोत, किंवा बालगंधर्व , दादासाहेब फाळके या सर्व लोकांनी जी कला लोकांसमोर सादर केली याची तोड नाही.असो ! एक सर्वोत्कृष्ठ चित्रपट सहकुटुंब पाहून वर्षाची सुरुवात छान झाली.
खूप खूप आपल्या रडवतो हा चित्रपट !
अगदी नाना च्या सर्वश्रेष्ठ संवादफेकीपासुन ते विक्रम गोखले सोबतच्या अभिनयाच्या लाजवाब जुगलबंदीपर्यंत सगळचं कसं काळजात खोलवर रुतणारं... वैभवकाळ पुरेपुर भोगुन समाधानानं रंगमंचावरुन निवृत्त झालेला नटसम्राट खर्याा आयुष्यात मात्र नशीबाच्या पायाखाली तुडवल्या जाताना बघवतं नाही... अन जे दिसतं ते अश्रु भरल्या डोळ्यांनी! विक्रमजी गोखले आणि नाना पाटेकर कित्येक फ्रेम मधे अक्षरशः रडवतात.. त्यांचं दुःख काळजाला भिडतं. विक्रमजींच्या घरातला प्रसंग केवळ अभिनयाची शाळाच म्हणुन पहावादिग्गज कलाकारांनी पूर्वी सजवलेला नटसम्राट नाना पाटेकर वेगळ्याच उंचीवर नेतात, नट, बाप, आजोबा, प्रेमळ पती आणि शेवटी बेघर वृद्ध सगळी रुपं नाना पाटेकर यांनी लीलया रंगवली आहेत. केवळ असाच्या असा नाटकातून उचलून आणलेला चित्रपट नाही. नाटकाच्या तीन भिंतींच्या मर्यादा येथे नाहीत इतपतच हा विचार मर्यादीत नाही. केवळ दृश्यात्मक बदल असेदेखील नाही. एक चित्रपट म्हणून हे कथानक नव्याने मांडायची ही संधी आहे हे लेखक, पटकथालेखक आणि दिग्दर्शकाला व्यवस्थित कळले आहे. आणि या सर्वाचे भान कलाकारांना आहे. थोडक्यात सगळं जुळून आलंय असेच म्हणावे लागेल. विस्तारीत कथेतील संवाद आणि मूळ कथेतील प्रसिद्ध संवाद यांचा मेळ व्यवस्थित घातला आहे.
"कट्यार" मधे एक पुढील आशयाचं वाक्य आहे "कलाकाराला दाद केवळ टाळ्यांनीच मिळते असं नव्हे तर निःशब्द शांतता अन पाणावलेले डोळे ही त्याहून उच्च दाद होय"
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 1, 2018
मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
August 1, 2021
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे मुंबईतील सीकेपी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.
November 7, 2011
धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला.
November 8, 2021
भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासगी संपादक आणि मराठी लेखक गोमंतकाच्या सत्तरी विभागातील आंबर्डे हया गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण त्यांनी घेतले नाही. तथापि पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण काव्यशास्त्र तसेच ज्योतिबा हया विषयाचे अध्ययन आंबर्डे धावे आणि सांगली येथे केले. त्यानंतर 1926 साली सत्तरी शिक्षण संस्था स्थापन करुन त्यांनी स्वतला शिक्षणप्रसारास वाहून घेतले.
1935 मध्ये ते पुण्यास आले; तेथे पुराणे-प्रवचने करू लागले हयाच नियतकालिकात वेल विस्तार हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1941 मध्ये प्रकाशित झाला 1957 पर्यत त्यांचे एकून दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले. खडकांतलेपाझर 1948 विराणी 1950 घररिघी 1955 हे त्यापैकि काही होते. त्यांच्या अनेक कथा गोमंतकिय जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहेत.
साधी सोपी पण भावोत्कृष्ट भाषा आणि आकर्षक निवेदनशैली पाहण्याचा एक प्रसन्न सोज्वळ दृष्टिकोन त्यातून प्रत्ययास येतो. त्यांच्या काही कथा वर मराठीत चित्रपट काढण्यात आलेल आहेत काही कथाचे हिंदी अनोवादही झालेली आहे.
March 11, 2015
यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.
August 15, 2021
सुधा नरवणे या मुळात लेखिका होत्या. लिखाणाची आवड असलेल्या नरवणे यांनी कथा, कादंबरी, निबंध, नियतकालिकांमधील लेख असे विपुल लेखन केले.
July 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti