(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पी.सावळाराम

    शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.

    १९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, मा.गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.

    शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (मा.शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. मा.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...

    "बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
    त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • नाटककार जॉर्ज कॉफ्मन

    त्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर ॲ‍ट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं.

      June 2, 2022


  • ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर

    क्रीडा क्षेत्रातील दिग्गज पत्रकार व मराठीतील ज्येष्ठ समालोचक विष्णू विश्वनाथ करमरकर उर्फ वि.वि.करमरकर यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला.

    वि. वि.करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते. खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.

    ‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर मुळचे नाशिकचे. वि. वि.करमरकर यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. वि. वि. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते.

    मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र त्यांच्या वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. वि. वि. करमरकरांनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली. लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले.

    पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली.

    जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख व सहसंपादक या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

    क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले.

    पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला.

    १९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’मधून मांडली. दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात.

    खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले.

    देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन 'महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थे'ची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्ना गिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.

    बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लेखमाला लिहिल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 11, 2021


  • (डॉ.) मुकुंद घारे

    घारे, (डॉ.) मुकुंद
    सध्याच्या ओव्हर स्पेशलायझेशनच्या काळात आपापल्या क्षेत्रापुरता संकुचित विचार न करता त्या पलीकडे पाहणारे लोक सापडणे दुर्मिळच! निसर्ग, पर्यावरण, पाणी हे विषयही त्याला अपवाद नाहीत. अशी व्यापक दृष्टी असलेले पर्यावरण व जलअभ्यासक डॉ. मुकुंद घारे यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. भूशास्त्र, पाणी, नैसर्गिक साधनसंपत्ती, ग्रामीण समस्या आणि सध्याच्या सामाजिक स्थितीचे भान, अशा विविध गोष्टींचे नेमके आकलन हे घारे सरांचे वैशिष्टय़ होते.

    त्यासाठी ते अनेक दिग्गजांसाठीसुद्धा गुरुतुल्य होते. कोकणातील खाणींविषयी भूशास्त्रीय सल्लागार, भूजलतज्ज्ञ तसेच ‘अफार्म’च्या माध्यमातून पाणलोट व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनेकांना ज्ञात आहे; पण त्याच्या पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. बोलणे, जगणे आणि विचारातील साधेपणा त्यांच्याकडे होता. त्यामुळे विविध विषयांतील तज्ज्ञांपासून ते सामान्य माणसापर्यंत त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यांची विविध समस्या आणि प्रश्नांची उकल करणारी मांडणीसुद्धा अशीच साधी, सरळ असायची. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका तज्ज्ञाबरोबरचकार्यकर्तासुद्धा दडलेला होता आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांचा थेट संवादही होता. त्यामुळे अनेक तज्ज्ञांमध्ये पाहायला मिळणारा समाजापासूनचा तुटलेपणा त्यांच्यामध्ये कधीच जाणवला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध घटकांशी ते इतक्या सहजतेने व मिसळून वावरू शकायचे. म्हणूनच ते ज्ञान, अनुभव व वयाने मोठे असले तरी त्यांचे कधी दडपण येत नसे. त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे विदारक वास्तवाची माहिती व नेमकी जाणीव झाल्यामुळे येणारी निराशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात कधी दिसली नाही. समस्या परखडपणे मांडतानाही ते आशावादी होते. विविध प्रश्न, मुद्दे जाणून घेण्यासाठी त्या त्या भागात जाणे वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत त्यांनी सुरूच ठेवले. अनेक तरुण विद्यार्थी घडविले. विषयाच्या माहितीबरोबरच त्यांना शहाणपणही दिले. त्यामुळेच त्यांचा सहवास म्हणजे शिकणे व शहाणेही होणे होते. सध्या पाणी, पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती आणि शाश्वत विकास याबाबत अनेक समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले असताना घारे सरांचे जाणे हे मोठे नुकसान आहे. त्यांनी दिलेले शहाणपण वापरणे आणि या प्रश्नांमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे हीच घारे सरांना खरी आदरांजली ठरेल!
    --------------------------------------------------------------------------------------------

    घारे, (डॉ.) मुकुंद

    पाण्यासाठी पावसावरच अवलंबून राहणार्‍या शेतकर्‍यांना 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा मंत्र देऊन याबाबतच्या समस्येवर ठोस उपाय देणारे डॉ. मुकुंद घारे.

    फर्ग्युसन कॉलेजमधून १९६६ मध्ये डॉ. मुकुंद घारे यांनी भूशास्त्राची पदवी मिळवून पुराजीवशास्त्रात पीएच.डी. मिळवली. परंतु आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने त्यांनी राज्यभर फिरून विविध विभागांच्या भूरचना, पर्यावरण, जलसाठे आदींचा अभ्यास केला. सुरुवातीच्या काळात भूशास्त्रज्ञ म्हणून खाणींसाठी सल्लागार म्हणून काम केल्यावर त्यांनी पाणी या मुख्य समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. राज्यात पडणारा पाऊस, त्यातून निर्माण होणारे भूजलसाठे आणि त्याचा शेतकर्‍यांना होऊ शकणारा फायदा याचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी इस्त्रायलमध्ये भूजलावर संशोधन केले. अखंड भटकंती आणि अभ्यासातून सापडलेला 'पाणी अडवा-पाणी जिरवा'चा मंत्र त्यांनी प्रभावीपणे विविध माध्यमांच्या साह्याने शेतकरी बांधवांपर्यंत नेला.

    राज्यात पाणलोटाची चळवळ सुरू झाली. पाऊस कोठे अधिक प्रमाणात पडतो, तर कुठे कमी. काही भाग अतिवृष्टीचे, तर काही अवर्षणग्रस्त. अशा विषम स्थितीत पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन करून शेतीसाठी वापरण्याचे तंत्र घारे यांनी शेतकर्‍यांना दाखवून दिले. त्यांच्या पुढाकारामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अनेक कोरड्या पडलेल्या विहिरी पुन्हा भरू लागल्या. राज्यात गावोगावी शेकडो शिबिरे घेऊन त्यांनी या विषयातील कार्यकर्तेही घडवले. आज राज्यात पाणी, पर्यावरण आणि कृषीक्षेत्रात कार्य करणारे अनेक नामवंत कार्यकर्ते डॉ. घारे यांचेच शिष्य आहेत. डॉ. घारे यांनी हे काम सुरू केले, तेव्हा सरकारी पातळीवर पाणलोट क्षेत्रात विशेष पुढाकार घेण्यात आला नव्हता. मात्र, त्यांच्या कामाचे महत्त्व ओळखत राज्य सरकारनेही पाण्याबाबतच्या योजनांसाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले. 'अॅक्शन फॉर अॅग्रीकल्चर रिन्यूएशन इन महाराष्ट्र' (अफार्म) या संस्थेच्या माध्यमातून डॉ. घारे यांनी राज्यात जलव्यवस्थापनाचा जागर केला.

    पाणी या विषयावर त्यांनी लिहिलेली पुस्तके सर्वसामान्यांपासून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांसाठी जणू गाइड आहेत. हे सारे करताना सर्वसामान्यांशी असणारी बांधिलकी डॉ. घारे यांनी कायम ठेवली. अत्यंत साधे राहत आणि सर्वसामान्यांना समजेल असे बोलत त्यांनी पाणी आणि जमिनीचे विज्ञान तळागाळात रुजवले. म्हणूनच त्यांना या क्षेत्रात गुरूचे स्थान मिळाले.

    वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते कालवश झाले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

      August 5, 2017


  • त्र्यंबक शंकर शेजवळकर

    निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.

      August 2, 2017


  • अभिनेता पराग बडेकर

    आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.

      June 25, 2022


  • नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर

    ११ जानेवारी १९३५ या दिवशी डॉ. चन्द्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला. पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चन्द्रशेखर यांनी श्वेत बटूंची कमाल वस्तुमानमर्यादा सूर्यापेक्षा ४४ टक्के इतकी असू शकते असे आपल्या सिद्धांताद्वारे मांडले.

      October 19, 2021


  • बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज

    आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असेच होते. त्यांची २००६-२०१० या कालावधीकरिता राज्यसभेकरिता खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच आय.आय.टी. रुरकीसहित ७ विश्वविद्यालयांची डॉक्टरेट ही मानद पदवीदेखील त्यांना प्रदान करण्यात आली होती.

      February 13, 2022


  • नाट्यगुरु इब्राहिम अल्काझी सर

    अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.

      August 12, 2021


  • उत्तरा केळकर

    मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे.

      November 22, 2021