(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सिनेपत्रकार दिलीप ठाकूर

    ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचा जन्म २० एप्रिल १९६० रोजी अलिबाग तालुक्यातील चौल गावी झाला. दिलीप ठाकूर यांचे बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन मुंबईत गिरगावातील खोताची वाडीतील अवघ्या दहा बाय दहाच्या खोलीत गेले. जीवन घडताना एकीकडे दक्षिण मुंबईतील अनेक चित्रपटगृहात स्टाॅलच्या तिकीटात सतत नवे जुने चित्रपट पाहणे आणि त्या काळातील अनेक साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचणे यात घडले. शिवाय गल्ली क्रिकेट आणि गल्ली चित्रपट यातून जनसामान्यांशी नाळ जुळली होतीच. त्यांनी गिरगावातील हिंद विद्यालय हायस्कूलमध्ये शालेय तर चौपाटीच्या भवन्स कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. यातूनच विद्यार्थी दशेतच त्यांनी विविध नियतकालिकांमधून वृत्तपत्र लेखन सुरु केले. एकाद्या लेखावरचे मत अथवा एकाद्या ताज्या घडामोडीवरचे आपले मत 'वाचकांच्या पत्रा'तून प्रसिद्ध होत आहेत या त्यांच्यासाठी खूपच मोठा उत्साहाचा भाग होता.

    मार्मिक, रसरंग, चित्रानंद, सोबत, लोकप्रभा, क्रीडांगण अशा साप्ताहिकातून आपली पत्रे तर कधी लेखही प्रसिद्ध होत असल्याने त्यांचा लेखनातील कल वाढला. १९८२ साली त्यांनी नवशक्ती दैनिकात प्रूफ रिडर म्हणून रुजू झाले आणि त्याबरोबरच रविवार नवशक्तीत चित्रपटविषयक सदरही लिहायला मिळाले. १९८६ साली त्यांना संपादकीय विभागात बढती देण्यात आली. ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.

    मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्यक्षात शूटिंग रिपोर्टीगसाठी सेटवर जाणे, चौफेर निरीक्षण आणि लहान मोठ्या स्टार्ससह अनेक प्रकारचे तंत्रज्ञ आणि कामगार यांच्याशी संवाद साधणे यातून त्यांच्याकडे वेगळी माहिती, संदर्भ, तपशील, आठवणी यांची जमा होत गेली. याचीच पुढची पायरी म्हणून २००३ सालापासून त्यांचे चित्रपटविषयक लेख संग्रह प्रसिद्ध होत आहेत. आतापर्यंत त्यांची चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात स्थित्यंतरातील सिनेमा, क्लॅप, पैसा वसूल, यादगार पल, फस्ट डे फर्स्ट शो, काॅर्नर सीट, सिनेमा घर, ओपन थिएटर, बारा ते तीन तीन ते सहा, गल्ला पेटी, सिनेमा मसाला मिक्स इत्यादी पुस्तकांचा समावेश आहे. २००९ सालापासून ते मुक्त पत्रकार आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. जनसामान्य रसिकांना समजतो आणि आवडतो अशाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांवर आणि त्या विश्वावर त्यांनी कायमच फोकस ठेवला. आणि त्यातूनच त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सर्व स्तरांवर खूप ओळखी झाल्या. इसाक मुजावर आणि शिरीष कणेकर हे त्यांचे विशेष आवडते लेखक आहेत. विशेष म्हणजे, चित्रपती व्ही शांताराम फाऊंडेशनच्या 'शतक महोत्सवी मराठी चित्रपट ' या शंभर वर्षातील मराठी चित्रपटांची तपशीलवार माहिती दिलेल्या सूचीच्या संपादनाची संधी त्यांना मिळाली.

