जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. मा.पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला.
फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या 'गांधर्व महाविद्यालया'त पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. अल्पकाळ घरी कोल्हापूरला राहून पुन्हा, अल्लादिया खाँसाहेब शंकरराव सरनाईक यांना तालीम देताना त्यांचं गाणं ऐकता येईल; या मोहाने १९२५ ला 'यशवंत नाटकमंडळी'त भाऊ नायक झाले. तो काळ त्यांना संगीतातली दृष्टी, ऐकलेली तालीम प्रत्यक्षात आणण्याचं धाडस आणि परिणामी प्रसिद्धी देणारा ठरला. मा.पं. वामनराव सडोलीकर यांनी संगीत सम्राट अल्लादिया खाँसाहेबांच्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा फार लहान वयात ध्यास घेतला. त्यांना मनोमनी आराध्यदैवत मानलं. काही कारणांमुळे खाँसाहेबांनी ब्राह्मणाला शिकवणार नाही अशी शपथ घेतली होती. त्यामुळे भाऊंनी त्यांचे सुपुत्र उस्ताद भूजीर्खाँ यांचा गंडा बांधला. कालांतरानं भूजीर्खाँ प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबई सोडून कोल्हापूरला गेले. जाताना थोरल्या खाँसाहेबांकडे मा.पं. वामनराव सडोलीकर यांना सुपूर्द करून म्हणाले, 'अब्बाजी, वामनराव आपले आहेत. आता आपण त्यांना तालीम द्या.' अल्लादियाखाँना भाऊंचा परिचय नव्यानं करून द्यायची जरुरी नव्हती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भूजीर्खाँ सेवा करीत, तर भवानी मंडपात छत्रपतींच्या कुलस्वामिनीची अल्लादिया खाँ संगीत सेवा करीत. भाऊंचे वडील (दादा) दत्तोपंत माधव कुलकणीर् (सडोलीकर) स्वत: उत्तम सतार वाजवीत. ते रागदारीचे जाणकार होते. लहानग्या वामनला घेऊन ते संगीतसेवेच्या वेळी दोन्ही देवळात हजर असत. एवढंच नव्हे, तर छत्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तींच्या छत्र्या (स्मारकं) असत तिथे त्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात भूजीर्खाँ गात असत. याही ठिकाणी दादा भाऊंना घेऊन ऐकायला हजर असत. काळासावळा तरतरीत लहान मुलगा आणि त्याचे गोरेपान उंच वडील खाँसाहेबांना परिचित झाले होते. नाटककंपनीत असताना शंकरराव सरनाईकांची तालीम ऐकून तिचे पडसाद वामनच्या नाट्यपदातून उमटताना, त्याच्या तानांच्या लडीवर लडी ऐकून बेभान झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केलेला पाहून खाँसाहेबांना आपली तालीम ऐकून ऐकून हुबेहूब उचलणारा एकलव्य दिसला होता. काही वेळा खाँसाहेब भाऊंना रियाजाच्या आणि तानांच्या बाबतीत सूचना देत. केलेल्या रियाजावर टिप्पणी करत. पण त्या काळात गंडाबंधनाबद्दल विचार करणं भाऊंना शक्यच नव्हतं. कारण गंडाबंधनाची दक्षिणा होती रुपये दहा हजार! कलदार सुरती रुपये! आपल्या वडिलांवर असा भार टाकणं भाऊंच्या कल्पनेबाहेरचं होतं. आधीच गाणं शिकण्यासाठी घरापासून दूर राहिल्यामुळे आणि शिरस्त्याप्रमाणे शाळा न शिकल्याबद्दल आजूबाजूच्या लोकांनी आईवडिलांना टोमणे मारलेले होते. त्यामुळे खाँसाहेबांचं कंपनीतलं वास्तव्य ही भाऊंच्या दृष्टीनं मोठी पर्वणी होती. खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं. पं. पलुस्कर यांच्या सहवासात मिळालेलं 'रामनाम-धन', 'शिस्तीचे पाठ', 'रामायणावर भक्ती' आणि 'स्वरसाधनेचा मूलमंत्र' हे देखील पं. वामनराव सडोलीकर यांच्या आयुष्याला स्थिरता देणारं ठरलं. सुदैवानं दोन्ही गुरू एकाच मार्गाचे प्रवासी होते. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही प्रवाहांचं त्यांच्या आयुष्यात अचल अधिष्ठान होतं. त्यामुळे कुठेही वैचारिक द्वंद्वात सापडून दिशा भ्रष्ट होण्याचा धोका भाऊंच्या आयुष्यात आला नाही. गुरू सच्चरित्र, स्थितप्रज्ञ आणि सर्वार्थानं मोठा असणं हे फार मोठं भाग्य असतं. भाऊंना हे सद््भाग्य लाभलं आणि त्यांच्यामुळे आम्हालाही तो आशीर्वाद लाभला. पं. वामनराव सडोलीकर यांनी नाट्यकलेची सेवा नायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक या रूपात केली. अनेक होतकरूंना ही कला शिकवली. आपल्या स्थानावरून न उठता केवळ भूमीसंवाद आणि त्यामागचा विचार समजावून देऊन ते कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेत. मैफलीत गायला बसले आणि आवाज लागला नाही अशी त्यांनी कधीच तक्रार केली नाही. खाँसाहेबांनी भूजीर्खाँ, मंजीखाँ आणि बडेजींना जे आपल्या गायकीचं मर्म समजावून दिलं ते भाऊंनाही दिलं. तालाचा विचार अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून करून सर्वसामान्य रागही कसे अभिनव रीतीनं सोडवायचे आणि मांडायचे, अवघड राग कसे उलगडायचे याची मर्मभेदक दृष्टी भाऊंना मिळाली आणि श्रोत्यांच्या अनुनयासाठी कोणताही समझौता न करता शुद्ध गायकीच भाऊंनी मैफलीतून सतत मांडली. त्या काळी साधं पांढरं धोतर, स्वच्छ, कडक इस्त्रीचा पांढरा झब्बा किंवा शर्ट-कोट, माथ्यावर टोपी (बुलबुले आणि कं. कोल्हापूर यांच्याकडून खास बनवलेली) हा त्यांचा वेष त्यांची ओळख बनला होता. आज जरासं नाव झालं की कलाकार 'पंडित किंवा उस्ताद' होतात. आता अधिक शिकायची आपल्याला गरज नाही, असं त्यांना वाटतं. पण भाऊंनी आपलं उत्तरायुष्यही शिकण्यात-शिकवण्यात व्यतीत केलं. त्यांच्या वैयक्तिक गरजा इतक्या माफक होत्या की त्या गरजांसाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. त्यांचा स्वभाव येणाऱ्या प्रसंगातून किंवा अनुभवातून सकारात्मक विचार जोडणारा होता. दु:खानं पिचून जाणं किंवा निराशेनं दैवाला दोष देणं त्यांनी कधी केलं नाही. रागीट होते, पण त्यांचा राग समोरच्याचा मनोभंग करणारा, त्याच्या व्यक्तित्त्वाला जाळून टाकणारा नव्हता. पं. वामनराव सडोलीकर आपले गुरू उस्ताद अल्लादिया खान यांनी स्थापन केलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीने गायन करत असत. किशोरवयात त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढच्या काळात त्यांनी हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण जयपूर-अत्रौली घराण्याच्या उस्ताद भुर्जी खान व उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे घेतले. त्यांच्या शिष्यांत बंधू मधुकर सडोलीकर, कन्या श्रुती सडोलीकर-काटकर आणि मंजिरी आलेगांवकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘पं. वामनराव सडोलीकर फौंडेशन’ तर्फे वामनराव सडोलीकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरांजली अर्पित केली जाते. गानसम्राज्ञी श्रृती सडोलीकर आपले वडिल वामनराव सडोलीकर यांच्या स्मरणार्थ दर वर्षी कार्यक्रम करुन त्यांना श्रध्दांजली वाहतात. पं. वामनराव सडोलीकर राहात असलेल्या दादरच्या हिंदु कॉलनीतील चौथ्या रस्त्याला मुंबई महानगर पालिकेने पं. वामनराव सडोलीकर यांचे नाव दिले.
