(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सतिश मोडखळकर

    प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.

      July 19, 2011


  • अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे

    जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली.

      March 1, 2022


  • जगातील पहिले अँटीव्हायरस बनवणारे जॉन मॅकॅफी

    संजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.

      June 28, 2022


  • भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

    त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली.

      July 12, 2022


  • डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी

    फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला.

      April 27, 2024


  • प्रसिद्ध लेखिका डॉ. वीणा देव

    त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत.

      November 26, 2021


  • प्रवीण अनंत दवणे

    अशा हृदयातून ऐकणार्‍या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !

      May 23, 2014


  • दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिता

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.

    ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या.

    सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले.

    सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.

    सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती. २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 15, 2019


  • डॉ. डी. वाय. पाटील

    डी. वाय. पाटील यांच्या घरात काँग्रेसची विचारधारा होती. त्यामुळे अर्थात त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरु होणं सहाजिक होतं आणि झालंही तसेच कोल्हापुरातून डी. वाय. पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला.

      October 22, 2021


  • अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक कर्तारसिंग दुग्गल

    अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

      April 27, 2024