(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आद्य कापड-कारखानदार विष्णु रामचंद्र वेलणकर म्हणजेच धनी वेलणकर

    वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले.

      April 22, 2022


  • हरिभाऊ शेजवळ

    प्राचीन काळात उत्तर कोकणाची राजधानी असणार्‍या श्रीस्थानक अर्थात आत्ताच्या ठाणे जिल्ह्याच्या इतिहासाचे संकलन व त्याची माहिती सामान्य माणसाला कळावी, यासाठी हरिभाऊ शेजवळ यांनी मोठा वाटा उचलला आहे..

      June 20, 2013


  • क्षिती जोग

    तिने ‘ये रिश्ता क्या कहलता है’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’ अशा हिंदी मालिकेतूनदेखील आपल्या अभिनयाची छबी उमटविली आहे. त्याचबरोबर क्षितीने ‘संशय कल्लोळ’, ‘माई’ असे चित्रपटदेखील केले आहेत.

      June 25, 2022


  • नरेंद्र केशव पावसकर

    नरेंद्र पावसकर यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमधून झाले आणि उच्च कला शिक्षण हे जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई मधून झाले.

      May 16, 2014


  • दिग्दर्शक एन एस वैद्य

    त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.

      November 10, 2021


  • रजनीकांत

    रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले. सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, गावातील वयोवृद्ध माणसे याबद्दल सांगायची. या गावातील चंद्रकांत गायकवाड हे रजनीकांत यांचे जवळचे नातेवाईक. चंद्रकांत यांचे आजोबा आणि रजनीकांत यांचे पणजोबा हे सख्खे भाऊ होते. गावामध्येही रजनीकांत हे याच गावाचे असल्याची चर्चा व्हायची पण ठोस अशी माहिती कोणाकडेच नव्हती. दहा महीन्यांपुर्वी लक्ष्मण पोटे यांनी दूरदर्शनवर रजनीकांत यांची मुलाखत पाहिली होती त्यात ‘माझे मूळ गाव जेजुरीच्या पूर्वेला आहे’ असे सांगितले होते. त्यामुळे गावकर्यांमध्ये एक आशा उत्पन्न झाली, रजनीकांत हे शूटिंगसाठी लोणावळा येथे येणार असल्याचे गावकर्यांना कळताच त्यांनी समक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांना आपल्या मूळ गावाबद्दल सांगितले व गावी येण्याचा आग्रह केला.

    रजनीकांत यांनी हे निवेदन वाचताच ग्रामस्थांशी थेट मराठीतच बोलायला सुरवात केली. मावडीचे सरपंचांना त्यांनी आलिंगन देत मी गावाला नक्की येतो, असे म्हणाले व आपुलकीने संवाद साधला. गावासाठी काय देऊ असा प्रश्नही त्यांनी विचारला व गावकर्यांनाही चेन्नईला येण्याचे आमंत्रण देत स्वत:च्या मोबाईल कॅमेऱ्याने ग्रामस्थांची छायाचित्रे काधून घेतली.

    रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’....
    ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४०% एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात (शिवाजी-द बॉस या चित्रपटासाठी त्यांनी २० कोटी रुपये घेतले होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले.) आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये (नाहीतर आपले बच्चन साहेब बिस्किटांपासून बोरोप्लस पर्यंत सर्व जाहिरातीत झळकतात. बच्चन साहेब आता फक्त संडासच्या डब्याची जहिरात करायचे बाकी आहेत. ती पण करतील एखादे दिवशी ) आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत. मनोरंजन व्यवसायातील प्रसिद्ध व्यक्ती,चित्रपटातील एक मोठे व्यक्तीमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी / लोककल्याणकारी व्यक्ती आहे.एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे,आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार आहेत. 'शिवाजी द बॉस' चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत,तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षीही ते चित्रपटात मुख्य नायिकेची भुमिका निभावतात.

    मात्र, जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. यंदा आपला वाढदिवस धामधुमीत साजरा न करण्याचं आवाहन रजनीकांतनी चाहत्यांना केलं आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांसाठी एक आवाहनही केलं आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2017


  • राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

    महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.

    जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

    राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

    शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.

    आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.

    जीवन

    शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

    राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

    राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

    शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      July 11, 2015


  • गीतकार योगेश्वर अभ्यंकर

    योगेश्वर अभ्यंकर हे महान गीतकार होऊन गेले. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.'अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले' यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. सर्जनशील कवी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश्वर अभ्यंकर यांचे १४ नोव्हेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 6, 2017


  • मराठी कवी व गीतकार कवी संजीव

    कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील 'वांगी' गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      February 28, 2017


  • राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर

    चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुर भांडारकर यांचे आवडते दिग्दर्शक. मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा.

    घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं परवडत नसल्याने त्याने रस्त्यावर, मेळ्यांमध्ये, सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत असे साधारण १५०० चित्रपट त्यानं पाहिले. ज्या वयात मुलं अमर चित्रकथा, चांदोबा वाचायचे, त्या वयापासून तो स्टारडस्ट, फिल्म फेअर अशी मॅगेझीन्स वाचायचा.अशोक गायकवाडांकडे इंटर्नशिप केली. नंतर रंगिला, रात, रेवती अशा चित्रपटांत राम गोपाल वर्मांना असिस्टही केलं.

    त्रिशक्ती हा मधुरचा पहिला सिनेमा. त्याच्या इतर सिनेमांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा होता. चांदनी बार या चित्रपटानं मधुरला खरी ओळख मिळवून दिली. त्याविषयी बोलताना मधुर भांडारकर म्हणतात 'स्ट्रगलिंगच्या काळात माझा मित्र मला एका बारमध्ये घेऊन गेला. तो लेडिज बार होता. म्हणजे एकदम वेगळच वातावरण. शिफॉन साडीतल्या बायका, लाउड म्युझिक सगळं वातावरणच वेगळं होतं. मी मित्राला म्हटलं अरे कुठे घेऊन येतोस मला… लोक म्हणतील फिल्म फ्लॉप झाली म्हणून मधुर आता इकडे दिसायला लागला. मी लवकरात लवकर तिथून बाहेर पडलो. पण घरी आल्यावर मला जाणवलं की त्यातलं ते जे गाणं होतं मुंगळा मुंगळा ते गाणं माझ्या डोक्यात बसलं होतं. दुसर्याल दिवशी मी मित्राला म्हटलं मला बारमध्ये जायचय. मग आम्ही तीन-चार बार फिरलो.

    शेवटी सायन-कोळीवाड्यातल्या एका जुनाट बारमध्ये मी निर्णय घेतला की आपण बारवर फिल्म बनवायची. मग मी त्यावर रिसर्च केला. ४-५ महिने मी वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन बसायचो. कनेक्शन्स काढली. कॉन्टॅक्ट्स मिळवले आणि मग पिक्चर बनवला. मधुर भांडारकर यांना तीन वेळा नॅशनल अॅववॉर्ड् मिळाले आहे. मधुर भांडारकर यांचे प्रमुख चित्रपट:- चांदनी बार, सत्ता, पेज थ्री, कॉर्पोरेट, ट्राफीक सिग्नल.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :-इंटरनेट

      August 26, 2017