(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विनय आपटे

    आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.

    अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले मा.विनय आपटे चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. मा.विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.

    विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.

    ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.

    ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    त्यांची गाजलेली नाटके
    रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.

    गाजलेले चित्रपट
    एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.

      October 29, 2019


  • बाळकृष्ण गणेश खापर्डे

    जन्म - १२ ऑगस्ट १८८०

    १८८०> “दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र” लिहिणारे दादासाहेबांचे पुत्र, बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म, “साहित्याची प्रेरणा, पद्धती आणि ध्येय” हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.

    mss

      August 2, 2017


  • रति अग्निहोत्री

    रति अग्निहोत्रीने अनेक हिंदी चित्रपटात काम केले असून तिचा"एक दुजे के लिए'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. अभिनेत्री रति अग्निहोत्रीचा जन्म १० डिसेंबर १९६० रोजी मुंबई मध्ये झाला. रतीने बॉलिवूडमध्ये या चित्रपटाने पाऊल ठेवले. या पहिल्याच चित्रपटाने रतीला रातोरात स्टार बनवले. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे तिला ३ वर्षात ३२ तेलगु चित्रपटात काम करायाची संधी मिळाली.

    रतीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केलीय. लग्नानंतर रतीने एक मोठ्ठा ब्रेक घेतला. यानंतर तब्बल सोळा वर्षांनी ‘कुछ खट्टी, कुछ मीठी’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. या चित्रपटात तिने काजोलच्या ग्लॅमरस आईची भूमिका साकारली होती.

    अलीकडच्या काळात ‘शादी के साइड इफेक्ट्स’,‘सिंह इज ब्लिंग’ यासारख्या सिनेमात रती अलीकडे दिसली होती. रतीला तनूज नावाचा एक मुलगा आहे. ‘लव्ह यू सोनीयों’ या चित्रपटातून तनूजने बॉलिवूड मध्ये प्रवेश केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 7, 2019


  • लोकप्रिय गायक नट श्रीपाद गोविंद नेवरेकर

    मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळ मधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती.

      July 3, 2017


  • शाहीर पठ्ठे बापूराव

    पठ्ठे बापूरावांचे खर नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी झाला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्याय जात्यावरच्या ओव्यां ऐकून ऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी` या नावाने लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा.

    ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव` म्हणून ते प्रसिद्धीला आले.

    `पठ्ठेबापूराव`, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्याीत पसरली.

    १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला. मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्या स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. मा.पी.पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 22, 2018


  • कवी शंकर वैद्य

    वयाच्या सहाव्या वर्षापासूनच शंकर वैद्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते कविता करू लागले. ‘ कालस्वर ‘ हा पहिला काव्यसंग्रह होता. त्यांच्या अनेक कविता गाजल्या . त्यापैकी ‘ आम्ही पालखीचे भोई ‘ ही कविता तर अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण होती.

      July 22, 2021


  • बालकुमार साहित्यकार सुधाकर प्रभू

    सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमार साहित्यकार होते.

    सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी `आनंद` व भा.रा. भागवतांच्या `बालमित्र` या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

    सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील `राजू प्रधान` ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या `फास्टर फेणे`प्रमाणे लोकप्रिय ठरली.

    पुस्तकांखेरीज `साप्ताहिक स्वराज्य`, `रविवार सकाळ`, `साप्ताहिक हिंदू`, `साधना` यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले.

    बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले.

    कोल्हापूर येथे 1991 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    30 जुलै 2007 रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.

      March 11, 2015


  • अनंत गणेश गाडगीळ (दाजीकाका  गाडगीळ)

    अनंत गणेश गाडगीळ (दाजीकाका गाडगीळ)

    अनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्‍या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.

      January 10, 2014


  • जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.

      November 13, 2021


  • आयुष्य पणाला लावणारे संशोधन

    १९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना प्रयोगशाळेत मदत करायची. प्रयोगशाळेत काम करता करताच तिला विज्ञान आणि त्यातील संशोधनाविषयी आवड निर्माण होत गेली. पोलंडमध्ये त्या वेळी असलेल्या जुलमी सत्तेविरुद्ध क्रांतिकारकांनी बंड उभारले होते. देशभक्त मेरी क्रांतिकारकांच्या सभांनाही उपस्थित राहायची. मात्र सरकारला याची कुणकुण लागली व मेरीला अटक होण्याची वेळ आली. मात्र, यामुळे आपल्या विज्ञानाच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मेरी पोलंड सोडून परिसला गेली. सुरुवातीला तेथे तिला अतिशय कष्टात दिवस काढावे लागले. एका प्रयोगशाळेत ती तेथील बाटल्या धुण्याचे काम करीत असतानाच ' पियरे क्युरी ' या वैज्ञानिकाशी तिचा परिचय झाला व पुढे मेरीने त्यांच्याशीच विवाह केला. विवाहानंतर मेरीने पियरे करी यांना संशोधन कार्यात खूप मदत केली. उभयतांनी १८९८ मध्ये ' पोलोनियम ' चा तर त्यानंतर ' रेडियम ' चा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दलच त्यांना १९०३ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे पियरे क्युरी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मेरी खूरीने पुन्हा एकदा रेडियममधील आरोग्यदायी शक्तीचा शोध लावला व त्वाबद्दल तिला १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९१४ मधील पहिल्या महायुद्धात मेरी क्युरीने आरोग्य सेविका म्हणून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची सेवाही केली. त्यानंतर काही वर्षांनी तिचा साचू झाला. तिच्या मृत्युच्या कारणाबाबत डॉक्टरांमध्ये मतभेद होते. वास्तविक रेडियमच्या किरणोत्सर्गानी तिचे सारे शरीर पोखरले गेले होते. एका महत्त्वाच्या संशोधनासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले होते.

      February 8, 2017