    चित्रपटविषयक माहिती आणि अनुभवाचा त्यांना जवळपास सर्वच मराठी तसेच काही हिंदी वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना, एकाद्या चर्चेत सहभाग घेताना कायमच फायदा होत असल्याचे दिसतेय. टाईम्स ऑफ इंडिया सारख्या इंग्रजी वृत्तपत्रातही त्यांची चित्रपटसृष्टीतील एकाद्या घटनेवर सातत्याने प्रतिक्रिया येत असते. त्यांना या वाटचालीत अनेक पुरस्कार प्राप्त होत आहेत. विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला चित्रकर्मी पुरस्कार, मराठी पत्रकार संघाच्या वतीने जयहिंद पुरस्कार आणि प्रमोद नवलकर स्मृती पुरस्कार, संस्कृती कलादर्पणच्या वतीने उल्लेखनीय पत्रकार पुरस्कार, इंडिवूड मिडिया एक्सलन्स अॅवाॅर्ड, शिवसेना गिरगाव शाखा पुरस्कार, 'मी गिरगावकर ' दक्षिण मुंबई शिवसेना शाखा पुरस्कार, थर्ड बेल एन्टरटेन्मेन्ट कलातीर्थ पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांचा समावेश होतो. त्यांचे 'आऊट फोकस ' हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

    जुन्या चित्रपटाच्या फोटोंचा त्यांच्याकडे उत्तम संग्रह आहे.

    अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा

    https://www.marathisrushti.com/articles/film-critic-dilip-thakur/

    #DilipThakur

      November 26, 2021


  • चोखंद़ळ – सोनाली खरे

    दूरदर्शनवरील ‘बंदिनी’, ‘दामिनी’ यासारख्या मालिकांतून अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या सोनाली खरेनं अल्पावधीतच मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमरगर्ल म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकांमुळे सोनालीचा चेहरा महाराष्ट्रभर घराघरात पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मालिकांनंतर थेट हिंदी रुपेरी पडद्यावरून सोनालीनं रसिकमनावर मोहिनी घातली.

      December 28, 2018


  • गायक महेश काळे

    शास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना "पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा" ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आला तो अभिषेकीबुवांमुळे.

    दहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे.

    पुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच २००५ मध्ये ‘अभियांत्रिकी व्यवस्थापना’तही दुसरी ‘मास्टर्स’ पदवी मिळविली.

    ‘मास्टर्स’च्या दुसऱ्या पदवीचे शिक्षण घेत असतानाच महेशने त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गाण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले.

    महेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय.

    प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

    शास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली.

    महेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

    २०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या "कट्यार काळजात घुसली"ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज 'सदाशिव'च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 12, 2019


  • बॉलिवूड अभिनेते राजेन्द्र कुमार

    तसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.

      July 20, 2017


  • अभिनेते मनोज जोशी

    मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.

      December 14, 2021


  • ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे

    भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.

      May 31, 2022


  • दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, किशोर कुमार

    किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्याकस किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्नमरी नायक व गायकाच्या गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत.

    चित्रपटातही ते चमकले. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते. काढण्याची. १९५० मध्ये आभास कुमार व कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर १९५१ मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात. प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो व त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार.

    १९५२ ते १९६० दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच १९५४ मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला. १९५६ मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन व संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा व बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले.

    अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले. 'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले. ‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.

    यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले. एक चतुर नार, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए, अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक किशोर कुमार यांचे निधन १३ आक्टोबर १९८७ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 9, 2017


  • निलिमा भालचंद्र कढे

    निलिमा भालचंद्र कढे

    ठाणे स्कुल ऑफ आर्टच्या प्राचार्य, चित्रकार व नृत्यांगना निलिमा भालचंद्र कढे म्हणजे ठाणे शहराला अभिमान असणारे कलाकार व्यक्तिमत्व त्यांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलं. कला, वाणिज्य, विज्ञान, मेडिकल, इंजिनियरिंग, एम.बी.ए. इत्यादी सर्व शिक्षण शाखांची सोय उपलब्ध असलेल्या ठाणे शहरात चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याची मात्र सोय नव्हती.

      May 16, 2014


  • वसंत पळशीकर

    कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.

    त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.

    सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.

    संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्‍याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.

    समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.

    महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • अनंत हरि गद्रे

    अनंत हरी गद्रे यांच्याकडे विविध मराठी वाक्प्रचारांचे विलक्षण भांडार होते. ते त्यांनी आपल्या जाहिरात कौशल्यासाठी वापरले. गद्र्‍यांच्या ’कुमारी’ या नाटिकेचे एकामागून एक असे १०१ प्रयोग झाले होते.

      June 18, 2022