जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते.
"नवकाव्य","नवकथा","सौंदर्यमीमांसा","अस्तित्ववाद","चित्रकलेतील नवप्रवाह" अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
आज १६ आक्टोबर.. आज सिमी गरेवाल यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ आक्टोबर १९४७ रोजी झाला.
मा.सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच.
सिमी गरेवाल यांचे लहानपण इंग्लड मध्ये गेले. वयाच्या १५ व्या वर्षी फिरोज खान यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले. मा.सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’, सिद्धार्थ या काही चित्रपटात दिलेले बोल्ड सीनआठवत असतीलच. सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातील शशी कपूर आणि त्यांचं चुंबन दृश्यही हमखास आठवतं. पण ते अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलं गेलं होतं. तरीही त्यावरून त्या वेळी गोंधळ झाला होता. सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. मा.सिमी गरेवाल यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 16, 2016
ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
June 15, 2021
१९५५ पासून आपल्या संगीताची कारकीर्द सुरू करणाऱ्या हृदयनाथ मंगेशकर यांनी आपले वडील दीनानाथ मंगेशकर यांचा थोर वारसा जतन करीत आपली वाटचाल सुरू केली.
October 26, 2016
अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते.
January 12, 2022
संतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.
June 24, 2022
आपल्या घरच्या पारंपरिक वाद्यनिर्मिती व्यवसायात काम करता करता, वयाच्या चोविसाव्या वर्षी बेस क्लॅरिनेटची निर्मिती केली. पॅरिसमध्ये स्थलांतरीत झाल्यानंतर प्रयोग करता करता सॅक्सोफोन, सॅक्सट्रोम्बा, सॅक्सहॉर्न, सॅक्सट्यूबा अशा वाद्यांचा शोध लावला.
November 7, 2021
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“
June 17, 2022
बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला.
छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. ३० वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून १६६१ मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले.
आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते. दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.
एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.
महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त ५ घोडदळातील सैनिक आणि २५ तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.
छत्रसाल बुंदेला यांचे निधन २० डिसेंबर १७३१ रोजी झाले.
December 20, 2021
कुमार सोहोनी यांचे पहिलं व्यावसायिक नाटक म्हणजे ‘अग्निपंख’. यात डॉक्टर लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, अरुण नलावडे अशी मातबर नट मंडळी होती. ‘अग्निपंख’ हे नाटक गाजले. त्यानंतर कुमार सोहनी यांनी ‘रातराणी’, ‘लग्नाची बेडी’, ‘वासूची सासू’, ‘देखणी बायको दुसर्याची’, ‘देहभान’, ‘शेवटचे घरटे माझे’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘तुजविण’ यासारख्या नाटकांचेही त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले. पण सोहनी यांना कालांतराने चित्रपट माध्यमात काम करण्याची इच्छा निर्माण झाली व ते चित्रपट क्षेत्रात आले.
March 31, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti