जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
त्यांच्या लेखनात गुन्हेगारी थ्रिलर्स, निबंध, साहित्यिक टीका, कथा यांचा समावेश असतो. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत.
February 7, 2022
च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा
March 9, 2022
त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही.कारण महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती.
December 16, 2021
भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.
१९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.
१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही... पण लोकसभेची निवडणूक मात्र पहिल्यांदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे दिसतात. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकतो. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात.
२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मी रचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या. त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा. जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते... त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ "डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहतात. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 28, 2018
खेळ तसा खर्चिक आणि सुविधांचीही वानवा... पण अनिरुद्ध रांगणेकरने यातल्या अडचणींवर मात करीत कार रेसिंगमध्ये टॉप गिअरची कामगिरी करुन दाखविली आहे.
अनिरुद्ध रांगणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला टॉप गिअर हा लेख पुढील पानावर वाचा.
अनिरुद्ध रांगणेकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला टॉप गिअर हा लेख वाचा.
July 24, 2015
यादो की बारात’ चित्रपटातून सगळयांच्या मनात घर करून बसणारी अभिनेत्री नीतू सिंह या एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जायच्या. हिंदी चित्रपटसृष्टीत नीतू सिंह यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
July 8, 2017
गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले.
जेम्स बाँड हे इयान फ्लेमिंग ह्यांनी १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बाँड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. ५ ऑक्टोबर १९६२ साली आलेला ‘डॉक्टर नो’ हा पहिला बॉन्डपट. इयन फ्लेमिंगने बाँडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इयान फ्लेमिंगचा मृत्यू १९६४ मध्ये झाला. त्यानंतर जेम्स बॉण्ड सीरिजचा पिता म्हणून किंग्जले अमिस यांना ग्लिडरोज पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने पाचारण केले. त्यानुसार त्यांनी ‘कर्नल सन’ ही कादंबरी रॉबर्ट मर्खाम या टोपणनावाने लिहिली. पण पुढील कादंबऱ्या स्वत:च्याच नावाने लिहिल्या. त्यानंतर ख्रिस्तोफर वूड, जॉन गार्डनर, रेमंड बेन्सन, सॅबॅस्टियन फॉल्क्स, जेफ्री डेवर, विल्यम बॉयड या सात लेखकांनी बॉण्ड सीरिजमधल्या कादंबऱ्या-कथा लिहिल्या. त्या सर्वावर बॉण्डपट आले. तेही जगभर तुफान गाजले. या काळात जसा जेम्स बॉण्डचा पिता बदलत गेला.
बॉण्ड चित्रपटांत शॉन कानरी, जार्ज लेझांबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉस्नन आणि डॅनिअल क्रेग जेम्स बाँडची यांनी व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकी नऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे. जेम्स बाँड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये आजवर जेम्स बाँड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 9, 2017
हरिभाऊ देशपांडे यांनी नाट्यसंगीत गाणारे अनेक शिष्य तयार केले. लालजी देसाई, मोहिनी पेंडसे-निमकर, आनंद भाटे हे त्यांपैकी काही.
June 28, 2022
ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले.
July 25, 2022
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti