घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
--------------------------------------------------------------------------------------------
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.
पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.
वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
घारे, (डॉ.) मुकुंद
सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.
त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
——————————————————————————————–
घारे, (डॉ.) मुकुंद
पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्या शेतकर्यांना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.
फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.
राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. ‘अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र’ (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.