(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ दिग्दर्शक दिनकर द. पाटील

    आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत.

      March 21, 2022


  • प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

      July 7, 2022


  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर

    अणुऊर्जा निर्मिती ही कोणत्याही देशातील शास्त्रज्ञांसमोर एक फार मोठे आव्हान असते. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या देशातील डॉ. अनिल काकोडकरांच्या सारख्या शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात केलेली कामगिरी असाधारण अशीच म्हणावी लागेल.

      November 11, 2021


  • गोव्यातील ओल्डचर्चमधील सेंट फ्रान्सिस झेविअर

    गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं.

      December 3, 2021


  • नाटककार के. नारायण काळे

    व्ही. शांताराम यांनी काळे याना ‘ वहॉ ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. त्यामध्ये आर्य आणि अनार्य यांच्यामधील संघर्ष दाखवला होता.

      August 9, 2021


  • नाटककार बन्याबापू (नरहरी गणेश कमतनूरकर)

    मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला.

    नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही दिवसातच ते अपयशी ठरले. तरीही, कमतनूकरांनी लिहिलेल्या संवादांचा नूर काही औरच आहे हे समीक्षकांच्या नजरेस आले, आणि कमतनूकर हे नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत लेखक आहेत, हे सिद्ध झाले. नाटकाची संहिता राम गणेश गडकरी यांच्या खटकेबाज संवादांची आठवण करून देणारी आहे.

    ’श्री’चे ५०-६० प्रयोग झाल्यानंतर 'ललित कलादर्श’ने प्रयोग करणे थांबवले. मात्र, ललित कलादर्शच्या शतक महोत्सवात हे नाटक परत रंगभूमीवर आणायचे असे डोंबिवलीकरांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे ४ जानेवारी २००८ रोजी या नाटकाचा प्रयोग ’डोंबिवली भूषण’ शं.ना. नवरे यांच्या उपस्थितीत झाला.

    ’श्री’ नाटकाची मूळ संहिता २५० पानांची होती, ती ६० पानांवर आणली गेली. अप्पासाहेब रावबहादुर, त्यांचा जुगारापायी बिघडलेला मुलगा कुसुमाकर, त्यांची तरुण मुलगी श्री व घरजावई श्रीकांत, कुसुमाकर याची पत्नीस कात्यायनी व कुटुंबाला पूर्णपणे बरबाद करणारा अप्पासाहेबांचा मित्र व खलनायक विश्राम आणि रेसचा बुकी सत्यवान सत्यवादी अशी मोजकी सात-आठ पात्रे नाटकात आहेत. नाटकातल्या ’सत्यवान सत्यवादी’ नावाच्या इरसाल पात्राची भूमिका सुहास नवरे यांनी व्यावसायिक अंदाजाने खुलवली होती. श्रीकांतला घोड्याच्या रेसचा नाद सत्यवान आणि विश्राम हे दोघे लावतात; पण गांजेकस असलेला सत्यवान मनाने चांगला आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.

    विश्रामची भूमिका डोंबवलीकर विवेक जोशी यांनी, अप्पासाहेबांची सुरेश ताम्हाने यांनी आणि ’श्री’ची प्रज्ञा देवस्थळे यांनी रंगविली होती नाटकातल्या पदांना विलास हर्षे यांनी चाली बसवून दिल्या होत्या. हे नाटक वेलणकर यांच्या ’सार्थक’ या संस्थेने रंगभूमीवर सादर केले होते. बापूराव पेंढारकार जेव्हा हे ’श्री’ नावाचे नाटक रंगभूमीवर सादर करायचे, तेव्हा पडद्यावर कॅमेराच्या साहाय्याने ते घोड्यांची शर्यत दाखवायचे. लोकांसाठी तो सर्वाधिक आकर्षणाचा मामला होता. २००८ साली डोंबिवलीत झालेया प्रयोगात मात्र पडद्यावर शर्यती दाखवणे शक्य झाले नव्हते.

    नरहरी गणेश कमतनूरकर यांचे निधन १३ डिसेंबर १९६९ रोजी झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #BanyaBapu #NarhariGaneshKamatnurkar

      May 4, 2022


  • डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे

    पाच संतकवी, महानुभाव पंथ आणि त्याचे वाङ्मय, लीळाचरित्र, मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड – १, प्राचीन मराठी शब्दकोश, गुरुदेव रानडे – चरित्र व तत्त्वज्ञान, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

      June 29, 2022


  • हिंदी चित्रपटातील यशस्वी आणि चर्चेतील अभिनेत्री गीता बाली

    गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते.

    राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर मा.गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.मा.गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2018


  • मराठी चित्रपटातील खाष्ट सासू – दया डोंगरे

    मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे.

    दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च १९४० रोजी झाला.

    मा.दया डोंगरे यांना गायिका व्हायचे होते. नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर मा.हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाटय़संगीतही शिकल्या. त्या अवघ्या १२ वर्षांच्या असताना आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले होते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या १९ वर्षांच्या होत्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित मा.दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते.

    दया डोंगरे आजही दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करतात. आपल्या वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे मा. दया डोंगरे यांचे शिक्षण काही काळ धारवाड, त्यानंतर पुणे व दिल्ली येथे झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ते तेवढंच. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आई मा.यमुताई मोडक यांच्या कडून मिळाला. मा.यमुताई मोडक यांनी त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा. दया डोंगरे यांची आत्या मा.शांता मोडक या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत त्यांना नाटकातून काम केले होते. मा.शांता मोडक यांना त्या काळी दामुअण्णा मालवणकर यांनी एक हजार रुपये पगार दिला होता. त्यांचा वारसा चालवायची संधी मा.दया डोंगरे यांना होती. पण त्यांनी आत्याच्या ओळखीचा कधी शिडी म्हणून वापर केला नाही. महाविद्यालयीन जीवनात मा.दया डोंगरे यांनी विशेष चमक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित "रंभा' या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र मिळाले. पुण्यात आल्या नंतर मग मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या होती. अर्थातच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीत "एनएसडी'मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण त्या वेळी त्यांनी संसारातही प्रवेश केल्याने त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले. याच काळात सई परांजपे, सुधा शिवपुरी आणि विनायक चासकर ही मंडळी "एनएसडी'मध्ये दाखल झाली होती. तेथील शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात मा.दया डोंगरे काम करत असत. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टहास, इडा पिडा टळो यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपली चमक दाखवली होती.

    दया डोंगरे यांच्या घरात त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती. त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. १९६९ च्या सुमारास त्या मुंबईला आल्या आणि मग त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली. नाट्यमंदिर या संस्थेने विद्याधर पुंडलिकाचे "माता द्रौपदी' हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील द्रौपदीची भूमिका विजया मेहता करत, तर गांधारीची भूमिका दया डोंगरे. दोन कसलेल्या अभिनेत्रींची ही झुंज पाहण्यासारखी असे. दुर्दैवाने या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण त्यानंतर आलेल्या "लेकुरे उदंड झाली' या नाटकाने मात्र दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. श्रीकांत मोघे यांच्याबरोबर त्या यामध्ये काम करत. त्यानंतर आले ते "संकेत मीलनाचा' हे वेगळ्या विषयावरची परकीय संकल्पनेवरचे नाटक तेही गाजले. मा.दया डोंगरे यांनी नाटक सुरू असतानाच दूरदर्शनवर काम करणे सुरू केले. त्या वेळी आजच्या इतक्याग वाहिन्या नव्हत्या. मात्र दिल्ली दूरदर्शनवरही त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मुंबईत आल्यावर नाटकांची घोडदौड सुरू झाली होतीच, पण त्या वेळी मुंबई दूरदर्शनची सुरवात होती. मा.दया डोंगरे यांच्या अभिनयप्रवासात मुंबई दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाला विशेष स्थान आहे. मा.सुरेश खरे यांचे लेखन आणि दया डोंगरे यांचे निवेदन त्यात असायचे. या कार्यक्रमानेही खूप प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्या सांगतात. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय होता. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमामुळे ‘गजरा क्वीन’ अशी त्यांना ओळख मिळाली. याबाबतची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, एकदा ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी मी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण काही क्षणातच गाडी थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली होती. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी त्यांची दादही मिळाली. मा.ललिता पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘सासू’ म्हणून दया डोंगरे यांचेच नाव घेतले जाते. दया डोंगरे म्हणजे ‘खाष्ट सासू’ असे समीकरण तयार झाले. सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘सासू’ साकारली. ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ किंवा दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील त्यांची ‘सासू’ गाजली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर सर्वसामान्य प्रेक्षकांना मनात आपल्याविषयी भीती, तिरस्कार निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. ती त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती होती. ‘सासू’ साकारताना माझ्या डोळ्यांपुढे कोणीही नव्हते किंवा मी कोणाचे अनुकरणही केले नाही. मी माझ्या पद्धतीने ‘सासू’ साकारली, असे त्या आपल्या मुलाखतीत सांगतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ‘मी लहान असताना मला तुमच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची’ असे सांगितल्याची आठवण त्या सांगतात. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘उंबराठा’, ‘कुलदीपक’, ‘आत्मविश्वास’ हे त्यांचे आणखी काही चित्रपट. दूरदर्शनवरच अधिकारीबंधूंच्या ‘बंदिनी’ मालिकेत तसेच ‘वेडय़ांचा बाजार’मध्ये मी वृद्ध स्त्रीची भूमिका केली. आजवर रंगविलेल्या खाष्ट, दुष्ट आणि कजाग ‘सासू’पेक्षा या भूमिका वेगळ्या होत्या. कोणतीही भूमिका करताना कलाकाराला त्या भूमिकेत शिरण्याबरोबरच बाहेरही पडता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मी माझ्या ‘भूमिका’ रंगविल्या असे त्या म्हणतात. दूरदर्शनवरच्या ‘स्वामी’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘गोपिकाबाई’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन यातून एक छान मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मराठीप्रमाणेच हिंदीत त्यांनी काम केले. जब्बार पटेल यांच्या ‘सुबह’ (मराठीतील उंबराठा), अमोल पालेकर यांच्या ‘आश्रय’मध्ये त्या होत्या. "मायबाप' चित्रपट असो, की "खट्याळ सासू नाठाळ सून' असो किंवा "उंबरठा'सारखा वेगळा चित्रपट असो या सगळ्यात दयाबाईंची भूमिका छोटी असो की मोठी त्या लक्षात राहायच्याच. तेच तर त्यांचे वैशिष्ट्य होते. सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वाचस' चित्रपटात तर त्या वेगळ्या भूमिकेत होत्याच, पण त्याच्या आधीच्या "नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटातील करारी स्त्रीचे त्यांचे रूप अनेकांच्या आजही स्मरणात आहे. गजानन जहागीरदार यांना दिग्दर्शित केलेल्या "स्वामी' मालिकेत त्यांनी माधवरावांच्या आई गोपिकाबाईंचे काम केले होते. त्यातील त्यांचा करारीपणा अनेकांना आवडला होता. ‘नकाब’ चित्रपटात ऋषी कपूरच्या तर ‘दौलत की जंग’ चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्यांनी केली. पण हिंदीत त्या विशेष रमल्या नाहीत. नाटक चित्रपट आणि मालिका यामधून त्यांनी लीलया काम केले असले तरी त्या रमल्या खऱ्या रंगभूमीवरच. वसंत कानेटकरांच्या "माणसाला डंख मातीचा' या नाटकात त्यांनी सुप्रियाची भूमिका साकारली होती. ही अवघड भूमिका त्यांनी इतक्याट प्रभावीपणे केली, की खुद्द कानेटकरांनी माझ्या डोक्याातलं सुप्रियाचं पात्र तुम्ही सही सही उभं केलंत अशी पावती दिली. नाटकककाराने अशी पावती देणं हे सन्मानाचंच, दया डोंगरे यांनी असा सन्मान खूप वेळा मिळवला होता. कारण त्यांच्या अभिनयाची तेवढी ताकद आणि त्यांची तितकी गुणवत्ता आहे. आजच्या पिढीला मा.दया डोंगरे यांची ओळख आहे ती त्यांनी साकारलेल्या सासूच्या भूमिकेचीच. खाष्ट सासू किंवा करारी स्त्री अशाच भूमिका त्यांच्याकडे त्या काळात आल्या. खरं तर त्यांच्या अभिनयाची रेंज ही तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर विविध व्यक्तिरेखा समर्थपणे करणाऱ्या या अभिनेत्रीचे चीज मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीने केले नाही. त्यांना मायबापमधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार, तसेच नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार मिळाला होता. १९९० मध्ये ‘चार दिवस सासूचे’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. ‘एण्ड्रोपियॉन’ या डोळ्यांच्या आजारामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. बसमधून एकदा प्रवास करताना बसच्या वाहकाने, ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक मी २५ वेळा पाहिले’ किंवा ‘काय दुष्ट बाई आहे ही, अशा बाईच्या घरात कोण मुलगी आपली सून म्हणून देईल,’ अशी पुण्यातील एका नाटय़प्रयोगाच्या वेळी मिळालेली प्रतिक्रिया त्यांना अधिक मोलाची वाटते. माझ्या सुदैवाने मला चांगले नाटककार, दिग्दर्शक आणि सहकलाकार मिळाले, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.

    ‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाचा विषय निघाला की त्या आजही हळव्या होतात. सातारा येथील नाटकाचा प्रयोग आटोपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगाठी बसने जात होती. या बसला भीषण अपघात झाला. अपघातातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. ही आठवण व तो प्रसंग आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो.

    दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या. संगीता व अमृता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    दया डोंगरे यांची नाटके व चित्रपट - मंतरलेली चैत्रवेल, रंभा, वैदेही, लेकुरे उदंड झाली, संकेत मीलनाचा, चिं. सौ. कां. चंपा गोवेकर, अमानुष,

    चित्रपट- नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, उंबरठा, आश्रय, जुम्बीष,

      March 12, 2017


  • हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व

    सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला. ‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.

    त्या सुमारास अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे १९०८ पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकला संगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले.

    सवाई गंधर्वांनी १९०८ ते १९३१ पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला १९३१ नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत.

    किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्याप आणि अधिकच उजळविणार्या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या त्यांचे शिष्य यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली. मा.सवाई गंधर्व यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 19, 2018