वामनराव सडोलीकर यांचे २५ मार्च १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ श्रृती सडोलीकर
March 27, 2017
कुमार विश्वकोशाचे एक लेखक
December 15, 2010
संजय खान यांचा जन्म ३ जानेवारी १९४१ रोजी झाला. संजय खान हे फिरोज खान आणि अकबर खान यांचे बंधू. संजय खान यांनी साठ च्या दशकात अभिनयाला सुरुवात केली.१९६४ साली दोस्ती या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलीवुडच्या दुनियेत पाऊल ठेवले. साठ व सत्तर च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले.'दस लाख','एक फूल दो माली','इंतकाम','उपासना','मेला','नागिन'' सोना चांदी','काला धंधा गोरे लोग'हे त्यांचे निवडक गाजलेले सिनेमे. अभिनयाबरोबरच संजय खान यांनी दिग्दर्शक,निर्माती आणि पटकथा लेखकाच्या रुपातही आपली ओळख निर्माण केली.'महा काव्य महाभारत 1','जय हनुमान','द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान' या मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
द सॉर्ड ऑफ टीपू सुलतान'ही मालिका त्यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरली.
संजय खान यांचे लग्न जरीन खान यांच्यासोबत झाले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2019
दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.
बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. मा.बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बिमल रॉय यांच्या काही कलाकृतीची माहिती
दो बिघा जमींन
साल:- १९५३
या चित्रपटाची प्रेरणा त्यांना बायसिकल थिव्ह्स या चित्रपटावरून आली होती. एक अल्पभूधारक असा शेतकरी, त्याच्याकडे केवळ दोन बिघा जमीन असते. या गावात त्याला अनेक संकटांचा सामन करावा लागतो. याच गावातला एक सावकार एका मिल मालकाबरोबर मिळून या गावात एक मिल बनवण्यासाठी जमीन मिळवून देण्याचं कारस्थान करतो. त्याचाही त्रास या शेतक-याला होतो. या शेतक-याला आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरात यावं लागतं. त्यानंतर त्याच्या आयुष्यात काय होतं. त्याच्या जमिनीचं काय होतं? याची कथा या चित्रपटातून पाहायला मिळते. बलराज सहानी व निरुपा रॉय यांच्या अभिनयासाठीही हा चित्रपट आठवणीत आहे. अगदी साधेपणाने कथा सांगण्याचं बिमलदांचं कौशल्यही या चित्रपटातून पाहायला मिळतं. त्या काळात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.
देवदास
साल:-१९५५
शरदचंद्र चटोपाध्याय यांच्या देवदास या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती बिमल रॉय यांनी केली. आपल्या लहानपणीच्या प्रेमासाठी नंतर दारूच्या आहारी गेलेल्या व स्वत:च्या जीवनाचा नाश केलेला नायक या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. दिलीप कुमार, वैजंयती माला व सुचित्रा सेन यांच्या विलक्षण अभिनयासाठीही हा चित्रपट ओळखला जातो. एक ठाकूर आपल्या जीवनाचं कशा प्रकारे पतन करून घेतो हे या चित्रपटातून दाखवण्यात आलं असलं तरी समाज व व्यक्तिस्वातंत्र्य या महत्त्वाच्या गोष्टीकडेही हा चित्रपट लक्ष वेधतो. आपल्या विलक्षण शैलीच्या जोरावर बिलदांच्या या चित्रपटालाही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. याच चित्रपटाचा रिमेक नंतर शाहरुख खान याला घेऊन संजय लीला भन्साली यांनी केला होता.
मधुमती
साल:-१९५८
या चित्रपटात एका पुनर्जन्मावरच्या प्रेमावरची कथा सांगण्यात आली होती. एका निर्जन जागी गेलेल्या एका इंजिनीअरला आपल्या पुनर्जन्माच्या प्रेमाची कथा आठवते व त्यानंतर त्यांच्या जीवनात काय काय उलथापालथी होतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. फ्लॅशबॅक व वर्तमानाचा सुरेख वापर करून मांडण्यात आलेली ही कथा लोकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटाबरोबरच या चित्रपटातली गाणीही गाजली. तब्बल बारा गाण्यांचा या चित्रपटात समावेश होता. ही गाणी आजही तितकीच अवीट गोडीची आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी व पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. शाहरुख खानने नंतर याच चित्रपटावर आधारित ओम शांती ओम या चित्रपटाची निर्मिती केली होती. तोही प्रचंड यशस्वी ठरला होता.
सुजाता
साल:-१९५९
जातीप्रथेच्या संदर्भात अनेक माध्यमातून चर्चा होत असते. असे असले तरी भारतात ती एक मोठी समस्या आहे. याच विषयावर आधारित चित्रपटाची निर्मिती बिमलदांनी केली होती. एका ब्राह्मण मुलाचे दुस-या जातीतल्या मुलीशी प्रेम होते. त्यानंतर समाज त्यांच्या या प्रेमाकडे कसा पाहतो. त्यांच्यापुढे कोण कोणती आव्हानं येतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले होते. या चित्रपटातल्या नूतन यांच्या जबरदस्त अशा अभिनयामुळेही हा चित्रपट गाजला होता.
बंदिनी
सर्वसामान्य भारतीय स्त्रीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात दिल्या गेलेल्या योगदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून नूतन यांचा दमदार अभिनय लोकांपुढे आला. अशोक कुमार व त्या वेळी नवोदित असलेल्या धर्मेद्र यानेही यात चांगली भूमिका केली होती. संपूर्णपणे स्त्रीप्रधान असलेला हा चित्रपट त्या काळातला एक क्रांतिकारी चित्रपट म्हणून गणला गेला. या चित्रपटानेही प्रचंड यश मिळवले. बिमलदा यांचे चित्रपट पाहून त्याकाळी भारतीय चित्रपटांची उंची किती होती हे दाखवणारे आहेत. आज जागतिक सिनेमाचं कौतुक करणाऱ्यांनाही हे चित्रपट आपलेसे वाटतील यात शंका नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2018
प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.
July 19, 2011
भट घराण्यातील तिसरा पेशवा. नानासाहेब व बाळाजी बाजीराव या दोन्ही नावांनी प्रसिद्ध.
March 3, 2018
दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰
केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले॰ मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले॰
त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली॰ ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली.
कमलाबाई ओगलेंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दोन लाख सुनांची आई - कमलाबाई ओगले
## Kamalabai Ogle
June 7, 2017
वनस्पतींवर अपार प्रेम करणारा बंडखोर वैज्ञानिक हे वाक्य आले तर पुढील नाव हे आघारकरांचे आले पाहिजे इतकी या जंगलवेड्या निसर्गमित्राला, आजुबाजूच्या झाडा झुडूपांची, पाना फुलांची, पाखरा प्राण्यांची व वनस्पती वेलींची विलक्षण आवड होती.
July 29, 2011
स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.
दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.
मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.
आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.
रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.
१९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.
नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.
राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.
दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.
दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.
#DattatrayPotnis
May 4, 2022
मुळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत ६३ प्रकारची वेगवेगळी विमाने चालविली. त्यांपैकी २२ विमाने जेट होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. वेगवेगळ्या प्रकारची विमाने चालविण्यासाठी प्रत्येक वेळी काही आठवड्यांचे कन्व्हर्जन ट्रेनिंग घ्यावे लागते, हे लक्षात घेतले तर त्यांचे अष्टपैलुत्व सहजपणे लक्षात येईल. मुळगांवकरांच्या नावे आणखी एक विक्रम जमा होतो. ‘मिग-२१’ हे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जलद गतीचे) विमान चालविणारे ते पहिले भारतीय वैमानिक ठरले. वायुसेनाप्रमुख झाल्यानंतरही ते ‘मिग-२१’ चालवीत असत. वायुसेनेला स्वनातीत युगात नेणारे युगपुरुष असे त्यांचे सार्थ वर्णन केले जाते.
April 9, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti