(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान

    ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली.

      February 18, 2018


  • पॉपस्टार रेमो फर्नांडिस

    ‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ मे १९५३ रोजी झाला.

    रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या 'ओ मेरी मुन्नी' या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास 'प्यार तो होना ही था' या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास 'बॉम्बे' चित्रपटात रेमोने गायलेल्या 'हम्मा, हम्मा' या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या 'ये है जलवा' या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, इतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. रेमो फर्नांडिस यांचा पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते.

    घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून 'रॉक अराउंड द क्लॉक' नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. 'बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस' या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स -- एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू 'लेट्स रॉक' हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने 'बिट फोर' नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो.

    गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस, आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये 'ईंडियन हिप्पी' बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय. मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. 'घर की मुर्गी दाल बराबर' या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?

    गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरगुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड इजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. 'गोवन क्रेझी' नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.

    सन १९८६ पंतप्रधान राजीव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने 'हॅलो राजीव गांधी' हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना 'ड्युड, बडी' अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल. रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.
    बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जिगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं.

    १९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'हम्मा हम्मा' हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.
    या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. दिग्दर्शक अनुराग कश्यकप दिग्दर्शित ‘बॉंबे वेलवेट‘ चित्रपटातून रेमो फर्नांडिस याने अभिनय केला आहे. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या आपल्या जन्मभुमी बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणि हिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / गौरांग प्रभु

      May 8, 2017


  • अभिनेत्री रिंकू राजगुरू

    अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.

    ‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने 'आर्ची'ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.

    अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.

    रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 3, 2022


  • डॉ. डी. एच. तांबेकर

    मुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली.

      July 3, 2013


  • संपादक विनायक सदाशिव वाळिंबे

    विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला.

    विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ मासिकात, नंतर ‘प्रभात’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रात काढल्यानंतर, वाळिंबे यांनी आपल्या पत्रकारितेचा महत्त्वाचा सर्व काळ पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रात काढला. त्यांच्या सुहृदांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं संपादन डॉ. अरुणा ढेरे यांनी केलं आहे.

    गरुडझेप, हिटलर, इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, नेताजी, ऑपरेशन थंडर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा, स्वातंत्र्यवीर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 11, 2021


  • प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

    मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले.

      March 3, 2025


  • भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व अन्नपूर्णा देवी 

    भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक व्यक्तीमत्व म्हणून अन्नपूर्णा देवी देशाला परिचित आहेत. मात्र त्यांचे स्वर्गीय सितार वादन ऐकण्याचे भाग्य अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोकांना लाभलं आहे. जवळपास गेली साठ वर्षे त्या एकांतवासात होत्या. त्यांनी अनेक वर्षापासून संगीत वादन सोडलं आणि एकांतवास स्वीकारला.

    अन्नपूर्णा देवी यांचा जन्म २३ एप्रिल १९२६ रोजी झाला. त्या सरोद वादनातील अध्वर्यू अल्लाउद्दीन यांच्या कन्या. उस्ताद अल्लाउद्दीन हे शास्त्रीय संगीतातील महारथी होते.

    अन्नपूर्णा देवींनी आपले बंधू उस्ताद अली अकबर खान यांच्यासमवेत आपल्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण प्राप्त केले. १९३८ साली रवी शंकर वयाच्या अठराव्या वर्षी अल्लाउद्दीन यांच्याकडे मैहरला शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी आले. अल्लाउद्दीन यांनी अन्नपूर्णा देवींना प्रथम ध्रूपद आणि सितार शिकवलं. पण नंतर सूरबहार वादनावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. सूरबहार आणि सितार यांच्यात साम्य असलं तरी, ते सितारपेक्षा अधिक जड आणि वाजवण्यास अधिक अवघड समजलं जातं. अन्नापूर्णा देवी सूरबहार उत्तम वाजवत असत. अन्नापूर्णा देवी आणि पंडित रवीशंकर यांचा विवाह व्हावा असं उदय शंकर यांचे मत होते. उदय शंकर हे रवी शंकर यांचे वडिल बंधू होते. देशातील कलेच्या क्षेत्रातील दोन दिग्गज कुटुंबं विवाहामुळे एकत्र येतील, ही उदय शंकर यांची कल्पना होती. उदय शंकर यांनी अल्लाउद्दीन यांच्याकडे विवाहासाठी परवानगी मागितली. अल्लाउद्दीन हे प्रथमत: या विवाहाला परवानगी देण्यास तयार नव्हते, पण नंतर त्यांनी विवाहास होकार दिला. अन्नपूर्णा देवी आणि रवीशंकर यांचा विवाह हिंदू पद्धतीने १९४१ साली झाला आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना पूत्ररत्न झाले. शूभेंद्र शंकर असे त्याचे नाव. पण शुभेंद्र शंकर यांचा १९९२ साली अमेरिकेतच अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी शुभेंद्र शंकर यांची योग्य ती काळजी घेतली नाही आणि एका धर्मादाय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. पंडितजींनी शुंभेंद्रकडे दुर्लक्ष केलं आणि त्यासाठी आपला दुसरा विवाह झाला असल्यानं जबाबदारी फेटाळली. याबाबत बोलताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या कि, याचा अर्थ पंडितजी शुंभकरला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानत नव्हते. पण अल्लाउद्दीन यांच्याप्रती मात्र पंडितजींनी कर्तव्यात कोणतीही कसर ठेवली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अन्नापूर्णा देवी यांनी आपला शेवटचा कार्यक्रम १९५६ साली सादर केला. त्यानंतर पंडितजी फक्त एकदाच १९८० साली अन्नपूर्णा देवींना भेटायला आले. अन्नपूर्णा देवींनी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शिष्यांना कला शिकवली आहे. त्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित नित्यानंद हळदीपूर, उस्ताद आशिष खान, पंडित बसंत काब्रा, पंडित प्रदीप बारोट आणि पंडित सुरेश व्यास या सरोद वादकांचा समावेश आहे. उस्ताद अल्लाउद्दीन यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनाही अन्नपूर्णा देवींचा आधार होता. त्यात पंडित निखील बॅनर्जी आणि उस्ताद बहाद्दूर खान यांचा समावेश आहे. अन्नपूर्णा देवींनी मैफिलींना राम राम केल्यानंतरही अनेकांनी त्यांना त्यासंदर्भात विनंती केली. पण त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. पंतप्रधान इंदिरा गांधींसह देश आणि परदेशातल्या अनेक नामांकित व्यक्तीमत्वांनी त्यांना वादन चालू करण्याबद्दल आग्रह केला होता पण अन्नपूर्णा देवींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अन्नपूर्णा देवींना १९९७ साली पद्मभूषण, १९९९ साली देशिकोत्तम आणि २००४ साली संगीत-नाटक अकादमीची फेलोशीप मिळाले. हे कोणतेही पुरस्कार स्वीकारण्यास त्या स्वत: गेल्या नाहीत. उस्ताद अली अकबर खान एकदा म्हणाले होते की, रवी शंकर, पन्नालाल घोष आणि मी एका पारड्यात आणि अन्नपूर्णा देवी दुसऱ्या पारड्यात ठेवल्या तरीही त्यांची बाजू वरचढ ठरेल हे अगदी यथार्थ असं वर्णन आहे. मात्र नुकतच त्यांनी आपले एकांतवासाचे आजवर बाळगलेलं मौन सोडलं आहे. पंडित रवी शंकर यांची पत्नी म्हणून ओळख असलेल्या अन्नपूर्णा देवी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. पंडित रवी शंकर यांच्या बरोबरचा विवाह टिकवण्यासाठीच आपण संगीताला तिलांजली दिली. आम्ही दोघे एकत्र सितार वादन सादर केल्यानंतर लोकं मला अधिक दाद देत असत. मात्र हे रवी शंकर यांना आवडत नसे असं त्यांनी सांगितलं. रसिक माझ्या वादनाला देत असलेल्या प्रतिसादामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ लागला. पंडित रवी शंकर यांनी मला मैफिलीत सादरीकरण करु नये असं जरी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी मला मिळणारी दाद यामुळे ते आनंदी नव्हते. मला व्यवसायिक यश किंवा विवाहातील सौख्य यात निवड करण्याची वेळ आली, तेंव्हा मी विवाह सौख्याला प्राधान्य दिलं. मला नाव आणि लौकिक यापेक्षा लग्न टिकवणं अधिक महत्वाचं वाटलं. पण दुर्दैवाने एवढा त्याग करुनही हा विवाह टिकू शकला नाही. मी सर्वतोपरी प्रयत्न करुन पाहिले, पण मला यश आलं नाही. मला माझे वडिल उस्ताद अलाऊद्दिन खान यांना दुखावयचे नव्हते. उस्तादजी हे पापभिरु व्यक्तिमत्व होते. उस्तादजींना आपल्या मुलीचा विवाह मोडला हे आवडलं नाही. रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर १९८२ साली अन्नपूर्णा देवींनी आपले शिष्य ऋषीकूमार पंड्या यांच्याशी विवाह केला.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 23, 2017


  • संगीतकार अनिल विश्वास

    अनिल विश्वास यांनी ‘ धरम की देवी ‘ पासून १९६५ पर्यंतच्या छोटो छोटी बाते ‘ पर्यंत अंदाजे ७८ ते ८० चित्रपटांना संगीत दिले . विदेशी संगीताला कधीही जवळ न करणारा , त्यासाठी तडजोड न करणारा , अस्सल-भारतीय शास्त्रीय संगीताचा सतत ध्यास धरणारा संगीतकार अशी त्यांची ख्याती होती.

      July 28, 2021


  • नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व)

    बालगंधर्व या टोपणनावाने ओळखले जाणारे नारायण श्रीपाद राजहंस हे मराठी गायक-अभिनेते होते. संगीतनाटकांतील गायन व अभिनयासाठी - विशेषकरून स्त्री-पात्रांच्या अभिनयातील कामासाठी त्यांची ख्याती होती. ते पं भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. बालगंधर्व ही पदवी बाळ गंगाधर टिळकांनी दिली.

    जन्म 26 जून 1888 साली. संगीत रंगभुमीचा बहुमोल अंलकार. मूळ नाव नारायण श्रीपाद राजहंस असे होते. लोकमान्य टिळकांकडून वयाच्या 11 व्या वर्षी बालगंधर्व म्हणून कौतुक. किर्लोस्कर नाटक मंडळीत शारदेची पहिली स्त्री भुमिका केली. गंधर्व नाटक मंडळीची स्थापना. प्रभात कंपनीच्या धर्मात्मा बोलपटात एकनाथाची भुमिका 1929 पुणे येथील 24 व्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते. बालगंधर्वांनी सिंधु, रूक्मिनी, शारदा या प्रमुख स्त्री भुमिका केलेल्या होत्या. पद्मभुषणाने सन्मानित. त्यांचा मृत्यु 15 जुलै 1967 साली झाली.

    मराठी रंगभूमीवरील एक अव्दितीय गायक नट. पुर्ण नाव नारायण श्रीपाद राजहंस 1906 ते 1955 या पन्नास वर्षाच्या कालखंडात स्त्रीभूमीका आणि नंतर पुरूष भूमीकाही करून बालगंधर्वांनी रसिकांना संतूष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. जन्म पुणे येथे. वडीलांचे पुर्ण नाव श्रीपाद कृष्णाजी राजहंस व आईचे नाव अन्नपुर्णाबाई असून पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांच्याशी बालगंधर्वाचा विवाह 1907 साली झाला होता. त्यांना पाच आपत्य झाली. पुढे लक्ष्मीबाईंच्या निधनानंतर 1940 बालगंधर्वांनी प्रसिद्ध गायिका गोहराबाईंशी नोंदणी पद्धतीने 1952 च्या सुमारास विवाह केला. गोहराबाईंशी त्यांचा परिचय 1937 मध्येच झाला होता. नारायणरावांचे शिक्षण इंग्रजी दुसर्‍या इयत्तेपर्यंतच झाले. अतिशय मोहक आणि भावदर्शी चेहरा व गंधर्वतुल्य आवाज, या देणग्या त्यांना जन्मतच लाभल्या होत्या 1898 साली लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले; `हा तर बालगंधर्व आहे` असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले, असा प्रवाद आहे. पुढे नारायणराव `बालगंधर्व` म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

    त्यांच्या अंगातील उपजत गुणांचे चीज व्हायचे असेल, तर त्यांनी नटाचा व्यवसाय करावा असे त्यांच्या काही निकटवर्तियांना वाटत होते. किर्लोस्कर नाटक मंडळी ही त्या काळातली अग्रेसर संगीत नाटयसंस्था होती. तिचे संस्थापक अण्णासाहेब किर्लोस्कर आणि तिला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन बसविणारे गायक नट भाऊराव कोल्हटकर यांनी निर्माण केलेली थोर परंपरा महाराष्ट्राच्या परिचयाची होती. लोकमान्य टिळक आणि कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांचा आशिर्वाद घेऊन, 1905 सालच्या गुरूव्दादशीला बालगंधर्वांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. 1906 सालच्या सुरूवातीला बालगंधर्वांनी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल नाटकातील शंकुतलेची भूमिका केली. ती पाहून भाऊराव कोल्हटकर यांच्याबरोबर अस्तंगत झालेले किर्लोस्कर नाटक मंडळीचे सौभाग्य आज तिला परत लाभले, असे तत्कालीन नाटय रसिकांना वाटले. त्यावेळी नारायण दत्तात्रेय तथा नानासाहेब जोगळेकर हे किर्लोस्कर नाटक मंडळीचे अर्ध्वयू होते.

    त्या काळात नाटकांमध्ये स्त्रियांनी काम करणं निषिध्द मानलं जाई. त्यामुळे स्त्रीभूमिकाही पुरुषच करत असत. बालगंधर्वांच्या स्त्री-भूमिकांमध्ये विविधता होती. अचूक निरीक्षण व सौंदर्यदृष्टी यांमुळे अस्सल स्त्री भूमिका साकारण्यात बालगंधर्व यशस्वी होत. त्यांच्या भूमिकांमधील वेष व केशभूषेचं अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत. बालगंधर्व या भूमिकांशी तदरुप होऊन जात असत. त्यामुळे आपण या स्त्रीभूमिकांमध्ये एका पुरुषाला पाहात आहोत, अशी पुसटशी जाणीव देखील प्रेक्षकांना होत नसे. बालगंधर्वाच्या अभिनयाचा हा एक वैशिष्टयपूर्ण पैलू होता.

    1913 मध्ये बालगंधर्वांनी गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्याबरोबर भागीदारीमध्ये गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. पुढे टेंबे आणि बोडस या भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतर बालगंधर्व या कंपनीचे एकटे मालक झाले. संगीत रंगभूमीचा तो सुवर्णकाळच होता. अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी असे श्रेष्ठ नाटककार या काळात झाले. बालगंधर्वांनी `शाकुंतल` मध्ये शकुंतला, सौभद मध्ये सुभदा, मृच्छकटिक मध्ये वसंतसेना, `मानापमान`मध्ये भामिनी, `संशयकल्लोळ` मध्ये रेवती, शारदा मध्ये शारदा, मूकनायक मध्ये सरोजिनी, स्वयंवर मध्ये सिंधू ही स्त्री पात्रं रंगवली . 4 जून 1955 रोजी त्यांनी ’एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका. त्यांनंतर त्यांनी रंगभूमीवरुन निवृत्ती स्वीकारली. रंगभूमीवरील यशस्वी कारकीर्द व रसिकांचं भरभरुन मिळालेलं प्रेम यामुळे संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपतीपदक देऊन तर पुढे पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

    1933 च्या सुमारास भारतात बोलपटाचं युग सुरु झालं. त्यामूळे रंगभूमीकडे येणार्‍या प्रेक्षकांना ओहोटी लागली. बालगंधर्वही काही काळ चित्रपंटांकडे वळले. 1935 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या `धर्मात्मा` या चित्रपटांत त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली. मात्र बालगंधर्व चित्रपटांत रमले नाहीत. त्यांच्या ओढा रंगभूमिकडेच होता. म्हणूनच 1936 मध्ये ते पुन्हा रंगभूमीकडे परतले. 1939 पासून त्यांनी नाटकांमधून पुरुष भूमिका सादर करायला सुरुवात केली. `मानापमान` मध्ये धैर्यधराची आणि `मृच्छकटिक`मध्ये चारुदत्ताची भूमिका ते करु लागले. पण प्रेक्षकांना त्यांच्या स्त्री भूमिकाच अधिक प्रिय होत्या.

    बालगंधर्व हे गायक-नट होते. त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. ख्याल, नाटकांमधील त्यांची अनेक पदं गाजली. शास्त्राचा बाज राखून अभिनयाला अनुकूल असं गाणं त्यांनी गायलं. त्यांची गाणी घराघरांमध्ये पोहोचली. नाटयसंगीताची अभिरुची निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य करणार्‍या बालगंधर्वाचा 1967 साली मृत्यू झाला.

    बालगंधर्वांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (27-Jun-2017)

    नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व (17-Jul-2017)

      December 15, 2010


  • गोपाळ मेखले

    चार वर्षात केवळ एक एकर जमिनीवरील फुलशेतीतून ३०-४० लाखांचा टर्नओव्हर करणार्‍या आयटी स्पेशालिस्ट गोपाळ मेखले यांनी आपल्या गावात बचतगट, डेअरी, यासारखे यशस्वी प्रोजेक्टही राबवले आणि त्याची दखल हॉवर्ड युनिव्हसिर्टीने घेतली.

    गोपाळ मेखले शिक्षणाने इन्फमेर्शन टेक्नॉलॉजिस्ट, पण सध्या करतोय शेती. वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. चार वर्षांपूर्वी 'डेल' या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडूऩ त्याने़ शेतात राबायचा निर्णय घेतला, तेव्हा असंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण थोड्याच अवधीत त्याने एक मोठी हॉर्टीकल्चर इंडस्ट्री उभी केली आणि सगळ्यांनी त्याच्या यशाचं व त्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करायला सुरुवात केली.

    सध्याच्या पिढीचा आपला 'सीव्ही फ्लरीश' करुन सतत कंपन्या बदलण्याकडे कल असताना, काहीतरी वेगळं करायचं, घरची जबाबदारी सांभाळायची अशा विचारानं चाळीशीच्या आतील गोपाळ मार्च २००८ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या आपल्या सुगाव गावी आला. स्वत:च्या ३० एकर शेतीत हायटेक फ्लोरिकल्चर डेव्हलप केलं आणि दरसाल चक्क २०-३० लाखांचा टर्नओव्हर घेऊ लागला, हा त्याचा प्रवास नक्कीच वेधक आहे. पण त्यामागे त्याची बुध्दी आणि कठोर मेहनतही आहे. खरंतर गोपाळ २००२ ते २००८ या कालावधीत पूण्याला नोकरी करत होता. नोकरीत चांगलं चाललं होतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आईवडिलांनी पुण्यात कायमचं आपल्याकडे यावं, असं त्याला वाटलं. पण मुलाकडे राहायची इच्छा असतानाही गोपाळच्या आईवडिलांना पुण्यात नकोसं वाटलं. सुगाव सारख्या लहान गावात आयुष्य काढलेल्यामुळे त्यांना शहराचं आकर्षण होतं, मुलगा सोबत असणार म्हणून आनंदही झाला होता. परंतु पूर्णपणे पुण्यात स्थायिक होणं त्यांना पचलं-आवडलं नाही. शिवाय गावाकडे असलेल्या ३० एकर शेतीचं काय, असा प्रश्न गोपाळच्या आईवडिलांना भेडसावत होता. शेवटी मातीची माया वरचढ ठरली आणि त्यांनी सुगावातच राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे म्हाताऱ्या आईबाबांकडे कोण लक्ष देणार, ते ३० एकराची शेती कशी पाहणार, असे विचार गोपाळला छळायला लागले. त्याचं कामावरुन लक्ष उडालं. अन् एके क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला- आपणच सुगावला गेलं तर! पण पुण्यासारख्या शहरात आठ वर्षं नोकरी केलेल्या गोपाळसाठी गावी परतण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. किंबहुना भविष्य खेड्यात काढायचं या कल्पनेने त्याला जणू काही फ्रस्ट्रेशनच आलं. पण शहर की गाव, आपलं भविष्य की कर्तव्य या संघर्षात अखेर वरचढ ठरलं ते मुलगा म्हणून करायचं कर्तव्य! आणि तडक सात वर्षांची नोकरी सोडून, पुण्यातील गाशा गुंडाळून गोपाळ सुगावला परतला.

    सुगावला येताच गोपाळचं पुन्हा नव्यानं स्ट्रगल करणं सुरु झालं. यावेळी स्ट्रगल जरा वेगळं होतं. एकीकडे शेती करण्याचं प्लॅनिंग सुरु असतानाच, पुण्यात नोकरीला असताना सुरू झालेली लग्नाची बोलणी एकदम बंद झाली. स्थळं येणं बंद झालं. घरी येणारा लठ्ठ पगारही बंद झाला. पण एव्हाना काय करायचं त्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याने सुगावातच बचतगट स्थापनं करणं, डेअरी प्रोजेक्ट आखणं, हॉटीर्कल्चर फार्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं ही कामं करायला सुरुवात केली. दरम्यान एक स्थळ येऊन त्याचं लग्नही झालं. त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण गोपाळला अजून खरा टप्पा गाठायचा होता. त्याचं लक्ष होतं, फ्लोरिकल्चर युनिटकडे. इथे तळेगाव दाभाडे येथे हॉटीर्कल्चरचं घेतलेलं शिक्षण उपयोगी आलं.

    एकूण ३० एकर पैकी १ एकरात गोपाळचे प्रयोग सुरु झाले. एक एकर शेतात जरबेराचं उत्पादन घेण्याचं ठरलं. काही लाखांची स्वत:ची गुंतवणूक व कॅनरा बॅंकेकडून घेतलेलं कर्ज या बळावर त्याने, 'इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट'करावी तशी शेतीत इन्व्हेस्टमेंट सुरु केली. शेती कोरडवाहू, त्यात अनेक अडचणी. ग्रीनहाऊस, फ्लोरिकल्चर हाऊस कसं उभारावं हा प्रश्न. पण हा प्रश्नही सोडवला गेला तो गावातीलच १२ जणांना घेऊन. गोपाळने़ १२ जणांना रोजगार दिला. मेहनत सुरु झाली. कोरडवाहूत एक पॉलीहाऊस उभारलं गेलं. ऊस, सोयाबीन, तूर यासारखी पीकंही फ्लोरिकल्चरच्या जागे व्यतिरिक्त पारंपरिकपणे घेणं गोपाळने सुरु ठेवलं. लागवडीनंतर रोज किमान ४ हजार जरबेराची फुलं येऊ लागली. त्यामुळे आता त्याच्या माकेर्टिंगची जबाबदारी आली. लातूर, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी माल जाऊ लागला पहिल्या वर्षी जेवढी इनव्हेस्टमेंट केली तेवढी काढणंही कठीण झालं. पण कधीही न संपणारा अनुभव पाठीशी आला. पहिल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यात करण्यात दुसर्‍या वर्षी यश आलं. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी आल्यानं २००९-२०१० साली १० लाख, त्याच्या पुढील वर्षी २० लाख तर, तर यंदा तब्बल ४० लाखावर उलाढाल गेली. अर्थात फुलांच्या धंद्यात चढउतार नसतात, असं नाही.कधी जरबेराच्या एका फुलाला अडीच, तर कधी ८ रुपये दरही आला. ह्यातून अॅग्रिकल्चर ही एक 'इंडस्ट्री' म्हणून गोपाळने याला 'ट्रीट' केलं. माकेर्टिंग, पॅकेजिंग, अशा टेक्निकल बाबी शिकून घेतल्या. दिल्लीपर्यंत फुलांची बाजार नेल्यानंतर, आता गोपाळ दुबई, अमेरिकेची स्वप्न पाहू लागला आहे. तब्बल बारा जणांच्या बळावर आता ही फुलशेती हायटेक होऊ लागली आहे.

    आधुनिक काळात ज्या ज्या म्हणून तांत्रिक बाबी गावात यायला हव्यात, त्या-त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात गोपाळला यश आलं आहे. गावात डेअरी फार्म, ज्वारी-गव्हाच्या पीठाचा कारखाना, बचत गट, भाजीपाला उत्पादन, अत्याधुनिक शेतीकडे युवकांना अॅग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून पाहायला भाग पाडणे, त्या दृष्टीने प्रबोधन करणं, लातूरमध्ये डेअरी फार्म मधून म्हशीचं प्युअर दूध मिळवून देणं, आदी प्रोजेक्टही हळूहळू सुरू करण्यात गोपाळला यश आलं आहे.

    नुकतंच हॉवर्ड युनिर्व्हसिटीचं एक डेलिगेशन खास त्याचे हे प्रयोग पाहायला त्याच्या शेतात येऊन गेलं. बॅंकेचं पाठबळ, दुर्दम्य इच्छा शक्ती आणि 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग'ने केलेल्या हायटेक फुलशेतीच्या जोरावर, गोपाळ मराठवाड्याच्याच काय राज्यातील मुलांसाठी एक युथ आयकॉन ठरला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017