(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

    मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.

      March 3, 2018


  • अमिताभने रंगवलेल्या अँथोनी गोन्सालवीस मागचा खरा ‘अँथोनी गोन्सालवीस’

    अमिताभचा १९७७ सालचा अमर अकबर अँथोनी हा अतिशय गाजलेला चित्रपट कोणाला माहित नाही असे होणे नाही. आजही या चित्रपटातील गाणी आणि संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटात अमिताभने साकारलेले अँथोनी नावाचे पात्र फारच गाजले.

    लोकांच्या मनावर या पात्राने त्या काळी अधिराज्य गाजवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रपटातील अमिताभच्या पात्राचे वर्ण करणारे ‘माय नेम इज़ अँथोनी गोन्सालवीस , मैं दुनिया में अकेला हूं.’ हे गाणं तर आजही गुणगुणण्यासारखे आहे.

    आता तुम्हाला आम्ही याच पात्राच्या नावाबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत.

    तुम्हाला वाटत असेल की अँथोनी गोन्सालवीस हे नाव लेखकाच्या लेखणीतून काल्पनिकरित्या उतरले असेल, पण हे खरं नाही आहे. अँथोनी गोन्सालवीस या नावाचा एक व्यक्ती आपल्या बॉलीवूड मध्ये कार्यरत होता, त्याच्याच नावावरून अमिताभच्या रांगड्या पात्राचे नाव अँथोनी गोन्सालवीस ठेवण्यात आले होते.

    आपल्यापैकी बहुतेक जणांना ही गोष्ट देखील ठावूक नसेल की मूळ कथेमध्ये अमिताभच्या पात्राचे नाव अँथोनी फर्नांडीस ठेवण्यात आले होते.

    या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं, तर गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी. एकदा हे तिघं मिळून गाण्यांबद्दल चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ‘माय नेम इज़ अँथोनी फर्नांडीस’ या बोलासह गाण जास्त आकर्षक वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी गाण्यात बदल करायचे ठरवले, त्यानुसार पात्राचे नाव देखील बदलून अँथोनी गोन्सालवीस करण्यात आले. मुख्य गोष्ट म्हणजे हे नाव प्यारेलाल यांनी सुचवले होते.

    प्यारेलाल यांनी हे नाव सुचवलं कारण त्यांना ज्या व्यक्तीने व्हायोलीन शिकवले त्यांचे नाव अँथोनी गोन्सालवीस होते.

    एकप्रकारे या गाण्यामध्ये आणि संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्या गुरुचे नाव वापरून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा प्यारेलाल यांचा हेतू असावा. त्यांच्या या मागणीला चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे अँथोनी गोन्सालवीस हे नाव वापरण्यात आले.

    प्यारेलाल यांचे गुरु म्हणजे अँथोनी गोन्सालवीस हे बॉलीवूडमधले पहिले म्युजिक अरेंजर होत. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक आहे. संगीतकार मदन मोहन पासून ते आर.डी. बर्मन सारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे.

    गाण्याच्या दोन अंतरामध्ये म्युजिक देण्याचा ट्रेंड देखील अँथोनी गोन्सालवीस यांनीच बॉलीवूड मध्ये आणला.

    संगीतकारांसाठी सर्वात प्रथम स्टाफ नोटेशन्स बनवण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. १९६० साली त्यांनी संगीत क्षेत्रातून संन्यास घेतला होता. २०१२ साली त्यांचे निधन झाले.

    भारतीय संगीत क्षेत्रामध्ये असे अमुलाग्र बदल घडवून आणणारा हा व्यक्ती मात्र कधीही रसिकांपर्यंत पोचू शकला नाही, परंतु त्यांचे शिष्य प्यारेलाल यांनी मात्र त्यांना एक अनोखी गुरु दक्षिणा देत अँथोनी गोन्सालवीस हे नाव अजरामर केले.

      April 19, 2017


  • मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

    सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील 'गझल सम्राट' सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात.

    सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. विदर्भातील अमरावती या शहरात सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

    हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे सुरेश भट असे वर्णन सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

    सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश भट नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8
    रंग माझा वेगळा
    https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
    https://www.youtube.com/watch…

      April 15, 2019


  • लेकुरे उदंड जाली

    ३० ऑक्टोबर १९६६ रोजी ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.या घटनेस एक्कावन्न वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.

    वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.

    ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.

    दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.
    शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –
    ‘मी बोलले तर होते वाईट,
    पण आहे का यांना त्याचे काही,
    तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
    यांना माणसांची पारखच नाही..’

    असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता.

    येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता. नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.

    प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2017


  • बीना रॉय

    बीना रॉय या मूळ लखनौच्या होत्या व त्यांनी १९५१ मध्ये ‘काली घटा’ या चित्रपटातील भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. त्यावेळी किशोर साहू हे त्यांचे सहकलाकार होते. त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. बीना रॉय यांचा विवाह चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे मेहुणे प्रेमनाथ यांच्याशी झाला व त्या कपूर घराण्याचा भाग बनल्या.

    बीना रॉय व प्रेमनाथ यांनी काही चित्रपटात एकत्र काम केले होते, त्यात औरत चा समावेश होता विवाहानंतर या दोघांनी पी.एन.फिल्मस ही कंपनी काढली होती. शगुफा हा त्यांच्या या कंपनीचा पहिला चित्रपट होता. समुंदर व वतन हे आणखी दोन चित्रपट त्यांनी काढले पण ते चालले नाहीत. मा.बीना राय यांनी प्रदीपकुमार समवेत केलेले चित्रपट गाजले होते.

    अनारकली, ताज महल, घुंगट हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले होते. मा.बीना रॉय यांचे ६ डिसेंबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 6, 2017


  • सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी

    अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते.

      December 21, 2021


  • नौशाद अली

    हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही. पण नौशादजींच्या संगीतातून रफी यांना वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्यां आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच. हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते. पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे ही नौशादजींची कमाल होती. बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव. गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात. पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं. सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची.
    नौशाद यांचे ५ मे २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 7, 2017


  • गायिका बेला शेंडे

    त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्‍यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज,अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकीपिडीया.

      January 4, 2017


  • भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक व निर्माता आशुतोष गोवारीकर

    आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि 'लगान' ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले.

    आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 15, 2019


  • क्रिकेटपटू विजय मांजरेकर

    विजय मांजरेकरांनी कसोटीत पदार्पण केले त्यावेळी वेगवान गोलंदाजांना सफलपणे तोंड देऊ शकणारे फलंदाज भारताकडे नव्हते. ही उणीव त्यांनी भरून काढली.

      September 26, 2021